निर्माणकर्ता अपडेट

नवीनतम निर्माणकर्ता अपडेटबाबत अप टू डेट राहण्यासाठी हा लेख वापरा. इतर विषयांसाठी, हे लेख पहा:

नवीनतम अपडेट

मागील दोन आठवड्यांमधील अपडेट

YouTube Studio
  • बदललेले आशय सेटिंग: १८ मार्च २०२२ पासून, जागतिक स्तरावर तुम्ही अपलोड करत असलेला आशय अर्थपूर्ण पद्धतीने बदल केलेला किंवा कृत्रिमरीत्या जनरेट केलेला आहे की नाही, हे तुम्हाला अपलोड फ्लोमध्ये उघड करणे आवश्यक असेल. हे टूल प्रथम कॉंप्युटरवरील YouTube Studio मध्ये उपलब्ध होईल आणि नंतर मोबाइल क्रीएशनसाठी विस्तारित केले जाईल. अधिक जाणून घ्या.
  • "टॉप समुदाय क्लिप" विभाग: तुम्ही तुमच्या चॅनलच्या होम टॅबवर तुमच्या व्हिडिओच्या टॉप क्लिप दाखवू शकता. या क्लिप तुम्ही किंवा तुमच्या समुदायाने तयार केलेल्या असू शकतात. तुमच्या होम टॅबमध्ये जोडल्यानंतर, क्लिप सार्वजनिकरीत्या दृश्यमान असतात आणि त्या लोकप्रियतेनुसार व किती अलीकडे तयार केल्या गेल्या यानुसार संगतवार लावल्या जातात. अधिक जाणून घ्या.
  • Studio मोबाइल मधील अपलोड: तुम्ही आता तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर थेट YouTube Studio मध्ये व्हिडिओ आणि शॉर्ट साठी कमाईचे स्टेटस अपलोड आणि सेट करू शकता. YouTube Studio वापरून व्हिडिओ आणि शॉर्ट अपलोड कसे करावेत याबद्दल जाणून घ्या. 
YouTube विश्लेषण
  • व्हर्टिकल लाइव्ह साठी ट्रॅफिक: दर्शक ट्रॅफिक स्रोतांच्या मदतीने व्हर्टिकल लाइव्ह कसे डिस्कव्हर करतात याबद्दल आणखी माहिती मिळवा. तुम्ही तुमच्या प्रकाशित केलेल्या व्हर्टिकल लाइव्ह चे प्लेबॅक स्थान आणि व्हर्टिकल लाइव्ह फीड च्या ट्रॅफिक स्रोत विभागामध्ये तुमच्या दर्शकांचे स्रोत पाहू शकता.
YouTube Shorts
  • ड्रीम ट्रॅक: Shorts मधील ड्रीम ट्रॅक हे गाणे तयार करण्याचे प्रायोगिक टूल आहे, जे निर्माणकर्त्यांना सहभागी कलाकारांचे आवाज वापरून ३० सेकंदांचा युनिक साउंडट्रॅक तयार करू देते. Shorts वरील निर्माणकर्त्यांसाठी कलाकार तयार करण्याचे आणि त्यांच्याशी समरस होण्याचे नवीन मार्ग उघडण्याकरिता, ते आमच्या संगीत उद्योगामधील भागीदारांच्या कौशल्यासोबत Google DeepMind आणि YouTube च्या सर्वाधिक नवप्रवर्तनशाली संशोधकांचे कौशल्य एकत्र आणते. हे वैशिष्ट्य सध्या फक्त युनायटेड स्टेट्समधील निर्माणकर्त्यांच्या मर्यादित संचासाठी आणि ठरावीक मोबाइल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. या प्रयोगामधील फीडबॅकचा आम्ही कलाकारांना आणि निर्माणकर्त्यांना फायदेशीर ठरू शकणाऱ्या संभाव्य उत्पादन संधींमध्ये समावेश करू अशी आम्हाला आशा आहे. जगभरातील प्रेक्षक त्यांच्या स्वतःच्या शॉर्ट मध्ये रीमिक्स करण्यासाठी साउंडट्रॅक जसे आहेत तसे वापरू शकतात.

