तुमचा Google खाते अ‍ॅक्सेस तृतीय पक्ष ॲप्ससोबत शेअर करणे

ठरावीक वैशिष्ट्ये अनलॉक करण्यासाठी, तुम्ही तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांना तुमच्या Google खाते मधील काही गोष्टींचा ॲक्सेस देऊ शकता. उदाहरणार्थ, फोटो संपादित करण्यासाठीचे अ‍ॅप फिल्टर लागू करण्याकरिता तुमच्या Google Photos च्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकते.

तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा ज्या काही Google उत्पादनांच्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकतात, त्यांमध्ये पुढील उत्पादनांचा समावेश आहे:

  • Gmail
  • Drive
  • Calendar
  • Photos
  • Contacts

महत्त्वाचे: तृतीय पक्ष ॲप्स म्हणजे Google नसलेल्या कंपन्या किंवा डेव्हलपर. तुमचा तृतीय पक्ष ॲपवर विश्वास असला, तरच तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस द्या.

तृतीय पक्ष ॲपला तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस देणे

तुमच्या Google खाते मधील काही डेटाचा अ‍ॅक्सेस शेअर करण्यासाठी पुढील सूचना फॉलो करा:

  1. तुम्हाला तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस शेअर करण्यास सूचित करतात, तेव्हा त्याद्वारे कोणती माहिती आणि परवानग्या मागितल्या जात आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या विनंतीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
  2. तुम्ही अ‍ॅक्सेस शेअर करण्याचे ठरवल्यास, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.
  3. तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला तुमच्या Google खाते मधील काही डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी द्या.

तृतीय पक्ष ॲप्स तुमच्या Google खाते च्या विविध प्रकारच्या ॲक्सेसची विनंती करू शकतात. ती पुढील गोष्टींच्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकतात:

  • तुमची मूलभूत प्रोफाइल मिळवणे: तुमच्या प्रोफाइलच्या मूलभूत माहितीमध्ये तुमचे नाव, ईमेल अ‍ॅड्रेस आणि प्रोफाइल फोटोचा समावेश असतो. तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेवर नवीन खाते तयार करण्यासाठी, तृतीय पक्ष ॲप या माहितीची विनंती करू शकते. तुम्ही हे वैशिष्‍ट्य असलेल्या तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांवर Google वापरून साइन इन करता, तेव्हा तुमच्या मूलभूत प्रोफाइलच्या अ‍ॅक्सेसची परवानगी देता. Google वापरून साइन इन कसे करावे हे जाणून घ्या.
  • तुमच्या Google खाते मधील डेटा पाहणे आणि कॉपी करणे: तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा या तुमचे संपर्क, फोटो, YouTube च्या प्लेलिस्ट व आणखी बऱ्याच गोष्टींसारखा डेटा पाहण्याची आणि कॉपी करण्याची परवानगी मागू शकतात.
    • तुम्ही तृतीय पक्ष ॲपचा तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस मागे घेतल्यास, ते यापुढे तुमचा डेटा अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. तुम्हाला त्यांच्याकडे आधीपासून असलेला डेटा हटवण्याची विनंती करावी लागू शकते.
  • तुमच्या Google खाते मधील डेटा व्यवस्थापित करणे: तृतीय पक्ष ॲप्स किंवा सेवा तुमच्या Google खाते मधील डेटा संपादित करणे, अपलोड करणे, तयार करणे किंवा हटवणे याची विनंती करू शकतात.
    • उदाहरणार्थ:
      • एखादे चित्रपट संपादित करण्याचे ॲप तुमचा व्हिडिओ संपादित करून, तो तुमच्या YouTube चॅनलवर अपलोड करू शकते.
      • एखादे इव्हेंटचे नियोजन करणारे अ‍ॅप तुमच्या Google Calendar वर इव्‍हेंट तयार करू शकते किंवा त्यावरील इव्‍हेंट हटवू शकते.

तृतीय पक्ष अ‍ॅपची तक्रार करणे

तुमच्या Google खाते च्या अ‍ॅक्सेसबद्दल सामान्य प्रश्न

माझ्या Google खाते मधील डेटाचा अ‍ॅक्सेस कोणत्या तृतीय पक्ष ॲप्सना आहे हे मला कसे कळेल?
तुम्ही कोणत्या अ‍ॅप्स आणि सेवांना तुमचे Google खाते अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी दिली आहे हे तुमच्या कनेक्शन व्यवस्थापन पेज मध्ये तपासू शकता.

टीप: तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेच्या अ‍ॅक्सेसचे पुनरावलोकन करण्यासाठी अथवा तो बदलण्यासाठी, सूचीमधून त्या ॲप अथवा सेवेचे नाव निवडा.

तुमची अ‍ॅप्स आणि सेवा पहा

मला माझ्या Google खाते चा तृतीय पक्षाला असलेला अ‍ॅक्सेस कसा काढून टाकता येईल?

तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस यापुढे तृतीय पक्ष ॲपला नसावा असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ते तुमच्या तृतीय पक्ष कनेक्शनमधून काढून टाकू शकता.

