पासवर्डऐवजी पासकी वापरून साइन इन करणे

पासकी या पासवर्डचा साधा आणि सुरक्षित पर्याय आहेत. पासकीसह, तुम्ही तुमची फिंगरप्रिंट, चेहऱ्याचे स्कॅन किंवा पिन यासारखे डिव्हाइस स्क्रीन लॉक वापरून तुमच्या Google खात्यात साइन इन करू शकता.

पासकी या फिशिंगसारख्या धोक्यांपासून सर्वात मजबूत संरक्षण पुरवतात. तुम्ही पासकी तयार केल्यावर, तुमच्या Google खाते मध्ये, त्याचप्रमाणे काही तृतीय पक्ष अ‍ॅप्स किंवा सेवांमध्ये सहजपणे साइन इन करण्यासाठी व तुम्ही संवेदनशील बदल करता, तेव्हा ते तुम्हीच असल्याची पडताळणी करणे हे करण्यासाठी ती वापरू शकता.

महत्त्वाचे:

  • तुमच्या खात्यामध्ये २ टप्पी पडताळणी असल्यास किंवा त्याची प्रगत संरक्षण प्रोग्राम यामध्ये नोंदणी केलेली असल्यास, यामुळे डिव्हाइस तुमच्या मालकीचे असल्याची पडताळणी होत असल्यामुळे, पासकी तुमची दुसरी ऑथेंटिकेशन पायरी बायपास करते.
  • फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकसाठी वापरला जाणारा तुमचा बायोमेट्रिक डेटा तुमच्या डिव्हाइसवरच राहतो आणि तो Google सोबत कधीही शेअर केला जात नाही.

पासकी तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तपासणे

तुम्ही पुढील डिव्हाइसवर पासकी तयार करू शकता:

  • किमान Windows 10, macOS Ventura किंवा ChromeOS 109 वर रन होणारा लॅपटॉप अथवा डेस्कटॉप
  • किमान iOS 16 किंवा Android 9 वर रन होणारे मोबाइल डिव्हाइस
  • FIDO2 प्रोटोकॉलला सपोर्ट करणारी हार्डवेअर सिक्युरिटी की

तुमच्या कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसमध्ये सपोर्ट असलेला ब्राउझर असणेदेखील आवश्यक आहे, जसे की:

  • Chrome 109 किंवा त्यावरील आवृत्ती
  • Safari 16 किंवा त्यावरील आवृत्ती
  • Edge 109 किंवा त्यावरील आवृत्ती
  • FireFox 122 किंवा त्यावरील आवृत्ती

पासकी तयार करून वापरण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी सुरू करणे आवश्यक आहे:

  • स्क्रीन लॉक
  • ब्लूटूथ
    • दुसऱ्या कॉंप्युटरवर साइन इन करण्यासाठी तुम्हाला फोनवरील पासकी वापरायची असल्यास, हे लागू होते.
  • iOS किंवा macOS साठी: तुम्ही iCloud Keychain सुरू करणे आवश्यक आहे.
    • तुम्ही तुमच्या Apple डिव्हाइसवर पासकी सेट करता, तेव्हा ती आधीच सेट केलेली नसल्यास, तुमची iCloud Keychain सुरू करण्यास तुम्हाला सूचित करते. iCloud Keychain कशी सेट करावी याबाबत अधिक माहितीसाठी, येथे जा.

टीप: पासकीशी संबंधित सर्वोत्तम अनुभवाची खात्री करण्यासाठी, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर अप टू डेट असल्याची खात्री करा.

तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर यांच्या आधारावर, गुप्त मोडमध्ये असताना तुम्हाला कदाचित पासकी तयार करता किंवा वापरता येणार नाही.

Google Workspace साठी पासकी

तुमच्याकडे तुमच्या शाळेने किंवा नियोक्त्याने दिलेले Google Workspace खाते असल्यास, तुम्हाला कदाचित फक्त पासकी वापरून तुमच्या खात्यामध्ये साइन इन करता येणार नाही. तुम्ही तरीही तुमच्या डिव्हाइसवर पासकी तयार करू शकता, पण त्या फक्त २ टप्पी पडताळणी यामधील दुसरा घटक म्हणून, खाते रिकव्हरीमध्ये आणि तुमच्या खात्यामधील Google ला तुमच्या ओळखीची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक असणाऱ्या काही संवेदनशील कृतींसाठी वापरल्या जाऊ शकतात.

