तुमचे Google खाते आणि तृतीय पक्ष यांमधील कनेक्शन व्यवस्थापित करणे

उपयुक्त वैशिष्ट्ये अनलॉक करण्यासाठी, तुम्ही तुमचे Google खाते आणि तृतीय पक्ष ॲप्स व सेवा यांदरम्यान डेटा शेअर करण्याचे निवडू शकता.

महत्त्वाचे: तृतीय पक्ष या अशा कंपन्या किंवा डेव्हलपर आहेत, जे Google चे नाहीत. फक्त तुमचा विश्वास असलेल्या तृतीय पक्षांसोबत तुमचा डेटा शेअर करा. Google हे तुमच्या परवानगीशिवाय कनेक्शन सेट करत नाही.

तृतीय पक्ष कनेक्शनबद्दल जाणून घ्या

तुमच्या सध्याच्या सर्व तृतीय पक्ष कनेक्शनचे पुनरावलोकन करण्यासाठी:

  1. तुमच्या Google खाते च्या तृतीय पक्ष कनेक्शनचे पेज येथे भेट द्या.
  2. सूचीमध्ये अ‍ॅप किंवा सेवा शोधा.
  3. तुम्हाला ज्या कनेक्शनचे पुनरावलोकन करायचे आहे ते अ‍ॅप किंवा सेवा निवडा.

टीप: तुम्ही Google Password Manager मध्ये पासवर्ड सेव्ह केलेले तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा निवडल्यास, पेजवर लिंक दिसते. तुमचे पासवर्ड कसे सेव्ह, व्यवस्थापित आणि संरक्षित करावे ते जाणून घ्या.

तृतीय पक्ष कनेक्शन व्यवस्थापित करणे

Google वापरून साइन इन करणे

तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांमध्ये साइन इन करण्यासाठी तुमचे Google खाते वापरण्याकरिता, Google वापरून साइन इन करा हे वापरा. तुम्ही नवीन पासवर्ड तयार न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि ब्राउझरमध्ये साइन इन करू शकता.

या कनेक्शनचे पुनरावलोकन करा आणि ती व्यवस्थापित करा

एखाद्या अ‍ॅप किंवा सेवेसाठी Google वापरून साइन इन करा हे वापरणे थांबवण्याकरिता:

महत्त्वाचे: तुम्ही हे कनेक्शन हटवल्यास, Google हे अ‍ॅप किंवा सेवेमध्ये ऑटोमॅटिक साइन-इन थांबवते. यामुळे तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा हटवली जात नाही.

  1. तुमच्या Google खाते च्या तृतीय पक्ष कनेक्शनच्या पेजवर जा.
  2. Google वापरून साइन इन करा हे निवडा.
  3. तुम्हाला कनेक्शन काढून टाकायचे असलेले तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा निवडा आणि त्यानंतर तपशील पहा.
    • टीप: तुमच्याकडे त्या अ‍ॅप किंवा सेवेसह कनेक्शनचे एकाहून अधिक प्रकार असल्यास, तुमचे Google वापरून साइन इन करा कनेक्शन "Google तुम्हाला {अ‍ॅपचे नाव} मध्ये साइन इन करण्यात कसे मदत करते" या अंतर्गत दिसते.
  4. Google वापरून साइन इन करणे थांबवा आणि त्यानंतर कंफर्म करा निवडा.

Google वापरून साइन इन करा याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google वापरून साइन इन करा हे डेटा सुरक्षितपणे शेअर करण्यात तुम्हाला कसे मदत करते ते जाणून घ्या.

तुमचे Google खाते लिंक करणे
सुधारित आणि पर्सनलाइझ केलेला अनुभव देण्यासाठी, तुम्ही तुमचे Google खाते तुमच्या तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेशी लिंक करू शकता.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Google खाते शी संगीत स्ट्रीमिंग सेवा लिंक करू शकता, जेणेकरून तुम्ही Google Assistant ला त्या संगीत स्ट्रीमिंग सेवेवरून गाणे प्ले करण्यास सांगू शकता.

या कनेक्शनचे पुनरावलोकन करा आणि ती व्यवस्थापित करा

महत्त्वाचे: तुम्ही हे कनेक्शन हटवल्यास, Google हे तुमच्या तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेच्या खात्याचा अ‍ॅक्सेस गमावते. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर या कनेक्शनची आवश्यकता असलेल्या वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस तुमच्याकडे नसेल.

Google ला असलेला तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्यासाठी:

  1. तुमच्या Google खाते च्या तृतीय पक्ष कनेक्शनच्या पेजवर जा.
  2. लिंक केलेले खाते निवडा.
  3. तुम्हाला कनेक्शन हटवायचे असलेले तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा निवडा.
    • टीप: तुमच्याकडे त्या अ‍ॅप किंवा सेवेसह कनेक्शनचे एकाहून अधिक प्रकार असल्यास, हे कनेक्शन “Google ला तुमच्या {अ‍ॅपचे नाव} खाते चा काही अ‍ॅक्सेस आहे” या अंतर्गत दिसते.
  4. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या तृतीय पक्ष खात्याच्या बाजूला, कनेक्शन हटवाआणि त्यानंतर कंफर्म करा निवडा.

