तुमच्या खात्यावरील फोन नंबर आणि तो कसा वापरला जातो ते बदलणे

तुम्ही तुमच्या Google खाते वर फोन नंबर जोडू, अपडेट करू शकता किंवा त्यावरून काढून टाकू शकता. फोन नंबर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात आणि तुमचे नंबर कसे वापरले जावेत ते व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्याकडे नियंत्रणे असतात.

महत्त्वाचे: ते तुम्हीच असल्याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा नवीन फोन नंबर वापरता येण्यापूर्वी एक आठवडा लागू शकतो.

फोन नंबर जोडणे, अपडेट करणे किंवा काढून टाकणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये, वैयक्तिक माहिती हा टॅब उघडा.
  2. संपर्क माहिती and then फोन नंबर and then तुमचा फोन नंबर निवडा.
  3. येथून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • तुमचा फोन नंबर जोडणे: फोनच्या बाजूला, तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी रिकव्हरी फोन जोडा हे निवडा. ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमच्या फोन नंबरशी संबंधित देश निवडा आणि तुमचा फोन नंबर एंटर करा.
    • तुमचा फोन नंबर बदलणे: तुमच्या नंबरच्या बाजूला, संपादित करा Editand then नंबर अपडेट करा निवडा.
    • तुमचा फोन नंबर हटवणे: तुमच्या नंबरच्या बाजूला, हटवा Deleteand then नंबर काढून टाका निवडा.
  4. दिसणार्‍या बॉक्समध्ये, सूचना फॉलो करा.

टीप: तुमच्या Google खाते मधील नंबर बदलल्याने, फक्त काही Google सेवांवर परिणाम होतो. इतर Google सेवांवर तुमचा नंबर बदलणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.

फोन नंबर कसे वापरले जातात

काही Google सेवांचा भाग म्हणून

तुमचा फोन नंबर तुम्ही सेट केलेल्या किंवा वापरलेल्या ठरावीक Google सेवांशी कनेक्ट केला जातो.

तुमचा फोन नंबर वापरणार्‍या काही सेवा पाहण्यासाठी, तुमच्या Google खाते चा फोन विभाग तपासा. अधिक जाणून घेण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी, सेवेवर क्लिक किंवा टॅप करा.

फोन नंबर वापरणार्‍या इतर Google सेवा त्या पेजवर सूचीबद्ध केलेल्या नसू शकतात. ठरावीक सेवांच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही तुमचा नंबर बदलू शकता जसे की, खाली दिलेल्या सेवा:

तुमचा नंबर कसा वापरला जावा ते बदला

ठरावीक सेवेसाठी तुमचे पर्याय पाहण्याकरिता, सेटिंग्जवर जा. तुम्हाला मदत हवी असल्यास support.google.com ला भेट द्या.

साइन-इन आणि खाते रिकव्हरी आणखी सुलभ करा

पुढील गोष्टी करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर वापरू शकता:

तुमच्याशी संपर्क साधण्यात लोकांना मदत करा

तुमचा फोन नंबर कोणी पहावा हे तुम्ही व्यवस्थापित करू शकता. तुमचा नंबर कोण पाहू शकते ते बदलण्यासाठी, माझ्याबद्दल वर जा.

Google सेवांवर तुम्हाला शोधण्यात आणि तुमच्याशी कनेक्ट करण्यात तुमचा फोन नंबर लोकांना कशी मदत करू शकतो ते जाणून घ्या. ही सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुमच्या Google खाते च्या फोन विभागावर जा.

"आणखी चांगल्या जाहिराती आणि Google सेवा" सुरू किंवा बंद करा

तुमच्यासाठी आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्याकरिता हे सेटिंग Google सेवांवर तुम्हाला तुमचा फोन नंबर वापरू देते. तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती नको असल्यास, हे सेटिंग बंद करा.

  1. तुमचे Google खाते उघडा.
  2. डावीकडे किंवा सर्वात वरती, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. "संपर्क माहिती" या विभागामध्ये, फोन वर क्लिक करा.
  4. तुम्हाला बदलायचा असलेला फोन नंबर निवडा.
  5. "प्राधान्ये" या अंतर्गत, "आणखी चांगल्या जाहिराती आणि Google सेवा" सुरू किंवा बंद करा.
टीप: तुम्ही ते सुरू केल्यास, वापर या विभागाच्या अंतर्गत "संपूर्ण Google" वर दिसेल.
संपूर्ण Google वरील तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करणे

तुमच्या "फोन" पेजवर "संपूर्ण Google वर" सूचीबद्ध केलेले असल्यास, हा नंबर सर्व Google सेवांवर वापरला जाऊ शकतो.

तुमचा नंबर अशा प्रकारे वापरला गेला आहे का ते तपासा

  1. तुमच्या Google खाते च्या फोन विभागावर जा.
  2. "वापर" च्या बाजूला, "संपूर्ण Google वर" शोधा.

तुमचा नंबर संपूर्ण Google वर वापरणे थांबवा

  1. तुमच्या Google खाते च्या फोन विभागावर जा.
  2. तुमच्या नंबरच्या बाजूला, हटवा Deleteand then नंबर काढून टाका निवडा.
  3. तुमच्या Google खाते च्या रिकव्हरी फोन विभागावर जा आणि तुमचा नंबर पुन्हा जोडा.
  4. तुमचा नंबर इतर Google सेवांमध्ये वापरणे सुरू ठेवण्यासाठी, त्या सेवांंवर जा आणि तो पुन्हा जोडा.

तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा

तुम्ही Google खाते सेट करता तेव्हा, Google ला तुमच्या फोनचा नंबर कळू देऊ शकता. तुम्ही तसे केल्यास, आम्ही तो नंबर तुमचाच असल्याची पडताळणी करू आणि तो अजूनही तुमचाच असल्याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी त्याची पुन्हा पडताळणी करू. तुमच्या नंबरची पडताळणी करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या फोन नंबरसह, तुमची वैयक्तिक माहिती Google कोणालाही विकत नाही. अधिक जाणून घेण्यासाठी, privacy.google.com ला भेट द्या.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12280788961143075971
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false