दर्शकांशी संबंधित अपडेट

YouTube वरील सर्व नवीनतम बदलांबाबत अप टू डेट राहण्यासाठी हा लेख वापरा. तुम्ही YouTube Premium सदस्य असल्यास, येथे अपडेट आणि प्रमोशन यांबद्दल वाचा. तुम्ही व्हिडिओ निर्माणकर्ता असल्यास, येथे निर्माणकर्ता टूल आणि वैशिष्ट्ये यांमधील बदलांविषयी जाणून घ्या.

नवीनतम अपडेट

मागील दोन आठवड्यांमधील अपडेट

  • तुमच्या स्मार्ट टीव्हीवरील नवीन अँबियंट डिस्प्ले: तुमच्या स्‍मार्ट टीव्ही आणि इतर डिव्‍हाइसवर YouTube पाहताना, तुम्‍हाला इनॅक्टिव्हिटीच्या कालावधीदरम्यान अँबियंट डिस्प्ले दिसेल. अँबियंट डिस्प्ले हा विविध प्रकारच्या आल्हाददायक YouTube व्हिडिओची स्टिल वापरून तयार केलेला असतो आणि तो स्क्रीन बर्न-इन टाळण्यात मदत करतो. अधिक जाणून घ्या.
  • प्रतिक्रिया आता सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत: प्रतिक्रिया देण्याच्या सुविधेचा विस्तार हा iPhones आणि iPads व्यतिरिक्त, कॉंप्युटर व Android मोबाइल डिव्हाइसवरील लाइव्ह चॅटमध्ये केला आहे. प्रतिक्रिया वापरून, तुम्हाला काय वाटत आहे याच्याशी संबंधित प्रतिक्रियेवर टॅप करून तुम्ही त्याच क्षणी प्रतिसाद देऊ शकतात. प्रतिक्रिया या निनावी असतात. अधिक जाणून घ्या.
  • HomePod आणि Fitbit वर YouTube Music ऐका: तुम्ही YouTube Music Premium किंवा YouTube Premium सदस्य असल्यास, सपोर्ट असलेल्या Fitbits व Apple HomePods वर डाउनलोड केलेले संगीत आणि पॉडकास्ट ऐकू शकता. अधिक जाणून घ्या.
  • YouTube Music मध्ये पॉडकास्ट ऐका: तुम्ही युरोप, मध्य पूर्व प्रांत किंवा आफ्रिकेमध्ये असल्यास, पॉडकास्ट आता YouTube Music ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या सदस्यत्वाचे स्टेटस काहीही असले, तरीही तुमची आवडती पॉडकास्ट शोधा आणि ती बॅकग्राउंडमध्ये ऐका. YouTube Music मध्ये पॉडकास्ट कशी शोधावीत हे जाणून घ्या.
  • YouTube Music मध्ये पॉडकास्ट ऐका: तुम्ही कॅनडा, लॅटिन अमेरिका, आशिया किंवा पॅसिफिक बेटांमध्ये असल्यास, पॉडकास्ट आता YouTube Music ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या सदस्यत्वाचे स्टेटस काहीही असले, तरीही तुमची आवडती पॉडकास्ट शोधा आणि ती बॅकग्राउंडमध्ये ऐका. YouTube Music मध्ये पॉडकास्ट कशी शोधावीत हे जाणून घ्या.
  • YouTube Music मधील टिप्पण्ण्या: तुम्ही आता iOS आणि Android वरील YouTube Music अ‍ॅपमध्ये गाणी, व्हिडिओ व पॉडकास्टच्या भागांवर टिप्पणी करू शकता. टिप्पण्या हा स्वतःला व्यक्त करण्याचा आणि इतर YouTube वापरकर्त्यांशी कनेक्ट होण्याचा उत्तम मार्ग आहे. अधिक जाणून घ्या.
  • NFL संडे तिकीट विद्यार्थी सदस्यत्व खरेदी करा: बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ पासून आम्ही NFL संडे तिकीट विद्यार्थी सदस्यत्व रोल आउट करत आहोत. पात्र विद्यार्थी YouTube वर $१०९ मध्ये NFL संडे तिकीट खरेदी करू शकतात किंवा आणखी $१० मध्ये ते NFL RedZone सोबत एकत्रित करू शकतात. सप्टेंबरमध्ये नियमित सीझन सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी सदस्यत्व देशभरात उपलब्ध होईल. विद्यार्थी सदस्यत्व याबद्दल अधिक जाणून घ्या.

Welcome to the YouTube Viewers Channel!

