तुमच्या खात्याची पडताळणी करणे

गैरवापरापासून तुमचे संरक्षण करण्यात मदत व्हावी, यासाठी तुम्ही तुमचे खाते तयार करण्यापूर्वी किंवा त्यामध्ये साइन इन करण्यापूर्वी आम्ही काही वेळा तुम्हाला तुम्ही रोबोट नसल्याचे सिद्ध करण्याची विनंती करतो. फोनवरून केलेले हे अतिरिक्त कन्फर्मेशन स्पॅमरना आमच्या सिस्टीमचा गैरवापर करण्यापासून प्रतिबंधित करते.

टीप: तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी, तुमच्याकडे मोबाइल डिव्हाइस असणे आवश्यक आहे.

एसएमएस किंवा व्हॉइस मेसेजद्वारे पडताळणी करण्याचे शुल्क

तुमचा प्लॅन आणि पुरवठादार यांनुसार तुमच्या एसएमएस किंवा व्हॉइस मेसेजचे शुल्क बदलते, पण ते शक्यतो तुमच्या साधारण एसएमएस आणि कॉल शुल्कांएवढे असेल. तुम्ही व्हॉइस कॉलचा पर्याय निवडता, तेव्हा तुम्ही तुमच्या घराचे फोन नंबरदेखील वापरू शकता.

अधिक तपशिलांसाठी, तुमच्या मोबाइल फोन पुरवठादाराशी संपर्क साधा.

पडताळणीसंबंधी समस्यांचे निराकरण करा

एसएमएस मिळाला नाही

तुम्ही दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रामध्ये राहत असल्यास किंवा तुमच्या वाहकाचे इंफ्रास्ट्रक्चर चांगले नसल्यास, एसएमएस डिलिव्हर होण्यास उशीर होऊ शकतो. तुम्ही काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास आणि तरीही आमचा एसएमएस न मिळाल्यास, व्हॉइस कॉल हा पर्याय वापरून पहा.

"हा फोन नंबर पडताळणीसाठी वापरला जाऊ शकत नाही"

तुम्हाला हा एरर मेसेज मिळाल्यास, तुम्हाला वेगळा नंबर वापरावा लागेल. गैरवापरापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक फोन नंबर वापरून तयार करता येणाऱ्या खात्यांची संख्या आम्ही मर्यादित करतो. तुम्ही त्याऐवजी एखाद्या कुटुंब सदस्याचा किंवा मित्राचा फोन नंबर वापरू शकता. तुम्ही वेगळ्या फोन वाहकाकडील नंबर वापरण्याचा प्रयत्न केल्यासदेखील मदत होऊ शकते.

"पडताळणीसाठी हा फोन नंबर खूप वेळा वापरला गेला आहे"

तुम्हाला हा एरर मेसेज मिळाल्यास, तुम्हाला वेगळा नंबर वापरावा लागेल. गैरवापरापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी, एखादा फोन नंबर पडताळणीकरिता किती वेळा वापरला जाऊ शकतो ही संख्या आम्ही मर्यादित करतो. तुम्ही त्याऐवजी एखाद्या कुटुंब सदस्याचा किंवा मित्राचा फोन नंबर वापरू शकता.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
278703983518561061
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false