  1. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.
  2. तृतीय पक्ष अ‍ॅक्सेस असलेली अ‍ॅप्स आणि सेवा पाहणे.
  3. तुम्हाला ज्याचे कनेक्शन काढून टाकायचे आहे ते तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा सूचीमधून निवडा.
  4. तपशील पहा आणि त्यानंतर अ‍ॅक्सेस काढून टाका आणि त्यानंतर कंफर्म करा निवडा.

टीप: तुमच्याकडे कनेक्शनचे एकाहून अधिक प्रकार असल्यास, तुमचे तृतीय पक्ष अ‍ॅक्सेस कनेक्शन “{App name} ला तुमच्या Google खाते मधील काही गोष्टींचा ॲक्सेस आहे” अंतर्गत दिसते.

अ‍ॅक्सेसचे पुनरावलोकन करणे

तृतीय पक्षाला माझ्या किती Google डेटाचा अ‍ॅक्सेस असू शकतो?

तृतीय पक्ष ॲप्स ही तुम्ही परवानगी दिलेला डेटा आणि सेवाच अ‍ॅक्सेस करू शकतात. Google तुमचा कोणताही डेटा तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसोबत शेअर करण्यापूर्वी, तुम्हाला तृतीय पक्षाला ज्या डेटा आणि सेवांचा अ‍ॅक्सेस हवा आहे, त्यांची सूची मिळेल.

उदाहरणार्थ, तुम्ही तृतीय पक्ष ॲपला फक्त तुमचा Google Calendar डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी दिल्यास, ते तोच डेटा अ‍ॅक्सेस करू शकते आणि तुमचे Google Photos किंवा संपर्क यासारखा तुमचा इतर कोणताही Google डेटा अ‍ॅक्सेस करू शकत नाही.

तुम्ही कधीही तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस काढून टाकणे हे करू शकता.

तृतीय पक्ष माझ्या Google खाते मधील डेटामध्ये फेरबदल करू शकतो का?

तुम्ही तृतीय पक्ष ॲप्सना तुमच्या Google खाते साठी वेगवेगळ्या पातळ्यांवरील अ‍ॅक्सेस देऊ शकता, जसे की मूलभूत खाते माहिती आणि तुमच्या खात्यामधील डेटा पाहणे किंवा त्यामध्ये फेरबदल करणे. तुमच्या Google खाते मधील डेटा व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तृतीय पक्ष ॲपला अ‍ॅक्सेसची परवानगी दिल्यास, ते तुमच्या Google खाते मधील डेटा संपादित करू, तयार करू आणि हटवू शकते. तुम्ही तुमच्या खात्याच्या अ‍ॅक्सेसची परवानगी देता, तेव्हा तृतीय पक्ष ॲपने विनंती केलेल्या अ‍ॅक्सेसचा प्रकार तृतीय पक्षांना असू शकतो असा अ‍ॅक्सेस वर पाहू शकता.

अ‍ॅक्सेससाठी मी माझा Google पासवर्ड तृतीय पक्षासोबत शेअर केला पाहिजे का?

तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेवर तुमचा Google खाते पासवर्ड शेअर करू नका. तुम्ही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसोबत तुमचा Google खाते पासवर्ड शेअर केल्यास, त्यांना तुमच्या खात्याचा पूर्ण अ‍ॅक्सेस मिळेल आणि यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

त्याऐवजी, तुम्ही विश्वसनीय तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांसोबत तुमच्या Google खाते मधील काही गोष्टींचा ॲक्सेस शेअर करू शकता. हे जास्त सुरक्षित आहे.

मी माझ्या Google खाते मधून लॉग आउट केल्यास काय होईल?

तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला अ‍ॅक्सेसची परवानगी देण्यासाठी तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

माझ्याकडे एकाहून अधिक Google खाती असल्यास काय होईल?

तुमच्याकडे एकाहून अधिक Google खाती असल्यास, तुम्हाला वापरायचे असलेले खाते निवडण्यास किंवा पुढे सुरू ठेवण्यासाठी दुसऱ्या Google खाते मध्ये साइन इन करण्यास सूचित केले जाते.

मी माझे Google खाते हटवल्यास काय होईल?

तुम्ही तुमचे Google खाते हटवल्यास, सर्व संबंधित तृतीय पक्ष कनेक्शनदेखील हटवता. तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुम्ही त्यांच्यासोबत पूर्वी शेअर केलेली माहिती त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला तृतीय पक्ष ॲपला त्याच्याकडे आधीपासून असलेला कोणताही डेटा हटवायला सांगावे लागू शकते.

मी माझे तृतीय पक्ष खाते हटवल्यास काय होईल?

तुम्ही तुमचे तृतीय पक्ष खाते हटवता, तेव्हा त्याचा तुमच्या Google खाते वर कोणताही परिणाम होत नाही.

  • तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसोबत तुमचा डेटा शेअर करणे थांबवण्यासाठी, त्या ॲप अथवा सेवेला तुमच्या कनेक्शन व्यवस्थापन पेज वरून काढून टाका. यामुळे तुम्ही त्यांना यापूर्वी दिलेला कोणताही अ‍ॅक्सेस मागे घेतला जाईल.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12271497854890365048
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false