क्लिष्ट पासवर्ड आणि आणखी सुरक्षित खाते तयार करणे

सुरक्षित पासवर्ड आणि अपडेट केलेली रिकव्‍हरी माहिती तुमच्या Google खाते चे संरक्षण करण्यात मदत करते. तुमचा पासवर्ड ओळखण्यासाठी अवघड असावा आणि त्यामध्ये तुमची जन्मतारीख किंवा फोन नंबर यांसारख्या वैयक्तिक माहितीचा समावेश नसावा.

पायरी १: क्लिष्ट पासवर्ड तयार करणे

क्लिष्ट पासवर्ड तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करतो:

  • तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे
  • तुमचे ईमेल, फाइल आणि इतर आशय यांचे संरक्षण करणे
  • दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या खात्यामध्ये साइन इन करण्यापासून प्रतिबंधित करणे

पासवर्डच्या आवश्यकतांची पूर्तता करा

तुमचा पासवर्ड हा अक्षरे, अंक आणि चिन्हे (फक्त ASCII-मानक वर्ण) यांचे कोणतेही काँबिनेशन असू शकतो. ॲक्सेंट आणि ॲक्सेंटची खूण असलेल्या वर्णांना सपोर्ट नाही.

तुम्ही असा पासवर्ड वापरू शकत नाही जो:

  • विशेषतः कमकुवत आहे. उदाहरणार्थ: "password123"
  • तुम्ही याआधी तुमच्या खात्यासाठी वापरला आहे
  • रिक्त जागेने सुरू होतो किंवा संपतो

चांगल्या पासवर्डसाठी टिपा फॉलो करा

क्लिष्ट पासवर्ड तुमच्यासाठी लक्षात राहण्यासारखा असू शकतो पण, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकरिता अंदाज लावण्यासाठी जवळपास अशक्य असतो. चांगला पासवर्ड कसा तयार करता येतो याबद्दल जाणून घ्या, त्यानंतर तुमचा स्वतःचा पासवर्ड तयार करण्यासाठी या टिपा फॉलो करा.

तुमचा पासवर्ड युनिक बनवा

तुमचा ईमेल आणि ऑनलाइन बँकिंग यांसारख्या तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या खात्यांसाठी वेगळा पासवर्ड वापरा.

महत्त्वाच्या खात्यांसाठी पासवर्ड पुन्हा वापरणे धोकादायक आहे. एखाद्या व्यक्तीला तुमच्या एका खात्याचा पासवर्ड मिळाल्यास, ती तुमचा ईमेल ॲक्सेस करू शकते आणि तुमचा पत्ता व पैसेदेखील वापरू शकते.

टीप: तुम्हाला एकाहून अधिक पासवर्ड लक्षात ठेवण्यात समस्या येत असल्यास, तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड व्यवस्थापित करण्यासाठी टूल वापरणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमचा पासवर्ड मोठा आणि जास्त काळ लक्षात राहील असा तयार करा

मोठे पासवर्ड क्लिष्ट असतात, त्यामुळे तुमचा पासवर्ड किमान १२ वर्णांचा तयार करा. या टिपा तुम्हाला लक्षात ठेवण्यास सोपे असे मोठे पासवर्ड तयार करण्यात मदत करू शकतात. पुढील गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा:

  • एखाद्या गाण्याची किंवा कवितेची ओळ
  • एखाद्या चित्रपटामधील किंवा भाषणामधील अर्थपूर्ण वाक्य
  • एखाद्या पुस्तकातील उतारा
  • तुमच्यासाठी अर्थपूर्ण असलेल्या शब्दांच्या मालिका
  • संक्षेप: एका वाक्यातील प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरापासून पासवर्ड तयार करा

पुढील व्यक्ती अंदाज लावू शकतील असे पासवर्ड निवडणे टाळा:

  • तुम्हाला ओळखणारे लोक
  • (तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलसारखी) सहज ॲक्सेस करण्यायोग्य माहिती शोधणारे लोक