इतर अपडेट

YouTube निर्माणकर्ते चॅनलमधील मासिक राउंडअप

YouTube निर्माणकर्ते मासिक राउंडअप

 

मागील अपडेट

मागील ६ महिन्यांमधील अपडेट

नोव्हेंबर २०२३

YouTube Music

YouTube विश्लेषण

  • आशय प्रकारानुसार मेट्रिक: तुम्ही आता नवीन आणि परत येणाऱ्या दर्शकांसंबंधित विश्लेषणे आशयाच्या प्रकारानुसार पाहू शकता, जेणेकरून ते तुमच्या चॅनलवरील कोणत्या प्रकारच्या आशयाशी संवाद साधतात याबद्दल जाणून घेता येईल. अधिक जाणून घ्या.
YouTube Studio
  • “तुमच्यासाठी” विभाग: तुमच्या चॅनल होम टॅबवरील "तुमच्यासाठी" विभाग तुम्हाला तुमच्या चॅनलवरील मिश्र आशय शेअर करू देतो, जो वैयक्तिक दर्शकांसाठी पर्सनलाइझ केलेला आहे. तुम्ही ८ नोव्हेंबर २०२३ पासून तुमच्या चॅनलवर “तुमच्यासाठी” विभागाची तयारी सुरू करू शकता. तुमच्या प्रेक्षकांना तो २० नोव्हेंबर २०२३ पासून दिसेल. अधिक जाणून घ्या.
  • Studio अ‍ॅपमध्ये नवीन पेमेंट माहिती: आम्ही नवीन बीटा सादर करत आहोत, ज्यामुळे YouTube Studio मोबाइल अ‍ॅपच्या कमाई टॅबमध्ये पेमेंट माहिती मिळते. पात्र निर्माणकर्ते पुढील पेमेंटसाठीची त्यांची प्रगती आणि पेमेंट इतिहास पाहू शकतात. बीटाबद्दल आमची फोरम पोस्ट यामध्ये अधिक जाणून घ्या.
  • सुलभ केलेला YouTube चॅनल होम टॅब: सुलभ केलेला वापरकर्ता अनुभव मिळावा, यासाठी अपडेट केलेला YouTube चॅनल होम टॅब हा रिक्त टॅब लपवतो आणि ‘याविषयी’ व ‘चॅनल’ हे टॅब काढून टाकतो. या टॅबवर आधी उपलब्ध असलेली माहिती तुमच्या चॅनलवर इतर ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या चॅनलचे वर्णन चॅनल हेडरमध्ये आणि होम टॅबवर कोणत्याही वैशिष्ट्यपूर्ण चॅनलमध्ये शोधू शकता.
  • तुमच्या चॅनलवर लिंक दाखवा: चॅनल होम टॅबवरील निर्माणकर्ता लिंक आता चॅनल प्रोफाइल हेडरवर "सदस्यत्व घ्या" बटणाजवळ ठळकपणे दाखवल्या जातात. निर्माणकर्ते यापुढे बॅनरमध्ये लिंक दाखवू शकणार नाहीत.
  • तुमचा कलाकार Recap पहा: वर्षभरातील माइलस्टोन साजरे करण्यासाठी तुमचा कलाकार Recap वापरा आणि YouTube वरील तुमच्या संगीताशी चाहते कसे समरस होतात हे जाणून घ्या. त्यानंतर, कस्टम डेटा कार्ड वापरून सोशल मीडियावर तुमची कामगिरी शेअर करा. तुमचा कलाकार Recap याबद्दल अधिक जाणून घ्या.

ऑक्टोबर २०२३

कमाई

  • YouTube साठी Google वर खरेदी करा बंद होणार आहे: २६ ऑक्टोबर २०२३ पासून, YouTube साठी Google वर खरेदी करा हे YouTube वरील अ‍ॅपमधील चेकआउट वैशिष्ट्य यापुढे युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध असणार नाही. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या कोणत्याही ऑर्डर तरीही पूर्ण केल्या जातील. आम्ही भविष्यामध्ये आमचे किरकोळ विक्रेते, निर्माणकर्ते आणि दर्शक यांसाठी उपयुक्त ऑनसाइट चेकआउट अनुभव पुरवत असल्याची खात्री करण्याकरिता इतर मार्गांना प्राधान्य देऊ.

सप्टेंबर २०२३

YouTube Studio
  • YouTube Studio मधील क्लिप: निर्माणकर्ते आता YouTube Studio मध्ये क्लिप पाहणे, त्या व्यवस्थापित आणि शेअर करणे हे करू शकतात. अधिक जाणून घ्या.

