तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसोबत तुमचा Google डेटा शेअर करणे

Google हे तुम्हाला तुमच्या Google खाते मधील काही डेटा तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांसोबत सुरक्षितपणे शेअर करण्यात मदत करते.

तुम्ही तृतीय पक्ष ॲप्स किंवा सेवांना तुमचे Google खाते चा अ‍ॅक्सेस देता, तेव्हा:

  • तुम्ही तृतीय पक्ष ॲप्ससोबत कोणत्या प्रकारचा डेटा शेअर करू शकता याबद्दल Google तुम्हाला सूचित करते.
  • Google हे तुमच्या परवानगीशिवाय तुमचा डेटा शेअर करत नाही.
  • तुम्ही तुमचा Google खाते डेटा तृतीय पक्ष खात्यासोबत शेअर करणे कधीही थांबवू शकता.
  • Google हे तृतीय पक्ष ॲप्ससोबत तुमचा Google खाते पासवर्ड शेअर करत नाही.

तुम्ही तुमच्या Google खाते च्या अ‍ॅक्सेसची परवानगी देता, तेव्हा शेअर केल्या जाणाऱ्या डेटाबद्दल

Google कोणता डेटा शेअर करते

तुमच्या Google खाते चा ॲक्सेस देण्याचे तुम्ही ठरवण्यापूर्वी, तृतीय पक्ष ॲपने कोणत्या डेटाची विनंती केली आहे हे समजून घेण्यात आम्ही तुमची मदत करू.

तुम्ही पुढील गोष्टींचे पुनरावलोकन करू शकता:

  • तृतीय पक्षाने ज्यांच्या ॲक्सेसची विनंती केली आहे अशा Google सेवा.
  • तृतीय पक्षाकडे डेटाचा कोणत्या पातळीवरील ॲक्सेस आहे आणि तो तुमच्या Google डेटा सोबत कोणत्या कृती करू शकतो.
संवेदनशील माहिती असलेली Google उत्पादने

तृतीय पक्ष ॲप्स ही तुम्ही वैयक्तिक किंवा संवेदनशील मानत असलेल्या डेटाच्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकतात. ज्या Google उत्पादनांमध्ये संवेदनशील माहितीचा समावेश असू शकतो, त्यांच्या उदाहरणांमध्ये पुढील उत्पादनांचा समावेश आहे:

  • Gmail: तुमच्या ईमेल मध्ये तुमच्या संपर्कांची नावे, तुमचे खाजगी प्रतिसंवाद किंवा संवेदनशील दस्तऐवज यांचा समावेश असू शकतो.
  • Photos: तुमच्या Google Photos अल्बममध्ये तुम्हाला शेअर करायच्या नसलेल्या किंवा इतरांना दाखवायच्या नसलेल्या फोटोचा समावेश असू शकतो, जसे की तुमच्या कुटुंबाचे फोटो अथवा अधिकृत दस्तऐवजांच्या कॉपी.
    • काही फोटो तारीख आणि स्थानासह आपोआप टॅग केलेले असतात.
  • Drive: तुमच्या Google Drive मध्ये पुढे नमूद केल्या आहेत तशा संवेदनशील फाइल असू शकतात:
    • वैयक्तिक फोटो
    • वैद्यकीय माहिती
    • आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड
    • अधिकृत अहवाल
    • प्रेझेंटेशन.
  • Calendar: तुमच्या Google Calendar मध्ये तुमचा दैनंदिन दिनक्रम आणि खाजगी इव्हेंट यांविषयीच्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश असू शकतो, जसे की भेटी किंवा मीटिंगची स्थाने, अतिथी व वर्णने.
  • Contacts: तुमच्या Google Contacts मध्ये तुम्हाला माहीत असलेल्या लोकांची नावे, फोन नंबर, पत्ते आणि संपर्क तपशील यांचा समावेश असू शकतो.

टीप: तुम्ही इतर लोकांसोबत दस्तऐवज शेअर केल्यास, तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांना त्यांची नावे व ईमेल अ‍ॅड्रेस मिळू शकतात.

तृतीय पक्ष ॲप्स किंवा सेवा कोणता डेटा शेअर करू शकतात

तुम्ही तृतीय पक्ष ॲपला तुमच्या Google खाते चा ॲक्सेस देता, तेव्हा Google ला तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेवर तुमच्या खात्याचा ॲक्सेस मिळत नाही.

तुम्ही Google ला तृतीय पक्ष खात्यामधील ठरावीक डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देता, तेव्हा शेअर करण्याचा हा प्रकार तुमच्या Google खाते मधील काही गोष्टींचा अ‍ॅक्सेस शेअर करण्यापेक्षा वेगळा असतो. Google खाते लिंक करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमचा डेटा किती कालावधीसाठी ठेवू शकते याबद्दल

एखादे तृतीय पक्ष ॲप किती कालावधीसाठी तुमचा डेटा स्टोअर करू शकते हा कालावधी त्यांच्या स्टोरेजसंबंधित धोरणावर अवलंबून असतो. एखादे तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमचा डेटा कसा वापरते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांचे गोपनीयता धोरण आणि सेवा अटी यांवर जा. तुम्हाला ही माहिती तृतीय पक्ष ॲपवर किंवा त्यांच्या वेबसाइटवर मिळू शकते.

