तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थापित करा

तुम्ही Google Search, Assistant आणि Maps यांच्याशी संवाद साधता, तेव्हा तुम्हाला Google ने व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी Google सर्व्हरवरील तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करायला हवे आहे का ते तुम्ही निवडू शकता. Google ला त्याची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने आणि त्या वापरणार्‍या Google सेवा डेव्हलप करण्यात व त्यांमध्ये सुधारणा करण्यात तुमचा आवाज आणि ऑडिओ मदत करू शकतो.

तुम्ही व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू करणे न निवडल्यास, ते बंद असते.

महत्त्वाचे: इतर सेटिंग्जच्या आधारावर, ऑडिओ रेकॉर्डिंग इतर जागी सेव्ह केली जाऊ शकतात.

व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वर क्लिक करा.
  4. "व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूला, चौकटीत खूण करा किंवा चौकटीतली खूण काढा.

हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद असताना, तुम्ही साइन इन केले असले, तरीही Google Search, Assistant आणि Maps यांसोबतच्या व्हॉइस संवादांमधील ऑडिओ रेकॉर्डिंग ही Google सर्व्हरवरील तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाणार नाहीत. तुम्ही हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद केल्यास, यापूर्वी सेव्ह केलेला ऑडिओ हटवला जात नाही. तुम्ही कधीही तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग हटवणे हे करू शकता.

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग शोधणे किंवा हटवणे

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग शोधणे

महत्त्वाचे: इतर सेटिंग्जच्या आधारावर, ऑडिओ रेकॉर्डिंग इतर जागी सेव्ह केली जाऊ शकतात.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा वर क्लिक करा. या पेजवर, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • तुमच्या मागील ॲक्टिव्हिटीची सूची पाहणे: ऑडिओ आयकन Speak असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंगचा समावेश आहे.
    • रेकॉर्डिंग प्ले करणे: ऑडिओ Speak च्या बाजूला, तपशील आणि त्यानंतर रेकॉर्डिंग पहा आणि त्यानंतर प्ले करा प्ले करा वर क्लिक करा.

एकाहून अधिक ऑडिओ रेकॉर्डिंग: तुमच्या एकाहून अधिक Google Assistant ने युक्त डिव्हाइसने ऑडिओवर प्रक्रिया केली असल्यास, तुम्हाला ॲक्टिव्हिटीशी संबंधित एकाहून अधिक ऑडिओ रेकॉर्डिंग दिसू शकतात. तुम्‍हाला कोणत्‍या डिव्‍हाइसने प्रतिसाद द्यावा हे निर्धारित करणार्‍या आमच्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्‍यासाठी आम्‍ही हा ऑडिओ वापरतो.

तुम्हाला "ट्रान्स्क्रिप्ट उपलब्ध नाही" असा मेसेज मिळाल्यास, त्या ॲक्टिव्हिटीदरम्यान खूप जास्त बॅकग्राउंडमधील आवाज होता अशी शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला ऑडिओ Google Takeout वापरून डाउनलोड करू शकता. तुमचा ऑडिओ आणि इतर Google डेटा कसा डाउनलोड करायचा हे जाणून घ्या.

टीप: आणखी सुरक्षा जोडण्यासाठी, तुम्हाला माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर तुमचा पूर्ण इतिहास पाहण्याकरिता अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक असू शकते.

तुमच्या वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी मधून ऑडिओ रेकॉर्डिंग हटवणे

महत्त्वाचे: इतर सेटिंग्जच्या आधारावर, ऑडिओ रेकॉर्डिंग इतर जागी सेव्ह केली जाऊ शकतात.

एका वेळी एकच आयटम हटवणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी and then अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा वर क्लिक करा. या पेजवर, तुम्हाला तुमच्या मागील ॲक्टिव्हिटीची सूची दिसेल. ऑडिओ आयकन Speak असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंगचा समावेश आहे.
  4. तुम्हाला हटवायच्या असलेल्या आयटमच्या बाजूला, आणखी More and then हटवा निवडा.

सर्व आयटम एकाच वेळी हटवणे

महत्त्वाचे: या पायर्‍यांमुळे फक्त रेकॉर्डिंगचा समावेश असलेले आयटमच नव्हे, तर तुमची सर्व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी हटवली जाईल.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी and then अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा वर क्लिक करा. या पेजवर, तुम्हाला तुमच्या मागील ॲक्टिव्हिटीची सूची दिसेल. ऑडिओ आयकन Speak असलेल्या आयटममध्ये रेकॉर्डिंगचा समावेश आहे.
  4. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या वर, हटवा and then सर्व वेळ वर क्लिक करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग आपोआप हटवणे

महत्त्वाचे: या पायर्‍या फक्त ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश असलेल्याच नव्हे, तर तुमच्या सर्व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आयटमसाठी ऑटो-डिलीटचा पर्याय सुरू करतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या वर, शोध बारमध्ये, आणखी More आणि त्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी एवढा काळ ठेवा निवडा.
  5. तुम्हाला तुमची अ‍ॅक्टिव्हिटी किती काळ ठेवायची आहे त्याचे बटण आणि त्यानंतर पुढील आणि त्यानंतर कंफर्म करा वर क्लिक करा.

