तुमचा स्थान इतिहास व्यवस्थापित करणे

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

स्थान इतिहास हे असे Google खाते सेटिंग आहे, जे टाइमलाइन तयार करते, जी तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात ठेवण्यात मदत करणारा वैयक्तिक नकाशा तयार करते: 

  • तुम्ही जाता ती ठिकाणे
  • गंतव्यस्थानांकडे जाणारे मार्ग
  • तुम्ही करत असलेले प्रवास

तुम्ही कुठे जाता त्यानुसार ते तुम्हाला संपूर्ण Google वर पर्सनलाइझ केलेले अनुभवदेखील देऊ शकतात.

स्थान इतिहास सुरू असेल, तेव्हा Google अ‍ॅप्स वापरली जात नसली, तरीही तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान पुढील गोष्टींवर नियमितपणे सेव्ह केले जाते:

  • तुमची डिव्हाइस 
  • Google सर्व्हर

Google चे अनुभव प्रत्येकासाठी उपयुक्त करण्याकरिता, आम्ही तुमचा डेटा पुढील गोष्टींसाठी वापरू शकतो:

  • अ‍ॅनोनिमाइझ केलेल्या स्थान डेटानुसार माहिती दाखवणे, जसे की:
    • लोकप्रिय वेळा
    • पर्यावरणाशी संबंधित इनसाइट
  • घोटाळा आणि गैरवर्तन डिटेक्ट करणे व रोखणे.
  • जाहिरात उत्पादनांसारख्या Google सेवांमध्ये सुधारणा करणे आणि त्या विकसित करणे.
  • तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करणेहे केलेले असल्यास, लोक त्यांच्या स्टोअरना जाहिरातीमुळे भेट देतात का हे निर्धारित करण्यात व्यवसायांना मदत करणे.
    • आम्ही व्यवसायांसोबत वैयक्तिक डेटा शेअर न करता फक्त निनावी अंदाज शेअर करतो.
    • या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भाग आणि आयपी अ‍ॅड्रेस यांवरील तुमच्या स्थानाबद्दलच्या माहितीचा समावेश असू शकतो.

Google हे स्थान डेटा कसे वापरते याबद्दल अधिक जाणून घ्या.

स्थान इतिहास याबद्दल माहीत असाव्यात अशा गोष्टी:

  • स्थान इतिहास बाय डीफॉल्ट बंद असतो. तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असेल, तरच आम्ही तो वापरू शकतो.
  • तुम्ही Google खाते ची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल यामध्ये स्थान इतिहास कधीही बंद करू शकता.
  • तुम्ही तुमचा स्थान इतिहास याचे पुनरावलोकन करू शकता आणि तो व्यवस्थापित करू शकता. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांचे Google Maps टाइमलाइन मध्ये पुनरावलोकन करणे.
    • तुमचा स्थान इतिहास कधीही संपादित करणे किंवा हटवणे.
महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 8.0 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

स्थान इतिहास सुरू किंवा बंद करा

तुम्ही तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास कधीही बंद करू शकता. तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरत असल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने हे सेटिंग तुमच्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांनी तसे केल्यास, तुम्हाला इतर कोणत्याही वापरकर्त्याप्रमाणे स्थान इतिहास वापरता येईल.

  1. तुमच्या Google खाते चा "स्थान इतिहास" विभाग यावर जा.
  2. तुमचे खाते किंवा तुमची डिव्हाइस Google ला स्थान इतिहास याचा अहवाल देऊ शकतात का ते निवडा.
    • तुमचे खाते आणि सर्व डिव्हाइस: सर्वात वरती, स्थान इतिहास सुरू किंवा बंद करा.
    • फक्त ठरावीक डिव्हाइस: "हे डिव्हाइस" किंवा "या खात्यावरील डिव्हाइस" या अंतर्गत, डिव्हाइस सुरू किंवा बंद करा.

स्थान इतिहास सुरू असताना

पुढील गोष्टी वापरून Google तुमच्या स्थानाचा अंदाज लावू शकते:

  • वाय-फाय सारखे सिग्नल आणि मोबाइल नेटवर्क
  • GPS
  • सेन्सरशी संबंधित माहिती

तुमच्या डिव्हाइसचे स्थान वेळोवेळी बॅकग्राउंडमध्येदेखील वापरले जाऊ शकते. स्थान इतिहास सुरू असताना, Google अ‍ॅप्स वापरली जात नसतानादेखील, तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान पुढील गोष्टींवर नियमितपणे सेव्ह केले जाते:

  • तुमची डिव्हाइस
  • Google सर्व्हर

तुम्ही तुमचे Google खाते वापरून साइन इन केलेले असताना, ते “या खात्यावरील डिव्हाइस” हे सेटिंग सुरू करून प्रत्येक डिव्हाइसचा स्थान इतिहास सेव्ह करते. हे सेटिंग तुम्हाला तुमच्या Google खाते च्या स्थान इतिहास सेटिंग्जमध्ये सापडू शकते.