तुम्ही तुमच्या Google खाते मधील डेटाचा अ‍ॅक्सेस देण्यापूर्वी

तुम्ही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस देता, तेव्हा ते तुमची संवेदनशील माहिती वाचू शकतात, संपादित करू शकतात, हटवू शकतात अथवा शेअर करू शकतात.

एखादे तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमचा डेटा कसा वापरते आणि तो कसा सुरक्षित ठेवते याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्या तृतीय पक्ष ॲप अथवा सेवेचे गोपनीयता धोरण आणि सुरक्षेसंबंधित डिस्क्लोजर वाचा.

तुम्ही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला तुमच्या Google खाते मधील डेटाचा अ‍ॅक्सेस देण्यापूर्वी, पुढील घटक विचारात घ्या:

  • सुरक्षा: तृतीय पक्ष ॲपचा सर्व्हर भंग झाला असल्यास, अनधिकृत लोक तुमचा डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात. तुम्ही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस देता, तेव्हा ते तुमचा डेटा कॉपी करून, त्यांच्या स्वतःच्या सर्व्हरवर पेस्ट करू शकतात. Google दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हरवरील डेटाचे संरक्षण करू शकत नसल्यामुळे, तुमच्या डेटाला डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेच्या संदर्भात मोठा धोका असू शकतो.
  • डेटा वापर: तृतीय पक्ष ॲप हे तुमच्या डेटाचा गैरवापर करू शकते किंवा तो अयोग्य पद्धतीने वापरू शकते.
  • डेटा हटवणे: तुम्ही तुमचा डेटा त्यांच्या सर्व्हरवरून झटपट किंवा आपोआप डेटा हटवू शकणार नाही, कारण हे तृतीय पक्ष ॲपवर अवलंबून असेल. तुम्ही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेवर तयार केलेले खाते हटवणेदेखील कठीण असू शकते.
  • धोरणामधील बदल: तुम्हाला कदाचित तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेकडून त्यांची धोरणे आणि पद्धतींमधील बदलांविषयी थेट सूचना मिळणार नाहीत.
  • डेटाची दृश्यमानता: तृतीय पक्ष ॲपकडे अशा व्यक्ती असू शकतात, ज्या तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केलेल्या तुमच्या Google खाते मधील डेटावर लक्ष ठेवतात.

महत्त्वाचे: तुमच्या डेटाच्या अ‍ॅक्सेसच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असल्याची खात्री करण्यासाठी, तृतीय पक्षाचे गोपनीयता धोरण वाचा.

पडताळणी न केलेल्या अ‍ॅप्सविषयी

तुमच्या संवेदनशील माहितीच्या अ‍ॅक्सेसची विनंती करणाऱ्या तृतीय पक्ष ॲप्सचे ती Google च्या डेटा सुरक्षेसंबंधित धोरणांचे पालन करतात की नाही यासाठी Google द्वारे पुनरावलोकन केलेले नसू शकते. उदाहरणार्थ, तृतीय पक्ष ॲप हे अजूनही डेव्हलप होत असल्यास किंवा व्यापकपणे उपलब्ध नसल्यास, त्याचे Google द्वारे पुनरावलोकन केलेले नसू शकते.

तुम्हाला एखाद्या अ‍ॅपची पडताळणी केलेली नाही अशी चेतावणी मिळाल्यास आणि तुमचा अ‍ॅप डेव्हलपरवर विश्वास नसल्यास, तुमचा डेटा शेअर करू नका.

काही अ‍ॅप्सची पडताळणी का केलेली नसते

पुढील कारणांमुळे अ‍ॅप्सची पडताळणी केलेली नसू शकते:

  • डेव्हलपर अजूनही अ‍ॅपची चाचणी करत आहे.
  • अ‍ॅप हे अंतर्गत आहे आणि विशिष्ट संस्थेसाठी मर्यादित आहे.

नकोसे सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे किंवा वैयक्तिक माहिती चोरणे यासारख्या हानिकारक हेतूंसाठी अविश्वासार्ह डेव्हलपर पडताळणी न केलेली अ‍ॅप्स वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. अ‍ॅप डेव्हलपरवर विश्वास ठेवण्याच्या बाबतीत तुम्हाला खात्री असेल, तरच तुमचा डेटा शेअर करा.

तुमच्या Google खाते चा ॲक्सेस असलेली तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या Google खाते चा तृतीय पक्षाला असलेल्या अ‍ॅक्सेसचे कधीही पुनरावलोकन करू शकता किंवा तो बदलू शकता.

टीप: तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेच्या अ‍ॅक्सेसचे पुनरावलोकन करण्यासाठी अथवा तो बदलण्यासाठी, सूचीमधून त्या ॲप अथवा सेवेचे नाव निवडा.

तुमची अ‍ॅप्स आणि सेवा पहा

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4214254500421302842
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false