नवीनतम बातम्या, अपडेट आणि टिपांसाठी, YouTube Viewers चॅनल याचे सदस्यत्व घ्या.

मागील अपडेट

मागील ६ महिन्यांमधील अपडेट

ऑगस्ट २०२३

  • YouTube Music अ‍ॅपमध्ये Samples पहा:Samples हा YouTube Music अ‍ॅपमधील नवीन अनुभव आहे, जो पर्सनलाइझ केलेली संगीत व्हिडिओ सेगमेंट स्ट्रीम करण्याची सुविधा देतो. Samples कसे वापरावे ते जाणून घ्या किंवा पाहण्यास सुरुवात करण्यासाठी, तळाशी असलेल्या मेनूमध्ये Samples वर टॅप करा.
  • मासिक पेमेंटसह NFL संडे तिकीट खरेदी करा: YouTube आणि YouTube TV वर NFL संडे तिकीट खरेदी करण्यासाठी आम्ही मासिक पेमेंट प्लॅन रोल आउट करत आहोत. बहुतांश स्थानांवरील दर्शकांना ४ मासिक पेमेंटच्या पेमेंट प्लॅनद्वारे NFL संडे तिकीट खरेदी करण्याचा पर्याय दिसू लागेल, जो एकाच पेमेंटमध्ये खरेदी केल्यास तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या किमतीच्या समतुल्य आहे. मासिक पेमेंट प्लॅनबद्दल अधिक जाणून घ्या.

जुलै २०२३

  • YouTube अ‍ॅपवर मल्टिव्ह्यू उपलब्ध आहे: मल्टिव्ह्यूमुळे तुम्हाला स्ट्रीमिंग डिव्हाइसवर किंवा स्मार्ट टीव्हीवर एकाच वेळी कमाल चार स्ट्रीम पाहता येतात. YouTube अ‍ॅपवरील मल्टिव्ह्यू वापरून, तुम्ही वेगवेगळे सामने एकत्र पाहणे, खेळ गतिमान झाल्यावर प्ले-बाय-प्ले ऐकण्यासाठी ऑडिओ बदलणे आणि त्यानंतर सर्व तपशील पाहण्यासाठी फुल स्क्रीन वापरणे हे करू शकता. मल्टिव्ह्यू वापरून एकाच वेळी दाखवल्या जाणाऱ्या स्ट्रीम कशा पहाव्यात.

जून २०२३

  • इमोजीद्वारे प्राइड चे समर्थन करा 🏳️‍🌈: LGBTQ+ समुदायाला पाठिंबा देत असताना लाइव्ह चॅट टिप्पण्यांमध्ये तो व्यक्त करण्याचे आणि शेअर करण्याचे नवीन मार्ग सादर करत आहोत. जून महिन्यादरम्यान, निवडक मार्केटमधील दर्शकांना इमोजी पिकरमध्ये ही नवीन डिझाइन दिसतील. लाइव्ह इमोजीविषयी येथे अधिक जाणून घ्या. संपूर्ण YouTube वर एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी, तुम्ही सर्व इमोजी कसे वापरता हे पाहण्याकरिता आम्ही उत्सुक आहोत!

मे २०२३

  • iPhones आणि iPads वर लाइव्ह चॅटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिक्रिया: iPhone किंवा iPad वर चॅट उघडे ठेवून लाइव्ह स्ट्रीम पाहत असताना, तुम्हाला काय वाटत आहे याच्याशी संबंधित प्रतिक्रियेवर टॅप करून तुम्ही त्याच क्षणी प्रतिसाद देऊ शकता. अधिक जाणून घ्या.
  • २६ जूनपासून स्टोरीज उपलब्ध नसतील: २६ जून पासून, YouTube वर स्टोरीज उपलब्ध नसतील. तुम्ही तरीही २६ जूनपर्यंत आधीच पोस्ट केलेल्या कोणत्याही स्टोरीज या त्या पहिल्यांदा शेअर केल्यानंतर ७ दिवसांसाठी पाहू शकता. अधिक जाणून घ्या.

एप्रिल २०२३

  • YouTube Music मध्ये पॉडकास्ट ऐका: तुम्ही यूएसमध्ये असल्यास, पॉडकास्ट आता YouTube Music अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या सदस्यत्वाचे स्टेटस काहीही असले, तरीही तुमची आवडती पॉडकास्ट शोधा आणि ती बॅकग्राउंडमध्ये ऐका. YouTube Music मध्ये पॉडकास्ट कशी शोधावीत हे जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12628974801865693343
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false