इनॅक्टिव्ह खाते व्यवस्थापक याबद्दल

वापरकर्त्यांच्या खात्याच्या डेटाचे भाग शेअर करणे किंवा एखादी व्यक्ती ठरावीक कालावधीसाठी निष्क्रिय असल्यास, तिला सूचित करणे यासाठी निष्क्रिय खाते व्यवस्थापक हा एक मार्ग आहे. ते सेट करण्यासाठी, तुमचे इनॅक्टिव्ह खाते व्यवस्थापक पेज यावर जा आणि सुरू करा वर क्लिक करा.

आम्ही अ‍ॅक्टिव्हिटी कशी शोधतो?

तुम्ही तुमचे Google खाते अजूनही वापरत आहात का हे समजून घेण्यासाठी आम्ही बरेच सिग्नल पाहतो. यांमध्ये तुमची शेवटची साइन-इन, माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील तुमची अलीकडील अ‍ॅक्टिव्हिटी, Gmail (उदा., तुमच्या फोनवरील Gmail अ‍ॅप) चा वापर आणि Android चेक-इन यांचा समावेश आहे.

तुमचे खाते हटवले गेल्यावर काय होते?

तुमचे Google खाते हटवल्याने, त्या खात्याशी संबंधित सर्व उत्पादनांवर परिणाम होईल (उदा., Blogger, AdSense, Gmail) आणि प्रत्येक उत्पादनावर वेगळ्या प्रकारे परिणाम होईल. तुम्ही Google Dashboard वर तुमच्या खात्याशी संबंधित डेटाचे पुनरावलोकन करू शकता. तुम्ही तुमच्या खात्यासोबत Gmail वापरत असल्यास, तुम्हाला यापुढे तो ईमेल अ‍ॅक्सेस करता येणार नाही. तसेच तुम्हाला तुमचे Gmail वापरकर्ता नाव पुन्हा वापरता येणार नाही.

मला विश्वासू संपर्काचा फोन नंबर पुरवण्याची आवश्यकता का आहे?

फक्त विश्वासू संपर्क तुमचा डेटा प्रत्यक्षात डाउनलोड करू शकतात याची खात्री करण्याच्या एकमेव उद्देशाने आम्ही हा फोन नंबर वापरू. मोबाइल फोन नंबर वापरून ओळखीची पडताळणी केल्याने, आम्ही तुमच्या विश्वासू संपर्काला पाठवत असलेला ईमेल मिळवू शकतील असे अनधिकृत लोक डेटा अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत.

विश्वासू संपर्कांना काय मिळेल?

तुमचे खाते विशिष्ट कालावधीसाठी इनॅक्टिव्ह राहिल्यावर संपर्कांना फक्त एकदा सूचना मिळेल -- सेटअपदरम्यान त्यांना कोणतीही सूचना मिळणार नाही. तुम्ही तुमच्या संपर्कांना फक्त तुमच्या इनॅक्टिव्ह खात्याबाबत सूचित करणे निवडल्यास, त्यांना विषय आणि तुम्ही सेटअपदरम्यान लिहिलेला आशय यांचा समावेश असलेला ईमेल मिळेल. तुम्ही तुमचे खाते वापरणे थांबवल्यानंतर Google ला तुमच्या वतीने ईमेल पाठवण्याची सूचना दिली आहे असे स्पष्ट करणारे फूटर आम्ही त्या ईमेलमध्ये जोडू. या फूटरमध्ये यासारखे काहीतरी असू शकेल:

जॉन डो (john.doe@gmail.com) यांनी Google ला अशी सूचना दिली आहे की, जॉन यांनी हे खाते वापरणे थांबवल्यानंतर तुम्हाला हा ईमेल आपोआप पाठवावा.

विनम्र,
Google खाती टीम

तुम्ही तुमच्या विश्वासू संपर्कासोबत डेटा शेअर करणे निवडल्यास, तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी निवडलेल्या डेटाची सूची आणि डेटा डाउनलोड करण्यासाठी त्यांना फॉलो करता येणारी लिंक यांचादेखील ईमेलमध्ये समावेश असेल. अशा मेसेजचे उदाहरण पुढीलप्रमाणे असू शकेल:

जॉन डो (john.doe@gmail.com) यांनी Google ला अशी सूचना दिली आहे की, जॉन यांनी हे खाते वापरणे थांबवल्यानंतर तुम्हाला हा ईमेल आपोआप पाठवावा.

जॉन डो यांनी तुम्हाला पुढील खाते डेटाचा अ‍ॅक्सेस दिला आहे:

  • Blogger
  • Drive
  • मेल
  • YouTube

जॉन यांचा डेटा येथे डाउनलोड करा.

विनम्र,
Google खाती टीम

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11466134200761144812
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false