विश्वसनीय काँप्युटर जोडणे किंवा काढून टाकणे

तुमच्या Google खाते मध्ये साइन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी २-टप्पी पडताळणी कोड एंटर करायचा नसल्यास किंवा तुमची सिक्युरिटी की वापरायची नसल्यास, तुम्ही तुमचा काँप्युटर अथवा मोबाइल डिव्हाइस विश्वसनीय म्हणून मार्क करू शकता. विश्वसनीय काँप्युटर आणि डिव्हाइससह, साइन इन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी पडताळणी कोड एंटर करण्याची गरज नाही.

विश्वसनीय काँप्युटर आणि डिव्हाइस जोडणे

  1. तुमचा विश्वास असलेल्या काँप्युटर किंवा डिव्हाइसवर साइन इन करा.
  2. तुम्ही पडताळणी कोड एंटर करता तेव्हा, या काँप्युटरवर पुन्हा विचारू नका निवडा.

तुम्हाला विश्वसनीय डिव्हाइसवर २-टप्पी पडताळणी करण्यास सांगितले जाते

तुम्ही साइन इन करताना "या काँप्युटरवर पुन्हा विचारू नका" च्या बाजूच्या चौकटीत खूण केली असली तरीही, तुम्हाला २-टप्पी पडताळणी वापरून साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते. तुमच्या Chrome किंवा Firefox यांसारख्या ब्राउझरमध्ये कुकी सुरू केलेल्या नसल्यामुळे किंवा तो ठरावीक कालावधीनंतर कुकी हटवण्यासाठी सेट केलेला असल्यामुळे सहसा असे होते.

साइन इन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी २-टप्पी पडताळणी कोड एंटर करायचा नसल्यास किंवा तुमची सिक्युरिटी की वापरायची नसल्यास, या पायर्‍या वापरून पहा:

  1. तुमच्या ब्राउझरची कुकी सेटिंग्ज संपादित करा. तुम्ही तुमचा ब्राउझर कुकी सेव्ह करण्यासाठी सेट करू शकता किंवा [*.]google.com जोडून Google खाते कुकीसाठी एक्सेप्शन जोडू शकता. तुमची सेटिंग्ज कशी संपादित करायची याबाबत अधिक माहितीसाठी, तुमचा ब्राउझर निवडा:
  2. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वेगळ्या ब्राउझरसाठी किंवा काँप्युटरसाठी "या काँप्युटरवर पुन्हा विचारू नका" निवडा. साइन इन करण्यासाठी तुम्ही वेगळे ब्राउझर किंवा काँप्युटर वापरत असल्यास, प्रत्येक काँप्युटरवर या चौकटीत खूण केल्याची आणि प्रत्येक ब्राउझरवर तुमची कुकी सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट केल्याची खात्री करा.

तुमच्या विश्वसनीय सूचीमधून काँप्युटर आणि डिव्हाइस काढून टाकणे

  1. तुमचे Google खाते उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. सुरक्षा वर क्लिक करा.
  3. "तुमची डिव्हाइस" विभागामध्ये, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला जे डिव्हाइस साइन आउट करायचे आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर साइन आउट करा.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8595017939687978491
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false