ऑगस्ट २०२३

इतर अपडेट

  • YouTube वर बदल लिंक करणे: स्पॅम आणि घोटाळ्याचे प्रयत्न कमी करण्यासाठी, ३१ ऑगस्ट २०२३ पासून YouTube शॉर्ट वरील टिप्पण्या यांमधील व शॉर्ट च्या वर्णनांमधील लिंक या क्लिक करण्यायोग्य नसतील–हा बदल हळूहळू रोल आउट होईल. आम्ही १० ऑगस्ट २०२३ रोजी बॅनर लिंकदेखील काढून टाकत आहोत आणि तुमच्या चॅनल पेजवर महत्त्वाच्या लिंक दाखवणे यासाठी एक नवीन मार्ग सादर करत आहोत. तुम्ही १० ऑगस्टपासून चॅनल प्रोफाइल लिंक तयार करणे सुरू करू शकता आणि तुमच्या प्रेक्षकांना त्या २३ ऑगस्टपासून दिसू लागतील. या बदलाविषयी अधिक जाणून घ्या.
  • YouTube वरील नवीन प्रगत वैशिष्ट्य: १७ ऑगस्ट २०२३ पासून, तुमच्या चॅनलवरील व्हिडिओची लिंक समाविष्ट करण्यासाठी तुमचे शॉर्ट संपादित करा. दर्शकांना तुमच्या शॉर्ट वरून तुमच्या इतर YouTube आशयाकडे निर्देशित करण्यात मदत करण्यासाठी ही लिंक Shorts प्लेअरमध्ये दिसेल. अधिक जाणून घ्या.

जुलै २०२३

YouTube Studio
  • चॅनलसंबंधित परवानग्यांचा विस्तार: परवानगी असलेले वापरकर्ते तुमच्या चॅनलसंदर्भात YouTube Studio सोबतच थेट YouTube वर कृती करू शकतात. आता, व्यवस्थापक किंवा संपादक अ‍ॅक्सेस असलेले प्रतिनिधी वापरकर्ते हे शॉर्ट तयार करू शकतात, पोस्ट जोडू शकतात, प्लेलिस्ट व्यवस्थापित करू शकतात किंवा मालकाप्रमाणे कोणत्याही YouTube व्हिडिओवर टिप्पणी करू शकतात. अधिक जाणून घ्या.

जून २०२३

कमाई
  • YouTube Shopping संलग्न प्रोग्राम आता सर्व पात्र यूएस निर्माणकर्त्यांसाठी उपलब्ध आहे: १३ जून २०२३ पासून, YouTube Shopping संलग्न प्रोग्राम आता यूएसमध्ये पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व निर्माणकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. बॅकग्राउंडसाठी, YouTube Shopping संलग्न प्रोग्राम हा निर्माणकर्त्यांना त्यांच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेल्या लोकप्रिय ब्रँड आणि रिटेल विक्रेत्यांची उत्पादने टॅग करू देतो. अधिक जाणून घ्या.
YouTube विश्लेषण
YouTube विश्लेषण मधील ‘सर्व फॉरमॅटवरील दर्शक’ हे नवीन कार्ड: तुम्ही आता YouTube विश्लेषण मधील आशय टॅबमध्ये, तुमचे परत येणारे दर्शक एकाहून अधिक फॉरमॅट पाहतात की नाही आणि त्यांपैकी किती जण ते पाहतात व ओव्हरलॅप किती मोठे आहे हे पाहू शकता. हे व्हिडिओ, शॉर्ट आणि लाइव्ह साठी उपलब्ध आहे. अधिक जाणून घ्या.
Studio मधील नवीन खरेदीशी संबंधित संलग्न मेट्रिक : कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवरील कमाई टॅबमध्ये, तुम्ही आता “संलग्न” या अंतर्गत खरेदीशी संबंधित आणखी संलग्न डेटा शोधू शकता. ही नवीन मेट्रिक तुमची अंदाजे कमाई, एकूण विक्री, ऑर्डरची संख्या आणि एकूण उत्पादनाचा परफॉर्मन्स यांबद्दल इनसाइट देतील. अधिक जाणून घ्या.

मे २०२३

कमाई
  • तुमच्या Spring स्टोअरमधील उत्पादनावर २५% सूट: तुमच्या Spring स्टोअरमध्ये असलेल्या कोणत्याही उत्पादनावर आम्ही २५% सूट देत आहोत. हे प्रमोशन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यावर आधारित असून फक्त मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. या प्रमोशनचा लाभ घेण्यासाठी, तुमचा कोड मिळवणे हे करा आणि चाहत्यांसोबत प्रोमो शेअर करण्यासाठी आशयामध्ये तुमची उत्पादने टॅग करण्यास सुरुवात करा.