कोणत्या डिव्हाइसनी त्यांचा स्‍थान डेटा स्थान इतिहास याला पुरवावा हे तुम्ही निवडू शकता. तुमच्या डिव्हाइसवरील इतर स्थान सेवांसाठी तुमची सेटिंग्ज बदलत नाहीत, जसे की:

स्थान इतिहास बंद असताना

तुमचे डिव्हाइस त्याचे स्थान तुमचा स्थान इतिहास यामध्ये सेव्ह करत नाही.

  • तुमच्याकडे तुमच्या खात्यामधील मागील स्थान इतिहास असू शकतो. तुम्ही मॅन्युअली तो कधीही हटवणे हे करू शकता.
  • तुमच्या डिव्हाइसवरील इतर स्थान सेवांसाठी तुमची सेटिंग्ज बदलत नाहीत, जसे की:
  • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यासारखी सेटिंग्ज सुरू असल्यास, पण तुम्ही स्थान इतिहास बंद केल्यास किंवा स्थान इतिहास यामधून स्‍थान डेटा हटवल्यास, तुमचे Google खाते तरीही इतर Google साइट, अ‍ॅप्स व सेवांच्या तुमच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा सेव्ह करू शकते. या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भागावरील आणि आयपी अ‍ॅड्रेसवरील तुमच्या स्थानाबद्दलच्या माहितीचा समावेश असू शकतो.

स्थान इतिहास हटवा

तुम्ही Google Maps टाइमलाइन वापरून तुमची स्थान इतिहास यासंबंधीची माहिती व्यवस्थापित करू किंवा हटवू शकता. तुम्ही तुमचा सर्व इतिहास किंवा त्यातील फक्त काही भाग हटवणे निवडू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही टाइमलाइन मधून स्थान इतिहास यासंबंधीची माहिती हटवता तेव्हा, तुम्हाला ती पुन्हा पाहता येणार नाही.

Google Maps अ‍ॅप वापरा

सर्व स्थान इतिहास हटवा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी  आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "स्थान सेटिंग्ज" या अंतर्गत, सर्व स्थान इतिहास हटवा वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास याची रेंज हटवा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "स्थान सेटिंग्ज" या अंतर्गत, स्थान इतिहास याची रेंज हटवा वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास यामधून दिवस हटवा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. कॅलेंडर Show calendar दाखवा वर टॅप करा.
  4. तुम्हाला हटवायचा असलेला दिवस निवडा.
  5. आणखी आणि त्यानंतर दिवस हटवा वर टॅप करा.
  6. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास यामधून थांबा हटवा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. कॅलेंडर Show calendar दाखवा वर टॅप करा.
  4. तुम्हाला हटवायच्या असलेल्या थांब्यासह दिवस निवडा.
  5. तुम्हाला हटवायचा असलेला थांबा आणि त्यानंतर हटवा हटवा वर टॅप करा.
  6. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

वेब ब्राउझर वापरा

सर्व स्थान इतिहास हटवा

  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, तुमची Google Maps टाइमलाइन उघडा.
  2. हटवा हटवा वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास यामधून दिवस हटवा

  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, तुमची Google Maps टाइमलाइन उघडा.
  2. तुम्हाला हटवायचे असलेले वर्ष, महिना आणि दिवस निवडा.
  3. हटवा हटवा वर टॅप करा.
  4. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास यामधून थांबा हटवा

  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, तुमची Google Maps टाइमलाइन उघडा.
  2. तुम्हाला हटवायचे असलेले वर्ष, महिना आणि दिवस निवडा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या थांब्याच्या बाजूला, आणखी आणखीआणि त्यानंतर दिवसामधून थांबा हटवा वर टॅप करा.
  4. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुमचा स्थान इतिहास आपोआप हटवा

तुम्ही ३, १८ किंवा ३६ महिन्यांपेक्षा जुना असलेला स्थान इतिहास आपोआप हटवणे निवडू शकता.

