Google Authenticator वापरून पडताळणी कोड मिळवणे

तुम्ही २ टप्पी पडताळणी सेट केल्यास, कोड जनरेट करण्यासाठी Google Authenticator अ‍ॅप वापरू शकता. इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाइल सेवा नसतानाही तुम्ही कोड जनरेट करू शकता. २ टप्पी पडताळणी याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे Google Authenticator कोड सिंक्रोनाइझ केलेले ठेवा

Android वरील Google Authenticator 6.0 आणि iOS वरील 4.0 ही आवृत्ती तुमचे सर्व पडताळणी कोड तुमच्या संपूर्ण डिव्हाइसवर सिंक्रोनाइझ केलेले ठेवण्यासाठीचा पर्याय देऊ करते आणि हे तुम्ही फक्त तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करून करू शकता.

डेटा एंक्रिप्शन
Google हे आमच्‍या सर्व उत्‍पादनांवर ट्रांझिटमध्ये आणि ॲट रेस्ट असताना डेटा एंक्रिप्ट करते. काही उत्पादनांमध्ये, आम्ही एंड-टू-एंड एंक्रिप्शन (E2EE) सह तुमच्या डेटासाठी अतिरिक्त संरक्षणाचा पर्यायदेखील देतो. मात्र, तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास, E2EE चा वापर केल्यामुळे तुमचा डेटा कायमचा लॉक होऊ शकतो. पर्यायांच्या संपूर्ण संचाची खात्री करण्यासाठी, आम्ही भविष्यामध्ये आमच्या Google Authenticator यासारख्या काही उत्पादनांमध्ये पर्यायी E2EE रोल आउट करू.

अ‍ॅपशी संबंधित आवश्यकता

तुमच्या Android डिव्हाइसवर Google Authenticator वापरण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी लागतील:

Authenticator डाउनलोड करा

INSTALL GOOGLE AUTHENTICATOR

Authenticator सेट करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google खाते वर जा.
  2. सर्वात वरती, सुरक्षा टॅबवर टॅप करा.
    • सुरुवातीला तुम्हाला सुरक्षा टॅब मिळत नसल्यास, तुम्हाला तो दिसेपर्यंत सर्व टॅबमधून स्वाइप करा.
  3. "तुम्ही आणखी साइन-इन पर्याय जोडू शकता" या अंतर्गत Authenticator वर टॅप करा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  4. Authenticator सेट करा वर टॅप करा.
    • काही डिव्हाइसवर, सुरुवात करा वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

तुमचे Google Authenticator कोड ट्रान्सफर करणे

तुम्ही Google Authenticator मध्ये त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्ही वापरता त्या कोणत्याही नवीन डिव्हाइसवर तुमच्या कोडचा आपोआप बॅकअप घेतला जाईल आणि ते रिस्टोअर केले जातील.

तुम्ही Google खाते मध्ये साइन इन केलेले नसले, तरीही तुम्ही तुमचे कोड दुसर्‍या डिव्हाइसवर मॅन्युअलीदेखील ट्रान्सफर करू शकता:

नवीन फोनवर Authenticator कोड मॅन्युअली ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:

  • Google Authenticator कोडसह तुमचे जुने डिव्हाइस
  • तुमच्या जुन्या डिव्हाइसवर इंस्टॉल केलेली Google Authenticator अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती
  • तुमचे नवीन डिव्हाइस
  1. तुमच्या नवीन फोनवर, Google Authenticator अ‍ॅप इंस्टॉल करा.
  2. Google Authenticator ॲपमध्ये, सुरुवात करा वर टॅप करा.
  3. तळाशी, सध्याची खाती इंपोर्ट करायची आहेत का? वर टॅप करा.
  4. तुमच्या जुन्या डिव्हाइसवर, QR कोड तयार करा:
    1. Authenticator अ‍ॅपमध्ये, आणखी More आणि त्यानंतर खाती ट्रान्सफर करा आणि त्यानंतर खाती एक्सपोर्ट करा वर टॅप करा.
    2. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाइसवर ट्रान्सफर करायची असलेली खाती निवडा.
    3. पुढील वर टॅप करा.
      • तुम्ही एकाहून अधिक खाते ट्र्रान्सफर केल्यास, तुमचे जुने डिव्हाइस एकापेक्षा जास्त QR कोड तयार करू शकते.
  5. तुमच्या नवीन फोनवर, QR कोड स्कॅन करा वर टॅप करा.

तुम्ही तुमचे QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला तुमची Authenticator खाती ट्रान्सफर केली असल्याचे कंफर्मेशन मिळते.

टीप: तुमचा कॅमेरा QR कोड स्कॅन करू शकत नसल्यास, तेथे खूप माहिती असू शकते. कमी खात्यांसह पुन्हा एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा.

सामान्य समस्या

चुकीच्या कोडचे निराकरण करा

तुमचा कोड चुकीचा असल्यास, पुढील गोष्टी कंफर्म करा:

  • कोड एक्स्पायर होण्याआधी तुम्ही तो एंटर केला आहे.
  • तुमच्या डिव्हाइसवरील वेळ तुमच्या स्थानिक टाइम झोनसाठी योग्य आहे.

तरीही तुमचा कोड चुकीचा असल्यास, तुमचे Android डिव्हाइस सिंक करा:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Authenticator अ‍ॅप Authenticator उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतरकोडसाठी वेळेसंबंधी दुरुस्ती आणि त्यानंतर आता सिंक करा निवडा.
    • पुढील स्क्रीनवर, अ‍ॅप हे वेळ सिंक केल्याचे कंफर्म करते.
  3. साइन इन करण्यासाठी, तुम्ही तुमचे पडताळणी कोड वापरू शकता.
    • सिंक तुमच्या Google Authenticator अ‍ॅपच्या फक्त अंतर्गत वेळेवर परिणाम करते. तुमच्या डिव्हाइसची तारीख आणि वेळ सेटिंग्ज बदलणार नाहीत.
हरवलेले किंवा चोरीला गेलेले डिव्हाइस
Google Authenticator कोड हे स्थानिकरीत्या तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केले जातात. कोड काढून टाकण्यासाठी,iOS किंवा Android साठी रिमोट डिव्हाइस मिटवा पर्याय वापरा. हा पर्याय उपलब्ध नसल्यास, कोड काढून टाकण्यासाठी तुम्ही Google Authenticator सेट केलेल्या प्रत्येक साइटला भेट द्या आणि तुमचे नवीन डिव्हाइस पुन्हा लिंक करा.

एकाहून अधिक खात्यांवर Authenticator वापरणे

एकाहून अधिक खात्यांसाठी २-टप्पी पडताळणी सेट करणे

Authenticator एकाच मोबाइल डिव्हाइसवरून एकाहून अधिक खात्यांसाठी कोड जारी करू शकते. प्रत्येक Google खाते मध्ये वेगळी गुप्त की असणे आवश्यक आहे.

अतिरिक्त खाती सेट करण्यासाठी:

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9903683548674500463
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false