तुमची अ‍ॅप्स सुरक्षित ठेवण्यात आणि तुमचा डेटा खाजगी ठेवण्यात मदत करण्यासाठी Google Play Protect वापरणे

Google Play Protect हे तुमच्या अ‍ॅप्स आणि डिव्हाइसमधील हानिकारक वर्तनासंबंधित तपासणी करते.

  • हे तुम्ही अ‍ॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी Google Play Store वरून सुरक्षितता तपासणी रन करते.
  • हे इतर स्रोतांकडील संभाव्यतः हानिकारक अ‍ॅप्ससाठी तुमचे डिव्हाइस तपासते. या हानिकारक अ‍ॅप्सना काही वेळा मालवेअर म्हटले जाते.
  • हे तुम्हाला संभाव्य हानिकारक अ‍ॅप्सबद्दल चेतावणी देते.
  • हे तुमच्या डिव्हाइसमधील हानिकारक ॲप्स डीॲक्टिव्हेट करू शकते किंवा ती काढून टाकू शकते.
  • हे तुम्हाला डिटेक्ट केलेल्या महत्त्वाची माहिती लपवून किंवा चुकीची माहिती देऊन आमच्या नकोसे सॉफ्टवेअर धोरण याचे उल्लंघन करणाऱ्या ॲप्सबद्दल चेतावणी देते.
  • हे तुम्हाला अशा अ‍ॅप्सबद्दल गोपनीयता सूचना पाठवते जी आमचे डेव्हलपर धोरण याचे उल्लंघन करून तुमची वैयक्तिक माहिती अ‍ॅक्सेस करण्यासाठी वापरकर्त्याच्या परवानग्या मिळवू शकतात.
  • हे विशिष्ट Android आवृत्त्यांवर तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी अ‍ॅप परवानग्या रीसेट करू शकते.
  • हे पडताळणी न केलेले आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी स्कॅमरद्वारे सामान्यतः लक्ष्य केल्या जाणाऱ्या डिव्हाइसशी संबंधित संवेदनशील परवानग्या वापरणारे अ‍ॅप्लिकेशन इंस्टॉल केले जाण्यापासून प्रतिबंधित करू शकते. 

तुमच्या डिव्हाइस सर्टिफिकेशन स्टेटसची पडताळणी करा

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकन वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. तुमचे डिव्हाइस Play Protect प्रमाणित आहे का ते तपासण्यासाठी, याविषयी वर टॅप करा.

Google Play Protect सुरू किंवा बंद कसे करावे

महत्त्वाचे: Google Play Protect हे बाय डीफॉल्ट सुरू असते पण, तुम्ही ते बंद करू शकता. सुरक्षेसाठी, Google Play Protect तुम्ही नेहमीच सुरू ठेवावे अशी आम्ही शिफारस करतो.

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play Protect आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  4. Play Protect वापरून अ‍ॅप्स स्कॅन करा सुरू किंवा बंद करा.

Google ला अज्ञात अ‍ॅप्स पाठवा

तुम्ही Google Play Store बाहेरील अज्ञात स्रोतांवरून अ‍ॅप्स इंस्टॉल केल्यास, Google Play Protect हे तुम्हाला अज्ञात अ‍ॅप्स Google ला पाठवण्यास सांगू शकते. तुम्ही “हानिकारक अ‍ॅप डिटेक्शनमध्ये सुधारणा करा” हे सेटिंग सुरू करता तेव्हा, अज्ञात अ‍ॅप्स आपोआप Google ला पाठवण्याची Google Play Protect ला अनुमती देता.

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play Protect आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  4. हानिकारक अ‍ॅप डिटेक्शनमध्ये सुधारणा करा सुरू किंवा बंद करा.

डेव्हलपरसाठी माहिती

तुम्ही अ‍ॅप डेव्हलपर असल्यास, तुम्हाला तुमच्या अ‍ॅपची प्रत्येक नवीन आवृत्ती Google ला पाठवण्यास सांगितली जाऊ शकते. Google Play Protect ने तुमच्या अ‍ॅपला हानिकारक असे फ्लॅग केल्यास:
  • वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि वापरकर्त्यांना सुरक्षित आणि संरक्षित वातावरण देण्यासंदर्भातील मार्गदर्शनासाठी Google Play डेव्हलपर धोरण केंद्र याला भेट द्या
  • नकोसे सॉफ्टवेअर यावरील Google धोरणाविषयी अधिक जाणून घ्या.

तुमचे अ‍ॅप Google Play Protect ने चुकून फ्लॅग किंवा ब्लॉक केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आवाहन करणे हे करा.