"शक्य असेल तेव्हा पासवर्ड वगळा" या खाते सेटिंग्ज पेजमध्ये, तुमचा ॲडमिन तुम्हाला फक्त पासकी वापरून साइन इन करू देतो का हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

Workspace ॲडमिन येथे अधिक जाणून घेणे हे करू शकतात.

पासकी सेट करणे

महत्त्वाचे: तुम्ही पासकी तयार करता, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम पासकी या पासवर्डविरहित साइन-इन अनुभवाची निवड करता. फक्त तुम्ही नियंत्रित करत असलेल्या वैयक्तिक डिव्हाइसवर पासकी तयार करा. तुम्ही तुमच्या Google खाते मधून साइन आउट केले, तरीही तुम्ही डिव्हाइसवर पासकी तयार केल्यावर, डिव्हाइस अनलॉक करू शकणारी कोणतीही व्यक्ती पासकी वापरून तुमच्या Google खाते मध्ये पुन्हा साइन इन करू शकते.

पासकी सेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करावे लागू शकते किंवा ते खरोखर तुम्हीच असल्याची पडताळणी करावी लागू शकते.

पासकी तयार करणे
तुम्ही ज्यावर आहात त्या फोनवर किंवा कॉंप्युटरवर पासकी तयार करण्यासाठी:
  1. https://myaccount.google.com/signinoptions/passkeys वर जा.
  2. पासकी तयार करा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
    • तुम्हाला तुमचे डिव्हाइस अनलॉक करावे लागेल.

एकाहून अधिक डिव्हाइसवर पासकी तयार करण्यासाठी, त्या डिव्हाइसवरील या पायऱ्या पुन्हा फॉलो करा.

बाह्य FIDO2 सक्षम USB सिक्युरिटी कीवर पासकी तयार करण्यासाठी:

  1. https://myaccount.google.com/signinoptions/passkeys वर जा.
  2. पासकी तयार करा आणि त्यानंतर दुसरे डिव्हाइस वापरा वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    • तुम्हाला तुमची हार्डवेअर सिक्युरिटी की घालावी लागेल आणि तिचा पिन एंटर करावा लागेल किंवा कीवरील फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करावा लागेल.

टिपा:

  • तुम्ही तुमची पहिली पासकी तयार केल्यावर, तुम्ही पुढच्या वेळी त्या पासकीला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर साइन इन करता, तेव्हा तुम्हाला त्या डिव्हाइसवर पासकी तयार करण्यासाठी सूचित केले जाईल.
  • इतर वापरकर्त्यांनी तुमचे खाते अ‍ॅक्सेस करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, शेअर केलेल्या डिव्हाइसवर पासकी तयार करू नका.

साइन इन करण्यासाठी तुमची पासकी वापरणे

जिथे तुम्ही आधीच पासकी तयार केली आहे अशा डिव्हाइसवर तुमच्या खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी:

तुम्ही एखाद्या Android डिव्‍हाइसमधून साइन आउट करता, तेव्हा तुम्‍हाला पर्यायी पद्धत वापरून परत साइन इन करावे लागते. तुम्ही साइन इन केलेले असताना ज्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक आहे अशी कोणतीही संवेदनशील कृती करत असल्यास, तुम्ही Android डिव्हाइसवरच पासकी वापरू शकता.

Android नसलेल्या इतर डिव्हाइसवर, तुमच्या खात्यात परत साइन इन करण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्ही आधीच साइन इन केलेले असताना तुमच्या ओळखीची पुन्हा पडताळणी करण्यासाठी तुम्ही तुमची पासकी वापरू शकता.