Google ची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने आणि त्यांचा वापर करणार्‍या सेवा डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी यापुढे आवश्यक नसताना, तुम्ही निवडलेल्या कालमर्यादेपेक्षा लवकर Google तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग Google सर्व्हरवरून हटवू शकते. उदाहरणार्थ, कालांतराने काही भाषांसाठी कमी ऑडिओची गरज असू शकते.

या व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंगबद्दल

तुम्ही Google सेवांशी बोलता, तेव्हा तुमच्या ऑडिओवर प्रक्रिया करण्यासाठी आणि तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी Google त्याची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने वापरते. उदाहरणार्थ, तुम्ही आवाज वापरून शोधण्यासाठी माइक आयकनला स्पर्श केल्यास, तुम्ही जे बोलता त्याचे भाषांतर Google ची ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञाने शब्द आणि वाक्यांमध्ये करतात, जी Search तुम्हाला सर्वात उपयुक्त परिणाम देण्यासाठी अनुक्रमणिकेमध्ये शोधते.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी तुम्ही Google साइट, अ‍ॅप्स आणि सेवांवर करत असलेल्या गोष्टी Google सर्व्हरवरील तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. त्यामध्ये स्थानासारख्या संबंधित माहितीचा समावेश असू शकतो. ठरावीक संवाद कदाचित सेव्ह केले जाणार नाहीत.

या पर्यायी व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंगसह, तुम्ही Google Search, Assistant व Maps यांच्याशी संवाद साधता, तेव्हा वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वापरून ऑडिओ रेकॉर्डिंगदेखील सेव्ह करू शकता. तुम्ही व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू करणे न निवडल्यास, ते बंद असते.

हे सेटिंग Search, Assistant आणि Maps अशा तुम्ही साइन इन केलेल्या कोणत्याही ठिकाणी परिणाम करते, उदाहरणार्थ, Google Assistant अ‍ॅप व Google Home स्मार्ट स्पीकर या दोन्हीवरील Assistant.

ऑडिओ रेकॉर्डिंग कशी वापरली जातात

हे सेटिंग सुरू असताना सेव्ह केलेला व्हिडिओ Google त्याच्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये आणि ती वापरणार्‍या Google Assistant सारख्या Google सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरते.

ऑडिओ पुनरावलोकन प्रक्रिया

काही ऑडिओ तंत्रज्ञान सुधारणांसाठी, हे सेटिंग सुरू असताना Google सर्व्हरवर सेव्ह केलेल्या ऑडिओचे नमुने प्रशिक्षित परीक्षणकर्त्यांद्वारे विश्लेषित केले जातात, जे ते ऐकतात, ट्रान्स्क्राइब करतात आणि त्यावर भाष्य करतात, त्यामुळे Google सेवा या ऑडिओचा आणखी चांगल्याप्रकारे अर्थ लावू शकतात, उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती गोंगाट असलेल्या वातावरणात किंवा विशिष्ट भाषेत काय म्हणत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून, आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलतो, जसे की परीक्षणकर्ते तुमच्या ऑडिओचे विश्लेषण करत असताना तुमच्या खात्यामधून तुमचा ऑडिओ वेगळा करणे.

या प्रक्रियेमुळे, लोक त्यांच्याशी काय बोलत आहेत हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात सेवांना मदत होते. उदाहरणार्थ, Google ने जास्त डेटा असलेल्या भाषांमधील ट्रान्स्क्राइब केलेल्या ऑडिओवर एका मॉडेलला प्रशिक्षण देऊन कमी डेटा असलेल्या भाषांसाठी ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशनमध्ये सुधारणा केली, ज्यामुळे रीअल-टाइम बहुभाषिक स्पीच रेकग्निशन सुलभ झाले.

आवाजाशी संबंधित तंत्रज्ञाने

महत्त्वाचे: तुम्ही ६ जून २०२२ नंतर व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केल्यास, ही माहिती लागू होते.