टीप: तुम्ही कनेक्शन हटवण्यापूर्वी, तृतीय पक्ष अ‍ॅप किंवा सेवा Google सह कोणत्या प्रकारची माहिती शेअर करते याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांचे गोपनीयता धोरण वाचा.

Google सह माहिती शेअर करणारी तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा यांबद्दल अधिक जाणून घ्या.
तृतीय पक्षासह तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस शेअर करणे

तुम्ही तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवांना तुमच्या Google खाते चा काही अ‍ॅक्सेस देऊ शकता.

उदाहरणार्थ, तुम्ही फिटनेस ॲपद्वारे साइन अप केलेले वर्ग दाखवण्यासाठी, ते अ‍ॅप तुमच्या Google Calendar च्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकते.

महत्त्वाचे: तुम्ही तृतीय पक्षाला तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस देण्यापूर्वी, तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमचा डेटा कसा वापरते आणि ते ॲप अथवा सेवा तो डेटा कसा सुरक्षित ठेवते हे जाणून घेण्यासाठी, त्यांचे गोपनीयता धोरण व सुरक्षा डिस्क्लोजर वाचा.

या कनेक्शनचे पुनरावलोकन करा आणि ती व्यवस्थापित करा

तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा काय अ‍ॅक्सेस करू शकते याचे पुनरावलोकन करण्यासाठी अथवा काढून टाकण्यासाठी:

महत्त्वाचे: तुम्ही अ‍ॅक्सेस काढून टाकल्यास, तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा तुमचे Google खाते अ‍ॅक्सेस करू शकत नाही. यामुळे काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसू शकतात.

  1. तुमच्या Google खाते च्या तृतीय पक्ष कनेक्शनच्या पेजवर जा.
  2. तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस असणे निवडा.
  3. तुम्हाला पुनरावलोकन करायचे असलेले तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा निवडा.
    • तुमच्या Google खाते चा विशिष्ट अ‍ॅक्सेस असलेली तृतीय पक्ष ॲप्स किंवा सेवा फिल्टर करण्यासाठी, याचा अ‍ॅक्सेस निवडा आणि Google उत्पादन निवडा अथवा इतर अ‍ॅक्सेस निवडा.
  4. तपशील पहा निवडा.
    • टीप: तुमच्याकडे त्या अ‍ॅप किंवा सेवेसह कनेक्शनचे एकाहून अधिक प्रकार असल्यास, हे कनेक्शन “तुमच्या {अ‍ॅपचे नाव} खाते चा काही अ‍ॅक्सेस आहे” या अंतर्गत दिसते.
  5. तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेला तुमच्या Google खाते च्या असलेल्या अ‍ॅक्सेसचे पुनरावलोकन करा.
  6. तुम्हाला अ‍ॅप किंवा सेवेचा अ‍ॅक्सेस काढून टाकायचा असल्यास, अ‍ॅक्सेस काढून टाका आणि त्यानंतर कंफर्म करा निवडा.

तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेची तक्रार करणे

तृतीय पक्ष अ‍ॅप किंवा सेवा तुमच्या डेटाचा गैरवापर करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास:

  1. तुमच्या Google खाते च्या तृतीय पक्ष कनेक्शनच्या पेजवर जा.
  2. तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस असणे निवडा.
  3. तुम्हाला पुनरावलोकन करायचे असलेले तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा निवडा.
  4. तपशील पहा निवडा.
  5. पेजच्या तळाशी, या अ‍ॅपची तक्रार करा निवडा.
  6. फॉर्म भरा आणि सबमिट करा निवडा.

तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस असलेली तृतीय पक्ष ॲप्स आणि सेवा यांबद्दल अधिक जाणून घ्या.

Google तुमचा डेटा आणि वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यात कसे मदत करते

  • Google हे तुमच्या Google खाते चा पासवर्ड कोणत्याही तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसह शेअर करत नाही.
  • तुम्ही तुमच्या Google खाते मधील कोणत्या प्रकारचा डेटा तृतीय पक्षासह शेअर करण्याची संमती दिली आहे याचे पुनरावलोकन करू शकता.
  • तृतीय पक्षाला तुमच्या Google खाते चा असलेला अ‍ॅक्सेस तुम्ही कधीही काढून टाकू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे Google खाते आणि तृतीय पक्ष ॲप किंवा सेवा यांमधील कनेक्शन हटवल्यास, तुम्ही अ‍ॅप अथवा सेवेसह आधीच शेअर केलेला डेटा ती ठेवू शकते. तृतीय पक्ष ॲप किंवा सेवेसह शेअर केलेला डेटा हटवण्यासाठी, तपशिलांकरिता अ‍ॅप अथवा सेवेच्या वेबसाइटला भेट द्या.

संबंधित स्रोत

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18442311073537101843
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false