तुमची घर आणि ऑफिसशी संबंधित सेटिंग्ज अपडेट करणे

सर्व Google उत्पादनांवर तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुम्ही तुमचे Google खाते घर आणि ऑफिसचे पत्ते वापरू शकता.

तुम्ही तुमच्या Google खाते साठी घर किंवा ऑफिसचा पत्ता सेट केल्यास, तुम्हाला अधिक उपयुक्त परिणाम आणि नेव्हिगेशन दिशानिर्देश आणखी झटपट मिळतील. संपूर्ण Google वर तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी आम्ही तुमचे पत्ते वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही तुमच्या घराजवळील शोध परिणाम दाखवू शकतो, ऑफिसला जाण्याचा दिशानिर्देश मिळवू शकतो आणि अधिक उपयुक्त जाहिराती दाखवू शकतो. तुम्ही तुमच्या Google खाते वरून तुमचे पत्ते कधीही काढून टाकू शकता.

तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता जोडा अथवा बदला

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे Profile आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  3. सर्वात वरती, वैयक्तिक माहिती वर टॅप करा.
  4. “पत्ते” च्या अंतर्गत, घर किंवा ऑफिस वर टॅप करा.
  5. तुमचा नवीन पत्ता एंटर करा.
  6. सेव्ह करा वर टॅप करा.

टीप: फक्त तुम्ही घराचे आणि ऑफिसचे पत्ते अ‍ॅक्सेस करू शकता. तुम्हाला तुमच्या Google खाते वर पत्ता सार्वजनिक करायचा असल्यास, तुम्ही तो प्रोफाइल पत्ता म्हणून जोडू शकता.

तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता काढून टाका

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail ॲप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे Profile आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    • तुम्ही Gmail वापरत नसल्यास, myaccount.google.com वर जा.
  3. सर्वात वरती, वैयक्तिक माहिती वर टॅप करा.
  4. “पत्ते” च्या अंतर्गत, घर किंवा ऑफिस वर टॅप करा.
  5. काढून टाका वर टॅप करा.

घर किंवा ऑफिसला जाण्याचे दिशानिर्देश पिन करा

Google Maps मधील “जा” टॅबमध्ये, तुम्हाला तुमचे पिन केलेले प्रवास हे पोहोचण्याची वेळ आणि रहदारीशी संबंधित माहिती यांसह दिसतील. तुमच्या आवडत्या प्रवासांबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता शोधा.
  3. दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  4. तुमचा वाहतुकीचा मोड निवडा.
  5. घर किंवा ऑफिस वर टॅप करा.
  6. तळाशी, पिन करा वर टॅप करा.

घर किंवा ऑफिससाठी आयकन निवडा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. “तुमच्या सूची” च्या अंतर्गत, लेबल केलेले वर टॅप करा.
  4. “घर” किंवा “ऑफिस” च्या शेजारी, आणखी आणखी आणि त्यानंतर आयकन बदला वर टॅप करा.
  5. तुमच्या घर किंवा ऑफिसाठी आयकन निवडा.
  6. सेव्ह करा वर टॅप करा.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15909885533605163945
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false