Google Play Protect कसे काम करते

तुम्ही अ‍ॅप्स इंस्टॉल करता तेव्हा, Google Play Protect ती तपासते. हे वेळोवेळी तुमचे डिव्हाइस स्कॅनदेखील करते. त्याने संभाव्य हानिकारक अ‍ॅप डिटेक्ट केल्यास ते कदाचित पुढील गोष्टी करू शकते:

  • तुम्हाला सूचना पाठवणे. अ‍ॅप काढून टाकण्यासाठी, सूचनेवर टॅप करा त्यानंतर अनइंस्टॉल करा वर टॅप करा.
  • तुम्ही अ‍ॅप अनइंस्टॉल करेपर्यंत ते बंद करणे.
  • अ‍ॅप आपोआप काढून टाकणे. बहुतांश प्रकरणांमध्ये, एखादे हानिकारक अ‍ॅप आढळल्यास, तुम्हाला अ‍ॅप काढून टाकल्याची सूचना मिळते.

मालवेअर संरक्षण कसे काम करते

दुर्भावनापूर्ण तृतीय पक्ष सॉफ्टवेअर, URLs आणि सुरक्षेशी संबंधित इतर समस्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी Google पुढील गोष्टींबद्दल माहिती मिळवू शकते:

  • तुमच्या डिव्हाइसची नेटवर्क कनेक्शन
  • संभाव्यतः हानिकारक URLs
  • Google Play किंवा इतर स्रोतांद्वारे तुमच्या डिव्हाइसवरील ऑपरेटिंग सिस्टीम आणि इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स.

असुरक्षित असू शकते अशा अ‍ॅप किंवा URL बद्दल तुम्हाला Google कडून चेतावणी मिळू शकते. अ‍ॅप किंवा URL ही डिव्हाइस, डेटा अथवा वापरकर्त्यांसाठी हानिकारक आहे असे समजले जात असल्यास, Google कडून त्याचे इंस्टॉलेशन काढून टाकले जाऊ शकते किंवा ते ब्लॉक केले जाऊ शकते. Google Play Protect द्वारे यापूर्वी कधीही स्कॅन न केलेले, Google Play च्या बाहेरील अ‍ॅप स्कॅन करण्याची तुम्हाला शिफारस केली जाऊ शकते. ॲप स्कॅन केल्याने ॲपचे तपशील हे कोड पातळीवरील मूल्यमापनासाठी Google कडे पाठवले जातील. थोड्या वेळाने, तुम्हाला ॲप इंस्टॉल करणे सुरक्षित वाटत असल्याचे किंवा स्कॅनने निर्धारित केल्यानुसार ॲप संभाव्यतः हानिकारक असल्याचे कळवणारा परिणाम मिळेल.

तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये यांपैकी काही संरक्षणे बंद करणे निवडू शकता. पण, Google Play द्वारे इंस्टॉल केलेल्या अ‍ॅप्सशी संबंधित माहिती मिळवणे Google पुढे सुरू ठेवू शकते आणि इतर स्रोतांद्वारे तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स Google ला माहिती न पाठवता सुरक्षेशी संबंधित समस्यांसाठी तपासली जाणे पुढे सुरू ठेवू शकतात.

Google हे न वापरलेल्या अ‍ॅप्सच्या परवानग्या कसे रीसेट करते

तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी, Google Play Protect हे तुम्ही क्वचित वापरता त्या अ‍ॅप्सच्या अ‍ॅप परवानग्या रीसेट करू शकते. हे वैशिष्ट्य Android च्या 6.0–10 या आवृत्त्या रन करणाऱ्या डिव्हाइसचे संरक्षण करते. 

Google हे तुम्ही तीन महिने न वापरलेल्या अ‍ॅप्सना दिलेल्या परवानग्या रीसेट करू शकते. असे झाल्यावर तुम्हाला Play Protect कडून सूचना मिळू शकते. Play Protect हे तुमच्या डिव्हाइसला नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅप्सच्या परवानग्या आपोआप रीसेट करत नाही.

कोणत्या अ‍ॅप परवानग्या रीसेट करायच्या त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play Protect आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  4. न वापरलेल्या अ‍ॅप्सच्या परवानग्या वर टॅप करा.

Play Protect ला आपोआप परवानग्या रीसेट करण्यापासून रोखण्यासाठी:

  1. सूचीमधून, अ‍ॅप निवडा.
  2. अ‍ॅप न वापरल्यास, परवानग्या काढून टाका हे बंद करा.

वैयक्तिक अ‍ॅपसाठी हे सेटिंग सुरू आणि बंद करण्यासाठी पुढील गोष्टी करा:

  1. अ‍ॅप आणि त्यानंतर परवानग्या निवडा.
  2. अ‍ॅप वापरले नसल्यास परवानग्या काढून टाका सुरू किंवा बंद करा.

तुम्ही परवानग्या काढून टाकल्यानंतर, Play Protect त्या परवानग्या पुन्हा देत नाही, पण ते आणखी कोणत्याही परवानग्या रीसेट करत नाही.

गोपनीयता सूचना कशा काम करतात

एखादे अ‍ॅप Google Play Store मधून काढून टाकल्यास, Google Play Protect तुम्हाला सूचना देईल कारण ते अ‍ॅप तुमची वैयक्तिक माहिती अ‍ॅक्सेस करू शकते त्यामुळे तुमच्याकडे अ‍ॅप अनइंस्टॉल करण्याचा पर्याय असेल. 
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12810964202842615095
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false