Google सोबत वापर आणि निदान यासंबंधित माहिती शेअर करणे

आम्हाला Android मध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही तुमचे डिव्हाइस कसे वापरता आणि ते कसे काम करते यांबद्दलची माहिती आम्हाला पाठवण्याची डिव्हाइसला परवानगी देऊ शकता.

तुमच्याकडे अतिरिक्त वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असल्यास, ही माहिती तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केली जाऊ शकते. तसे झाल्यास, तुम्ही ती माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये पाहू आणि हटवा शकता. आम्ही ही माहिती तुमच्या Google सेवा आणखी पर्सनलाइझ करण्यासाठी आणि सर्वांकरिता आमची उत्पादने व सेवा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरतो.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 8.0 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

Google सोबत कोणती माहिती शेअर केली जाते

तुम्ही वापर आणि निदान सुरू केल्यास, कोणत्या गोष्टी काम करत आहेत व कोणत्या काम करत नाहीत याबद्दलची माहिती तुमचे डिव्हाइस Google ला पाठवते. उदाहरणार्थ, तुमचे डिव्हाइस यांसारखी माहिती पाठवू शकते:

  • बॅटरीची पातळी
  • तुम्ही तुमची अ‍ॅप्स किती वारंवार वापरता
  • तुमच्या नेटवर्क कनेक्शनची (जसे की मोबाइल, वाय-फाय आणि ब्लूटूथ) गुणवत्ता आणि कालावधी

वापर आणि निदान सुरू किंवा बंद करा

महत्त्वाचे: तुम्ही वापर आणि निदान बंद केले तरीही, तुमचे डिव्हाइस Android ची नवीन आवृत्ती यांसारख्या आवश्यक सेवा मिळवू शकते. वापर आणि निदान बंद केल्याने अ‍ॅप्स गोळा करू शकतील अशा माहितीवर परिणाम होणार नाही.

Google ला वापर आणि निदान यासंबंधित माहिती पाठवायची का हे निवडण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर आणखी  आणि त्यानंतर वापर आणि निदान वर टॅप करा.
  3. वापर आणि निदान सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही शेअर केलेले डिव्हाइस वापरत असल्यास, इतर वापरकर्त्यांच्या प्रोफाइलमुळे हे सेटिंग बदलू शकते.

Google ही माहिती कशी वापरते

Google अ‍ॅप्स आणि Android डिव्हाइस यांसारखी उत्पादने व सेवा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google वापर आणि निदान यासंबंधित माहिती वापरते. सर्व माहिती Google चे गोपनीयता धोरण यानुसार वापरली जाते.

उदाहरणार्थ, पुढील गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google वापर आणि निदान माहिती वापरू शकते:

  • बॅटरी लाइफ: सामान्य वैशिष्ट्यांनी कमी बॅटरी वापरावी याबाबतीत मदत करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवरील कोणत्या गोष्टी सर्वाधिक बॅटरी वापरतात याबद्दलची माहिती Google वापरू शकते.
  • डिव्हाइसवरील क्रॅश होणे किंवा फ्रीझ होणे: Android ऑपरेटिंग सिस्टीमला अधिक विश्वसनीय बनवण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवरील अ‍ॅप्स क्रॅश आणि फ्रीझ होतात, तेव्हा Google त्याबद्दलची माहिती वापरू शकते.

काही माहिती ही Android डेव्हलपरसारख्या भागीदारांना त्यांची अ‍ॅप्स आणि उत्पादने आणखी चांगली बनवण्यातदेखील मदत करू शकते.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5101547695259472774
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false