YouTube लाइव्ह स्ट्रीमिंगशी संबंधित टिपा

तुम्ही लाइव्ह स्ट्रीमद्वारे व्हिडिओ, चॅट आणि आणखी बऱ्याच मार्गांनी तुमच्या प्रेक्षकांशी रीअल टाइम जोडले जाऊ शकता.

YouTube वरील लाइव्ह स्ट्रीमिंग चा परिचय

 

सुरुवात करण्यासाठी, तुमच्या खात्यावर लाइव्ह स्ट्रीम सेट करा आणि तुम्ही लाइव्ह कसे जाल ते निवडा:

१. लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू करा

लाइव्ह स्ट्रीम करण्यासाठी, तुमच्यावर मागील ९० दिवसांमध्ये कोणतेही लाइव्ह स्ट्रीमिंगशी संबंधित निर्बंध नसणे आणि तुमच्याकडे पडताळणी केलेले चॅनल असणे आवश्यक आहे.

२. स्ट्रीम करण्याचा मार्ग निवडा

स्ट्रीमचे तीन प्रकार आहेत: मोबाइल, वेबकॅम आणि एन्कोडर. तुम्ही जे स्ट्रीम करत आहात त्यानुसार यातील सर्वोत्तम प्रकार निवडा.

मोबाइल

व्हीलॉगिंगसाठी आणि तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून झटपट अपडेट देण्यासाठी हा पर्याय चांगला आहे.

मोबाइल लाइव्ह स्ट्रीम तयार करण्यासाठी, तुम्ही आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

मोबाइल स्ट्रीम कसे करावे ते जाणून घ्या.

वेबकॅम

तुमच्या कॉंप्युटरवरून लाइव्ह स्ट्रीम करा. तुमच्याकडे वेबकॅम असलेला कॉंप्युटर असणे आवश्यक असेल.

वेबकॅम वापरून स्ट्रीम कसे करावे ते जाणून घ्या.

  • तुम्ही Wirecast किंवा www.youtube.com/webcam सारखा सॉफ्टवेअर एन्कोडिंग प्रोग्राम वापरू शकता.
  • उच्च उत्पादन मूल्याच्या इव्हेंटसाठी, आम्ही व्यावसायिक दर्जाच्या हार्डवेअर एन्कोडरची शिफारस करतो.

एन्कोडर

एन्कोडर तुम्हाला गेमप्ले, ओव्हरले स्ट्रीम करू देतात आणि प्रीअँप, माइक व कॅमेरा यांसारखे हार्डवेअर वापरू देतात. या प्रकारचे स्ट्रीम साधारणपणे गेमिंग, क्रीडाविषयक इव्हेंट, कॉन्सर्ट आणि काँफरन्ससाठी वापरले जाते.

एन्कोडर वापरून स्ट्रीम कसे करावे ते जाणून घ्या.

एन्कोडर वापरून लाइव्हस्ट्रीम करण्यासाठी:

  • लाइव्हस्ट्रीमसाठी किमान दोन तास आधी एन्कोडर सेट करा.
  • इव्‍हेंट सुरू होण्‍यासाठी शेड्युल केलेल्या वेळेच्या किमान १५ मिनिटांपूर्वी एन्कोडर सुरू करा.
  • स्ट्रीमिंग सुरू करा वर क्लिक करण्यापूर्वी, लाइव्ह कंट्रोल रूममध्ये पूर्वावलोकन पहा.
  • चाचणी एन्कोडर फेलओव्हरसाठी, प्राथमिक एन्कोडर थांबवा किंवा त्याची इथरनेट केबल अनप्लग करा. प्लेअर हा बॅकअप एन्कोडरवर काम करत असल्याची खात्री करा.
  • सर्व स्थानिक संग्रहित फाइल सुरक्षित असल्याची पडताळणी करा. स्थानिक संग्रहित फाइलचा आकार वाढत असल्याचे तपासा.
  • इव्हेंट हा चॅनल आणि वॉच पेजद्वारे अ‍ॅक्सेस करता येत असल्याची पडताळणी करा.
  • इव्हेंट हा मोबाइल डिव्हाइसद्वारे अ‍ॅक्सेस करता येत असल्याची पडताळणी करा.
  • ऑडिओ आणि व्हिडिओ गुणवत्तेसाठी स्ट्रीमचे सतत निरीक्षण करा.
  • तुमचा इव्‍हेंट YouTube वर थांबल्यानंतर, एन्कोडर थांबवा.

YouTube Studio वापरून, तुमच्या काँप्युटरवरून लाइव्हस्ट्रीम कसे करावे ते जाणून घ्या.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • हे तुमच्यासाठी नवीन असल्यास, परिपूर्ण व्हिडिओ बनवण्याबद्दल चिंता करू नका. सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. यानंतर तुमच्याकडे व्हिडिओ सेटिंग्ज संपादित करणे किंवा व्हिडिओ हटवणे हे पर्याय असतील.
  • तुमच्याकडे महाग उपकरण असण्याची आवश्यकता नाही, तुमच्याकडे जे काही असेल ते चालेल.
  • त्यासोबत मजा करायला विसरू नका. तुम्हाला कोणती गोष्ट प्रेरित करते याचा विचार करा आणि सुरुवात करा.

आम्ही शिफारस करतो

पायर्‍यांचा सराव व्हावा, यासाठी चाचणी लाइव्ह स्ट्रीम करून पहा. लाइव्ह स्ट्रीम सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमचा व्हिडिओ सार्वजनिक किंवा सूचीमध्ये नसलेला या मोडवर सेट करू शकता.

पुढील: तुमचा व्हिडिओ ऑप्टिमाइझ करण्यासाठी टिपा पहा

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18104116719138906721
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false