  1. तुमच्या डिव्हाइसवरील Google साइन-इन पेजवर, तुमचे वापरकर्ता नाव एंटर करा.
  2. तुम्ही तुमच्या खात्यासाठी त्या डिव्हाइसवर यापूर्वी पासकी तयार केली असल्यास, Google तुम्हाला त्या डिव्हाइसची पासकी वापरून तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यास सूचित करेल.
    • डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी आणि तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी स्क्रीनवरील पासकीसंबंधी सूचना फॉलो करा.
      • तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर यांनुसार नेमकी UI वेगळी असू शकते.
    • काही तुरळक बाबतींत, तुमच्या डिव्हाइसवर पासकी असली, तरीदेखील तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाऊ शकतो.
      • तुमच्या पासकीसाठी सूचना ट्रिगर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, तुम्ही "दुसरी पद्धत वापरून पहा" हा पर्याय वापरू शकता.
कॉंप्युटरवर तुमच्या खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी, तुम्ही मोबाइल डिव्हाइसवर तयार केलेली पासकी वापरू शकता:
तुमच्या Android किंवा iOS मोबाइल डिव्हाइसवर पासकी असल्यास, वेगळ्या मोबाइल डिव्हाइसवर अथवा कॉंप्युटरवर साइन इन करण्यासाठी तुम्ही ती पासकी वापरू शकता.
  1. तुमच्या कॉंप्युटरवरील Google साइन-इन पेजवर, तुमचे वापरकर्ता नाव एंटर करा.
  2. पासवर्ड फील्डच्या खाली, दुसरी पद्धत वापरून पहा लिंकवर क्लिक करा.
  3. तुमची पासकी वापरा वर क्लिक करा.
  4. तुमच्या स्क्रीनवर, QR कोड शोधा.
    • तुम्हाला हार्डवेअर सिक्युरिटी कीवर तयार केली गेलेली पासकी वापरायची असल्यास, तुमच्याकडे "USB सिक्युरिटी की" किंवा समतुल्य गोष्ट निवडण्याचा पर्याय असेल.
  5. QR कोड स्कॅन करण्यासाठी, तुमच्या फोनचे बिल्ट-इन QR कोड स्कॅनर अ‍ॅप वापरा.
    • iOS साठी: तुम्ही बिल्ट-इन कॅमेरा अ‍ॅप वापरू शकता.
    • Google Pixel फोनसाठी: तुम्ही बिल्ट-इन QR कोड स्कॅनर वापरू शकता.
    • इतर Android डिव्हाइससाठी: तुम्ही मूळ कॅमेरा अ‍ॅप किंवा सिस्टीम QR कोड स्कॅनर वापरून QR कोड स्कॅन करू शकत नसल्यास, Google Lens वापरू शकता.
  6. तुमच्या फोनवर पासकी वापरा वर टॅप करा.
    • तुमच्या फोनवर तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी, तुम्हाला तुमची फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा फोन पिन यांसाठी सूचित केले जाईल.
    • तुम्ही हा कॉंप्युटर आणि फोन यांचे काँबिनेशन वापरून पुढील वेळी साइन इन करता, तेव्हा ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर आपोआप सूचना मिळेल.

टीप: तुम्ही साइन इन केल्यानंतर, तुम्हाला कॉंप्युटरवर पासकी तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. इतर वापरकर्त्यांनी तुमचे खाते अ‍ॅक्सेस करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, शेअर केलेल्या डिव्हाइसवर पासकी तयार करू नका.

तुमच्या पासकी तपासणे

  1. https://myaccount.google.com/signinoptions/passkeys वर जा.
  2. तुम्हाला तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यास सांगितले जाऊ शकते.
    • टीप: तुम्ही एकाहून अधिक खात्यांमध्ये साइन इन केलेले असल्यास, तुम्हाला हव्या असलेल्या खात्यासाठी तुमच्या ओळखीची पडताळणी करत असल्याची खात्री करा.

तुमच्या खात्यामध्ये आधीच पासकी असल्यास, त्या येथे सूचीबद्ध केलेल्या आहेत.

  • टीप: तुमच्याकडे या खात्याने साइन इन केलेला Android फोन असल्यास, तुमच्याकडे तुमच्यासाठी आपोआप नोंदणी केलेल्या पासकी असू शकतात.

पासकी काढून टाकणे किंवा त्यांची निवड रद्द करणे

पासकी काढून टाकणे
तुम्ही पासकी तयार केलेले डिव्हाइस हरवल्यास किंवा चुकून शेअर केलेल्या डिव्हाइसवर पासकी तयार केल्यास, तुम्ही तुमच्या Google खाते सह पासकी वापरण्याचा पर्याय बंद करणे आवश्यक आहे.

तुम्ही तयार केलेली पासकी काढून टाकणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
    • तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. सुरक्षा निवडा.
  3. "तुम्ही Google मध्ये कसे साइन इन करता" या अंतर्गत, पासकी वर टॅप करा.
  4. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या पासकी निवडा.
  5. आयकनवर टॅप करा.

