खाते तयार करण्यासाठी Google ठरावीक माहिती का विचारते

तुम्ही Google खाते तयार करता, तेव्हा आम्ही काही वैयक्तिक माहिती विचारतो. ही माहिती तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करते आणि आमच्या सेवा अधिक उपयुक्त बनवते.

आम्ही ही माहिती कशी वापरतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Google गोपनीयता धोरण वाचा.

आम्ही काय आणि का विचारतो

नाव

तुम्हाला Google सेवांवर वापरायचे असलेले नाव एंटर करा. तुम्ही दस्तऐवज किंवा फोटो यांसारखा आशय इतरांसोबत शेअर करता, तेव्हा तुमचे नाव त्यासोबत दिसते.

वापरकर्ता नाव

myname@gmail.com यासारखे तुम्ही तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी वापराल असे वापरकर्तानाव एंटर करा.

  • तुम्ही Gmail ॲड्रेस तयार कराल किंवा तुमच्याकडे आधीपासून असलेला ईमेल ॲड्रेस वापराल जो Gmail चा नसेल.
  • तुम्ही अक्षरे, अंक आणि पूर्णविराम वापरू शकता.
  • तुमचे वापरकर्ता नाव केस-सेन्सिटिव्ह नाही. तुम्हाला कोणती अक्षरे कॅपिटल किंवा लोअरकेस आहेत हे लक्षात ठेवण्याची गरज नाही.

पासवर्ड

तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, किमान ८ वर्णांचा क्लिष्ट पासवर्ड निवडा.

  • अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा समावेश करा.
  • तुमच्या रस्त्याचे किंवा पाळीव प्राण्याचे नाव यासारखी अंदाज लावणे सोपे असलेली वैयक्तिक माहिती अथवा सामान्य शब्द टाळा.
  • तुम्ही इतर खात्यांसाठी किंवा वेबसाइटसाठी वापरलेला पासवर्ड वापरू नका. त्याचप्रमाणे, हा पासवर्ड इतर कुठेही वापरू नका.

क्लिष्ट पासवर्ड कसा असतो याविषयी अधिक जाणून घ्या.

जन्मतारीख

तुमची जन्मतारीख एंटर करा. काही Google सेवांसाठी आवश्यक वय ही मर्यादा असते. आवश्यक वयाविषयी अधिक जाणून घ्या.

ठरावीक सेवा आणि वैशिष्ट्ये वापरण्यासाठी तुमचे वय पुरेसे असल्याची खात्री करण्यासोबतच, Google हे पुढील गोष्टी करण्याकरिता तुमची जन्मतारीख वापरते:

  • पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी आणि जाहिरातींच्या समावेशासह, तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेला अनुभव देऊ करण्यासाठी तुमचा वयोगट निर्धारित करणे. तुम्ही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती बंद करू शकता.
  • Google Search पेजवर वाढदिवसाची थीम कधी दाखवावी हे जाणून घेणे.
  • सर्व Google सेवांवरील खाते सुरक्षा आणि पर्सनलायझेशन.

Google हे तुमची जन्मतारीख कशी वापरते याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमची जन्मतारीख सार्वजनिकरीत्या किंवा विशिष्ट लोकांसोबत शेअर केली नसल्यास, तुमचे वय इतरांना दिसत नाही.

लिंग

तुमचे लिंग निवडा किंवा न सांगण्याचे ठरवा. Google हे तुमच्या लिंगाशी संबंधित माहिती याविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या लिंगाशी संबंधित माहिती तुम्ही सार्वजनिकरीत्या किंवा विशिष्ट लोकांसोबत शेअर केल्याशिवाय इतरांना दिसणार नाही.

फोन नंबर

तुमच्याकडे मोबाइल फोन असल्यास, ही माहिती पर्यायी आहे, पण तो वापरावा अशी आम्ही शिफारस करतो. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये फोन नंबर कसा जोडता, त्यानुसार तुमचा नंबर वेगवेगळ्या Google सेवांवर वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास, तुमचा रिकव्हरी फोन नंबर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुन्हा साइन इन करण्यास मदत करतो.

फोन नंबर कसे वापरले जातात त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

सध्याचा ईमेल ॲड्रेस

तुमच्याकडे आधीच ईमेल अ‍ॅड्रेस असल्यास, तुम्ही तो जोडा अशी आम्ही शिफारस करतो. तुम्ही हा ईमेल अ‍ॅड्रेस पुढील गोष्टींसाठी वापरू शकता:

  • तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करणे.
  • तुम्‍ही साइन इन करू शकत नसल्‍यास, जसे की तुम्‍ही तुमचा पासवर्ड विसरल्‍यास, तुम्‍हाला पुन्हा साइन इन करण्यात मदत करणे.
  • Google सेवांकडून सूचना मिळवणे.

ही माहिती नंतर बदलणे

तुम्ही Google खाते तयार केल्यानंतर, यातील काही माहिती बदलू शकता आणि ती कोण पाहते ते नियंत्रित करू शकता. पुढील गोष्टी कशा कराव्यात हे जाणून घ्या:

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7208639872746896830
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false