वैयक्तिक माहिती आणि सामान्य शब्द टाळा

वैयक्तिक माहिती वापरू नका

इतरांना माहीत असू शकेल किंवा सहज शोधता येऊ शकेल अशा माहितीवरून पासवर्ड तयार करणे टाळा. उदाहरणे:

  • तुमचे टोपणनाव किंवा आद्याक्षरे
  • तुमच्या लहान मुलाचे किंवा पाळीव प्राण्याचे नाव
  • महत्त्वाचे वाढदिवस किंवा वर्षे
  • तुमच्या पत्त्यामधील रस्त्याचे नाव
  • तुमच्या पत्त्यामधील अंक
  • तुमचा फोन नंबर

सामान्य शब्द किंवा पॅटर्न वापरू नका

अंदाज लावण्यास सोपे असे साधे शब्द, वाक्ये आणि पॅटर्न टाळा. उदाहरणे:

  • "password" किंवा "letmein" यांसारखे सहज समजणारे शब्द आणि वाक्ये
  • "abcd" किंवा "1234" यांसारखे क्रम
  • "qwerty" किंवा "qazwsx" यांसारखे कीबोर्ड पॅटर्न

पासवर्ड सुरक्षित ठेवा

तुम्ही क्लिष्ट पासवर्ड तयार केल्यानंतर, तो सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावले उचला.

लिहिलेले पासवर्ड लपवा

तुमच्यासाठी तुमचा पासवर्ड लिहून ठेवणे आवश्यक असल्यास, तो तुमच्या काँप्युटर किंवा डेस्‍कवर ठेवू नका. लिहिलेले कोणतेही पासवर्ड गुप्त किंवा लॉक केलेल्या ठिकाणी स्टोअर केल्याची खात्री करा.

एखादे टूल वापरून तुमचे पासवर्ड व्यवस्थापित करा

तुम्हाला एकाहून अधिक पासवर्ड लक्षात ठेवण्यात समस्या येत असल्यास, विश्वसनीय पासवर्ड व्यवस्थापक वापरण्याचा विचार करा. या सेवांची परीक्षणे आणि विश्वसनीयता यांबद्दल माहिती शोधण्यासाठी थोडा वेळ द्या.

तुम्ही तुमच्यासाठी पासवर्ड सेव्ह करण्याकरिता तुमचे Google खाते वापरणे हेदेखील करू शकता.

दुसरी पायरी: एखाद्या व्यक्तीला तुमचा पासवर्ड मिळाल्यास, त्यासाठी तयार रहा

आम्हाला तुमच्या खात्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळी ॲक्टिव्हिटी आढळल्यास, तुम्हाला मदत करण्यासाठी तुमची रिकव्हरीची माहिती वापरली जाते.

रिकव्हरी ईमेल ॲड्रेस जोडणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. संपर्क माहिती पॅनलवर, ईमेल वर क्लिक करा.
  4. रिकव्हरी ईमेल जोडा वर क्लिक करा.

रिकव्हरी फोन नंबर जोडणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, वैयक्तिक माहिती वर क्लिक करा.
  3. संपर्क माहिती पॅनलवर, फोन वर क्लिक करा.
  4. रिकव्हरी फोन जोडा वर क्लिक करा.

रिकव्हरीची माहिती तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकते:

  • दुसरी एखादी व्यक्ती तुमचे खाते वापरत आहे का ते जाणून घेणे
  • दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमचा पासवर्ड माहीत असल्यास, तुमच्या खात्याचा ॲक्सेस पुन्हा मिळवणे
  • तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास किंवा दुसऱ्या कारणामुळे साइन इन करू शकत नसल्यास, तुमच्या खात्यामध्ये साइन इन करणे

तुमचे खाते आणखी सुरक्षित करा

तुमच्या खात्याच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करणे हे करण्यासाठी पर्सनलाइझ केलेला सल्ला मिळवा.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3121784316362222388
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false