Google Maps अ‍ॅप वापरा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "स्थान सेटिंग्ज" वर स्क्रोल करा.
  5. स्थान इतिहास आपोआप हटवा वर टॅप करा.
  6. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

वेब ब्राउझर वापरा

  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, तुमची Google Maps टाइमलाइन उघडा. 
  2. तळाशी उजवीकडे, सेटिंग्ज Settings icon आणि त्यानंतर स्थान इतिहास आपोआप हटवा वर क्लिक करा. 
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा. 

तुम्ही तुमचा काही किंवा सर्व स्थान इतिहास हटवल्यानंतर काय होते

तुम्ही तुमचा काही किंवा सर्व स्थान इतिहास हटवल्यास, Google वरील पर्सनलाइझ केलेल्या काही अनुभवांची गुणवत्ता कमी होऊ शकते किंवा गमावली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही पुढील गोष्टी गमावू शकता:

  • तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांवर आधारित शिफारशी
  • रहदारीमध्ये अडकू नये यासाठी घरी किंवा ऑफिसला जाण्यासाठी निघण्याच्या सर्वोत्तम वेळेबद्दल रीअल-टाइम माहिती

महत्त्वाचे: तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी इतर सेटिंग्ज सुरू केल्यास आणि स्थान इतिहास थांबवल्यास किंवा स्थान इतिहास यामधून स्थान डेटा हटवल्यास, तुमच्या इतर Google साइट, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा तरीही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा Search आणि Maps यांवरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून स्थान डेटा सेव्ह केला जाऊ शकतो व तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भागावरील तुमच्या स्थानाविषयीची माहिती व आयपी ॲड्रेस यांचा समावेश असू शकतो.

स्थान इतिहास याचा वापर आणि निदान याबद्दल जाणून घ्या

तुम्ही स्थान इतिहास सुरू केल्यानंतर, स्थान इतिहास यासाठी कोणती गोष्ट काम करत आहे आणि कोणती काम करत नाही याबद्दलच्या निदानाबाबतची माहिती तुमचे डिव्हाइस Google ला पाठवू शकते. Google हे Google चे गोपनीयता धोरण या अंतर्गत गोळा केलेल्या कोणत्याही माहितीवर प्रक्रिया करते.

 

तुमचे डिव्हाइस कोणती माहिती शेअर करू शकते

Google अ‍ॅप्स, उत्पादने आणि Android डिव्हाइस यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, तुमचे डिव्हाइस Google ला माहिती पाठवू शकते. उदाहरणार्थ, Google ही माहिती पुढील गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरू शकते:

  • बॅटरी लाइफ: साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यांसाठी बॅटरीचा वापर कमी करण्याकरिता, तुमच्या डिव्हाइसवरील कोणती अ‍ॅप्स सर्वाधिक बॅटरी वापरतात त्याचा आम्ही अंदाज करतो.
  • स्थान अचूकता: अ‍ॅप्स आणि सेवांसाठी स्थानाच्या अंदाजांमध्ये सुधारणा करण्याकरिता, आम्ही स्थान सेन्सर आणि सेटिंग्ज वापरतो.

तुमचा फोन Google ला पाठवू शकत असलेल्या माहितीमध्ये पुढील गोष्टी असू शकतात:

  • पुढील गोष्टींशी असलेल्या तुमच्या कनेक्शनची गुणवत्ता आणि कालावधी:
    • मोबाइल नेटवर्क
    • GPS
    • वाय-फाय नेटवर्क
    • ब्लूटूथ
  • तुमच्या स्थान सेटिंग्जची स्थिती
  • रीस्टार्ट आणि क्रॅश अहवाल
  • स्थान इतिहास सुरू किंवा बंद करण्यासाठी तुम्ही वापरत असलेली Google अ‍ॅप्स
शेअर केलेली माहिती Google ला सुधारणा करण्यात कशी मदत करते

वापर आणि निदान माहिती ही Google अ‍ॅप्स, उत्पादने आणि Android डिव्हाइस यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करू शकते. उदाहरणार्थ, Google ही माहिती पुढील गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरू शकते:

  • बॅटरी लाइफ: सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यांसाठी बॅटरीचा वापर कमी करण्यात मदत करण्याकरिता, तुमच्या डिव्हाइसवर सर्वाधिक बॅटरी कशासाठी वापरली जात आहे याबद्दलची माहिती Google वापरू शकते.
  • स्थान अचूकता: अ‍ॅप्स आणि सेवांसाठी स्थान अंदाजांमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, Google हे स्थान सेन्सर आणि सेटिंग्जमधील माहिती वापरू शकते.

 

 

इतर स्थान सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
8875521836644915957
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false