तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन-इन केलेल्या डिव्हाइसमधील तुमच्या संपर्कांबद्दलची माहिती, तुम्ही त्यांच्याशी वारंवार संवाद साधता की नाही याच्या समावेशासह सेव्ह करणे हे निवडू शकता. तुम्ही कोणतेही डिव्हाइस वापरत असलात तरीही, या संपर्कांशी सर्व Google सेवांवर आणखी सहजरीत्या संवाद साधता यावा यासाठी हा डेटा वापरला जातो.

  1. तुमच्या Google खाते मध्ये लोक आणि शेअरिंग विभागावर जा.
  2. "संपर्क" या अंतर्गत, तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती निवडा.
  3. तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती सेव्ह करा हे बंद किंवा सुरु करा.

टीप: हे सेटिंग Google Contacts किंवा Android बॅकअप यांसारख्या इतर Google सेवांद्वारे संपर्क माहिती सेव्ह करण्यावर कोणताही परिणाम करत नाही. सर्व Google सेवा हा डेटा सेव्ह करत नाहीत किंवा वापरत नाहीत.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती हटवणे

तुम्ही सेटिंग बंद करता तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती तुमच्या Google खाते वरून हटवली जाते. तुमचे संपर्क तुमच्या डिव्हाइसवरून हटवले जाणार नाहीत.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती तुम्हाला कशी मदत करते

हा डेटा तुम्हाला कोणत्या संपर्काशी संपर्क साधावा हे ओळखण्यात Google ला मदत करतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google Assistant किंवा स्मार्ट डिव्हाइसला “Ok Google, सॅम यांना कॉल करा” यांसारख्या गोष्टी करण्यास सांगता तेव्हा, हा डेटा कॉल करण्यासाठी योग्य संपर्क निवडण्यात मदत करतो.

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती का सुरू केलेली आहे

तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती या सेटिंगने सेव्ह केलेला डेटा यापूर्वी डिव्हाइसची माहिती या सेटिंगद्वारे सेव्ह केला होता. तुमच्या अनुभवामध्ये सातत्य ठेवण्यात मदत करण्यासाठी, तुमचे डिव्हाइसची माहिती हे सेटिंग सुरू असल्यास, तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती हे सेटिंग सुरू असते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील संपर्क माहिती कधीही बंद करू शकता.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15185886986114096739
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false