Android ने आपोआप तयार केलेली पासकी काढून टाकणे

तुमच्या Android डिव्हाइसवर आपोआप तयार केलेली पासकी काढून टाकण्यासाठी, तुम्ही तुमच्या Google खाते मधून डिव्हाइस काढून टाकणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. तुमची डिव्हाइस पॅनलवर, सर्व डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.
  4. डिव्हाइस and then साइन आउट करा निवडा.
  5. एकाच डिव्हाइसच्या नावासह एकाहून अधिक सेशन दिसत असल्यास, ती सर्व एकाच डिव्हाइसवरील किंवा एकाहून अधिक डिव्हाइसवरील असू शकतात. एखाद्या डिव्हाइसवरून कोणताही खाते अ‍ॅक्सेस नसल्याची तुम्हाला खात्री करायची असल्यास, डिव्हाइसचे हे नाव असलेल्या सर्व सेशनमधून साइन आउट करा.

टीप: तुमच्या खात्याचा अ‍ॅक्सेस असलेली डिव्हाइस अशा सर्व डिव्हाइसचे पुनरावलोकन करण्यासाठी, तुम्ही google.com/devices पाहू शकता.

पासकी वापरून साइन इन करण्याची निवड रद्द करणे
तुम्ही पासकी साइन-इनची निवड रद्द केल्यावरदेखील तुमच्या खात्यावरील सर्व पासकी कायम राहतील. पुढील सर्व साइन-इनसाठी तुमचा पासवर्ड आणि कॉंफिगरेशननुसार पर्यायी २ टप्पी पडताळणी आवश्यक असेल.
साइन-इन पद्धत म्हणून पासकीची निवड रद्द करण्यासाठी आणि तुमच्या मागील साइन-इन पद्धतीवर परत जाण्यासाठी, तुमच्या खाते सेटिंग्जमध्ये हे प्राधान्य बदला.
  1. तुमच्या Google खाते वर जा.
    • तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. सुरक्षा निवडा.
  3. शक्य असेल तेव्हा पासवर्ड वगळा हे बंद करा.

टीप: तुम्ही पहिल्यांदा पासकी तयार करता, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम पासकी या पासवर्डविरहित साइन-इन अनुभवाची निवड करता. पासकी न वापरता तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यासाठी आणि दुसरी साइन-इन पद्धत वापरण्यासाठी, दुसरी पद्धत वापरून पहा वर टॅप करा. तुम्ही "दुसरी पद्धत वापरून पहा" बरेचदा निवडत असल्यास, Google तुमची अभिप्रेत असलेली प्राधान्ये दर्शवण्यासाठी भविष्यात पासकी वापरण्याचा पर्याय कमी वेळा देईल. वारंवार पासकी वापरून साइन इन करून तुम्ही हे बदलू शकता.

हरवलेल्या किंवा सापडत नसलेल्या पासकीशी संबंधित समस्येचे निराकरण करणे

हरवलेले किंवा चोरीला गेलेले डिव्हाइस
  1. तुम्ही अ‍ॅक्सेस करू शकत असलेल्या डिव्हाइसवर, तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  2. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या डिव्हाइसशी संबंधित पासकी काढून टाका.
सापडत नसलेल्या किंवा उपलब्ध नसलेल्या पासकी

तुमच्याकडे तुमच्या खात्यावर पासकी असल्यास, पण साइन इन करताना पासकीबद्दल विचारले न गेल्यास, पुढील गोष्टींची खात्री करा:

  • पासकी असलेल्या डिव्हाइसवर स्क्रीन लॉक सुरू केलेले आहे
    • तुमच्या डिव्हाइसचे स्क्रीन लॉक बंद केलेले असल्यास, स्क्रीन लॉक पुन्हा सुरू करेपर्यंत तुम्ही त्या डिव्हाइसवर पासकी वापरू शकणार नाही.
  • myaccount.google.com/security येथे तुमच्या सुरक्षा सेटिंग्जमध्ये "शक्य असेल तेव्हा पासवर्ड वगळा" टॉगल सुरू आहे.


पासकी न वापरता तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यासाठी, पासकी वापरण्याचा पर्याय वगळण्याकरिता आणि तुमच्या आधीच्या साइन-इन निवडींवर परत जाण्याकरिता दुसरी पद्धत वापरा वर टॅप करा.

टीप: तुम्ही "दुसरी पद्धत वापरून पहा" बरेचदा निवडत असल्यास, Google तुमची अभिप्रेत असलेली प्राधान्ये दर्शवण्यासाठी भविष्यात पासकी वापरण्याचा पर्याय कमी वेळा देऊ करेल. वारंवार पासकी वापरून साइन इन करून तुम्ही हे बदलू शकता.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12992405243158095273
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false