कुकी सुरू किंवा बंद करणे

तुमचे Google खाते इतर तृतीय पक्ष ॲप आणि सेवांसोबत कसे काम करते यावर कुकीमुळे परिणाम होऊ शकतो.

महत्त्वाचे: तुम्हाला कुकी बंद केल्या आहेत असा मेसेज मिळाल्यास, तुमचे खाते वापरण्यासाठी तुम्हाला त्या सुरू कराव्या लागतील.

कुकीविषयी जाणून घ्या

तुम्ही भेट देता त्या वेबसाइट कुकी नावाच्या फाइल तयार करतात. तुमच्या भेटीबद्दलची माहिती सेव्ह करून, त्या तुमचा ऑनलाइन अनुभव आणखी सोपा बनवतात. उदाहरणार्थ, साइट पुढील गोष्टी करू शकतात:

  • तुम्हाला साइन इन केलेले ठेवणे
  • तुमची साइटसंबंधी प्राधान्ये लक्षात ठेवणे
  • तुम्हाला स्थानिकरीत्या सुसंबद्ध आशय पुरवणे

कुकी २ प्रकारच्या असतात:

  • प्रथम पक्ष कुकी: तुम्ही भेट देत असलेल्या साइटद्वारे तयार केल्या जातात. साइट ॲड्रेस बारमध्ये आहे. ते डिव्हाइसवरील साइट डेटाचे प्रकार आहेत. डिव्हाइसवरील साइट डेटाविषयी अधिक जाणून घ्या.
  • तृतीय पक्ष कुकी: इतर साइटद्वारे तयार केल्या जातात. तुम्ही भेट देता त्या साइट इमेज जाहिराती आणि इतर साइटवरील मजकूर यांसारखा आशय एंबेड करू शकतात. तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, यांपैकी इतर कोणत्याही साइट कुकी आणि इतर डेटा सेव्ह करू शकतात.


Google हे त्याच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी कुकी वापरते. गोपनीयता धोरण यामध्ये कुकी कशा वापरल्या जातात हे जाणून घ्या.

Chrome अ‍ॅपमध्ये

कुकी आपोआप सुरू केल्या जातात आणि सुरू राहतात. कुकी कशा साफ कराव्यात ते जाणून घ्या.

Safari अ‍ॅपमध्ये

  1. कुकी सुरू किंवा बंद करण्यासाठी सूचना फॉलो करा.
  2. पाच मिनिटे थांबा आणि Safari अ‍ॅप उघडा.

इतर ब्राउझर अ‍ॅप्समध्ये

सूचनांसाठी, तुमच्या ब्राउझरची सपोर्ट वेबसाइट पहा.

समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही तुमचे Google खाते वापरून तृतीय पक्ष वेबसाइटमध्ये साइन इन करू शकत नसल्यास आणि कुकी बंद केल्या आहेत असा मेसेज मिळाल्यास:

  1. कुकी सुरू करण्यासाठी वरील पायऱ्या फॉलो करा.
  2. पुन्हा साइन इन करून पहा.

तुम्हाला तरीही एरर मेसेज मिळत असल्यास, येथे काही संभाव्य उपाय दिले आहेत. प्रत्येक उपाय वापरून पहा, त्यानंतर साइन इन करून पहा.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8285299725562520782
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false