  • एंड स्क्रीनवर व्यापारी माल दिसण्याची सुविधा बंद होणार आहे: YouTube वर, आम्हाला खात्री करायची आहे, की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करता यावी, यासाठी तुम्ही तुमच्या उत्पादनांसोबतची समरसता वाढवण्याकरिता प्रयत्न करत आहात. निर्माणकर्ते आणि दर्शकांसाठी Shopping च्या अनुभवामध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, एंड स्क्रीनचा आता सपोर्ट नसेल. तुमच्या उत्पादनांसोबतची समरसता मिळवण्यासाठी, त्यांचे महत्त्व सांगणारा आशय तयार करा आणि दाखवलेली उत्पादने टॅग करणे हे करा, जेणेकरून तुमचे प्रेक्षक ती खरेदी करू शकतील.

YouTube विश्लेषण
  • YouTube विश्लेषण मधील कमाईची नवीन ब्रेकडाउन: वॉच पेज जाहिराती, Shorts फीड जाहिराती, सदस्यत्‍वे, Supers, कनेक्ट केलेली स्टोअर आणि खरेदी अनुषंगिक यांनुसार तुमची विभाजित केलेली कमाई पाहण्यासाठी तुम्ही आता YouTube विश्लेषण मधील कमाई टॅबवर जाऊ शकता. अधिक जाणून घ्या.

  • तुमच्या दर्शकांनी पाहिलेल्या नवीन फॉरमॅटचा YouTube Studio मध्ये अहवाल: तुमच्या प्रेक्षकांनी मागील २८ दिवसांमध्ये इतर चॅनलवर कोणते फॉरमॅट (व्हिडिओ, शॉर्ट आणि लाइव्ह) सर्वात जास्त वेळा पाहिले हे दाखवणारा अहवाल तुम्ही आता प्रेक्षक टॅबमध्ये पाहू शकता. हा डेटा तुमचे आशय धोरण विकसित करण्यात मदत करू शकतो. अधिक जाणून घ्या.

इतर अपडेट
  • २६ जूनपासून स्टोरीज उपलब्ध नसतील: २६ जून पासून, स्टोरीज उपलब्ध नसतील आणि तुम्ही २६ जूनला पोस्ट केलेल्या कोणत्याही स्टोरीज या त्या पहिल्यांदा शेअर केल्यानंतर ७ दिवसांनी एक्स्पायर होतील. तुम्हाला अधिक यशस्वी होण्यात आणि तुमचा समुदाय वाढवण्यात मदत व्हावी, यासाठी YouTube हे इतर प्रमुख वैशिष्ट्यांना प्राधान्य देईल. स्टोरीज मधून मिळालेले व्ह्यू तरीही YouTube विश्लेषण मध्ये दिसतील. अधिक जाणून घ्या.

एप्रिल २०२३

YouTube Music लाइव्ह स्‍ट्रीमिंग
  • iPhones आणि iPads वर लाइव्ह चॅटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिक्रिया: दर्शक iPhone किंवा iPad वर लाइव्ह स्ट्रीम पाहत असताना, त्यांना काय वाटत आहे याच्याशी संबंधित प्रतिक्रियेवर टॅप करून ते त्याच क्षणी प्रतिसाद देऊ शकतात. अधिक जाणून घ्या.
YouTube Shorts
  • क्लिपचे रीमिक्स: तुम्ही आता क्लिप रीमिक्स करून शॉर्ट तयार करू शकता. रीमिक्स आशय वापरून शॉर्ट तयार करण्याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्च २०२३

YouTube Studio
  • YouTube Studio अ‍ॅपमध्ये चॅनलसंबंधित परवानग्या उपलब्ध आहेत: तुम्ही आता YouTube Studio अ‍ॅपमध्ये चॅनलसंबंधित परवानग्यांद्वारे तुमचे प्रतिनिधी व्यवस्थापित करू शकता. प्रतिनिधी आता Studio मध्ये कॉंप्युटरवर, Studio अ‍ॅपमध्ये किंवा YouTube ॲपमध्ये कृती करू शकतात. अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12365598411280088331
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false