Voice Match यासारखी Google ची काही ऑडिओ तंत्रज्ञाने ही एकसारखे आवाज जुळवू शकतात, आवाज वेगळे आहेत हे ओळखू शकतात किंवा ती युनिक आवाजाद्वारे वर्धित केली जाऊ शकतात. तुम्ही Voice Match सह Google Assistant वापरत असल्यास आणि तुम्ही हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू केलेले असल्यास, Google ची व्हॉइस तंत्रज्ञाने व ती वापरणार्‍या Google सेवा डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, Google तुमच्या सेव्ह केलेल्या ऑडिओमधून तुमच्या आवाजाच्या मॉडेलवर तात्पुरती प्रक्रियादेखील करू शकते. तुमचा आवाज इतर सेटिंग्जसोबत कसे काम करतो ते जाणून घ्या.

या प्रक्रियेचा भाग म्हणून, आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलतो. उदाहरणार्थ, तुमच्या आवाजाचे मॉडेल सेव्ह केलेल्या ऑडिओवरून मोजले गेले असल्यास, ते तुमच्या खात्यातून वेगळे केले जाईल, आमच्या ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यावर तात्पुरती प्रक्रिया केली जाईल आणि नंतर ते हटवले जाईल. या आवाजावर प्रक्रिया करण्याच्या प्रत्येक घटनेला कमाल ७ दिवस लागू शकतात. काही अधिकार क्षेत्रांमध्ये व्हॉइस मॉडेल हा बायोमेट्रिक डेटा समजला जाऊ शकतो.

हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असताना

तुमच्या वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी साठी हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असताना, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये Google Search, Assistant आणि Maps यांच्याशी संवाद साधता, तेव्हा Google ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करेल.

तुमच्या डिव्हाइसने अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यावर ऑडिओ सेव्ह केला जातो. डिव्हाइस ही वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हेशनना सपोर्ट करू शकतात, जसे की “Ok Google” यासारखी तुम्ही वापरत असलेली झटपट विचारणा, सुरू असलेली संभाषणे किंवा माइक दाबणे. काही डिव्हाइसमध्ये पूर्ण विनंती ऐकण्यासाठी अ‍ॅक्टिव्हेशनच्या आधी काही सेकंदांचा समावेश असतो.

तुमच्या डिव्हाइसने चुकीने “Ok Google” अशा ऐकू येणार्‍या आवाजासारखे ऑडिओ अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट केल्यास, ऑडिओ सेव्ह केला जाऊ शकतो. चुकून होणारी अ‍ॅक्टिव्हेशन कमी करण्यासाठी आमच्या सिस्टीम अधिक चांगल्या बनवण्याकरिता आम्ही सातत्याने काम करत आहोत.

तुम्ही तुमचे डिव्हाइस इंटरनेट कनेक्शनशिवाय वापरत असल्यास, तुम्ही परत ऑनलाइन आल्यावर ऑडिओ तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केला जाऊ शकतो.

हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद असताना

तुम्ही हे व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद केल्यास, तुम्ही Google Search, Assistant व Maps यांच्याशी संवाद साधता, तेव्हा Google यापुढे Google सर्व्हरवरील तुमच्या Google खाते मध्ये तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वापरून ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करणार नाही. तुम्ही Google सेवांशी बोलता, तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी Google तुमच्या ऑडिओवर प्रक्रिया करणे पुढे सुरू ठेवेल.

व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद केल्याने Assistant शी संबंधित वेगळी ऑडिओ सेटिंग्ज बंद होत नाहीत.

व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग बंद असते, तेव्हा Voice Match यासारख्या व्हॉइस तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी, हे सेटिंग सुरू असताना Google हे पूर्वी सेव्ह केलेला ऑडिओ वापरणार नाही. यापूर्वी सेव्ह केलेला ऑडिओ तुम्ही न हटवल्यास, इतर ऑडिओ तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी तो वापरला जाणे पुढे सुरू राहू शकते.

तुम्ही activity.google.com येथे तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मधील, यापूर्वी सेव्ह केलेला ऑडिओ हटवू शकता.

ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करता येणार्‍या इतर जागा

या व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंगचा पुढील गोष्टींवर परिणाम होत नाही:

  • Google Voice आणि YouTube यांसारख्या इतर Google सेवा सेव्ह व व्यवस्थापित करत असलेला ऑडिओ.
  • तुमच्‍या डिव्‍हाइसवर तुमचे वैयक्तिक Voice Match सेट करणे आणि रिफाइन करणे किंवा डिव्हाइसवरील ऑडिओ तंत्रज्ञाने इतर प्रकारे पर्सनलाइझ करणे यांसारख्या उद्देशांसाठी तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेला ऑडिओ.

फेडरेटेड लर्निंग किंवा इफेमेरल लर्निंग वापरून ऑडिओ रेकग्निशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी, या सेटिंगद्वारे नियंत्रित न केल्या जाणाऱ्या इतर मशीन लर्निंग प्रक्रिया वापरल्या जाऊ शकतात.

Google हे स्पीच मॉडेलमध्ये कशी सुधारणा करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3708632540165868194
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false