वेबवर तुमची भाषा बदलणे

Google सेवा सर्व Google भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेमध्ये डिस्प्ले भाषा कधीही बदलू शकता.
या सूचना फक्त वेबवरील Google सेवांमध्ये वापरली जाणारी तुमची प्राधान्य दिलेली भाषा बदलण्यासाठी आहेत. तुमच्या मोबाइल अ‍ॅप्ससाठी प्राधान्य दिलेली भाषा बदलण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवरील भाषा सेटिंग्ज अपडेट करा.

तुमची वेबची भाषा सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडे, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. "वेबसाठी सर्वसाधारण प्राधान्ये" या अंतर्गत, भाषा आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  4. तुमची प्राधान्य असलेली भाषा शोधा आणि निवडा.
  5. निवडा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला एकाहून अधिक भाषा समजत असल्यास, + दुसरी भाषा जोडा वर क्लिक करा.

तुम्ही तुमची भाषा प्राधान्ये बदलल्यानंतर, तुमचा ब्राउझर बंद करा आणि पुन्हा उघडा.

Google ने आपोआप जोडलेल्या भाषा कशा वापरायच्या

तुम्ही Google सेवांमध्ये वारंवार वापरत असलेल्या भाषा Google आपोआप जोडते. Google भाषा जोडते तेव्हा, तुमच्यासाठी जोडलेली Added for youम्हणून ती लेबल केली जाते.
  1. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडे, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. "वेबसाठी सर्वसाधारण प्राधान्ये" या अंतर्गत, भाषा वर क्लिक करा.
  4. एखादा पर्याय निवडा:
    • तुमच्यासाठी जोडलेली भाषा कंफर्म करण्यासाठी: सेव्ह करा निवडा.
    • Google ने जोडलेली भाषा काढून टाकण्यासाठी: हटवा Delete निवडा.
    • Google ला भाषा आपोआप जोडण्यापासून थांबवण्यासाठी: भाषा आपोआप जोडा बंद करा.

Google तुमची भाषा सेटिंग्ज कशी वापरते

Google सेवा आणखी उपयुक्त बनवण्यासाठी Google तुमची भाषा सेटिंग्ज वापरते. तुम्ही तुमची भाषा नमूद करता तेव्हा, तुमचा आशय दाखवण्यासाठी आणि तुमच्या प्राधान्य दिलेल्या एक किंवा अधिक भाषांमध्ये परिणाम दर्शवण्यासाठी तसेच जाहिरातींसारखा अधिक संबंधित, तुमचे स्वारस्य असू शकते असा तुमच्यासाठी तयार केलेला आशय देण्यात तुम्ही आम्हाला मदत करता.

भाषा बदलासंबंधी समस्यांचे निराकरण करणे

तुमची Google खाते भाषा तपासण्यासाठी, तुमचे Google खाते उघडा. तुम्ही निवडलेल्या भाषा तुम्हाला दिसतील.

  • भाषा बदल काम करत नाही: तुमचे Google खाते तुमच्या निवडलेल्या भाषेशी जुळत नसल्यास, तुमच्या ब्राउझरची कॅशे आणि कुकी साफ करणे हे करा आणि भाषा पुन्हा सेट करा.
    टीप: कुकी हटवल्याने, तुम्ही भेट दिलेल्या इतर साइटसाठी तुमची सेव्ह केलेली सेटिंग्जदेखील काढून टाकली जाते.
  • तुमची भाषा सूचीबद्ध नाही: आम्ही आमच्या उत्पादनांसाठी आणखी भाषांना सपोर्ट करण्यासाठी काम करतो. तुम्ही उपलब्ध नसलेली प्राथमिक भाषा निवडली असल्यास, आम्ही तुम्हाला पर्यायी भाषा निवडण्यास सांगू शकतो. पर्यायी भाषा आवश्यक असल्यास, तुमच्या Google खाते चा भाषा विभाग यामध्ये तुम्हाला तुमच्या प्राथमिक भाषेच्या खाली पर्यायी भाषा सापडू शकते. बदलण्यासाठी तुम्ही ती निवडू शकता.
  • मी मोबाइल डिव्हाइस वापरते/तो: तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेमध्ये केलेले बदल वेबवर दिसतात. मोबाइल अ‍ॅप्ससाठी प्राधान्य दिलेली भाषा बदलण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवरील भाषा सेटिंग्ज अपडेट करा.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2939661315425475039
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false