Google Maps मध्ये आपत्तीसंबंधी इशारे

तुमच्या सध्याच्या नकाशा दृश्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह आपत्ती दिसत असल्यास, तुम्हाला इव्हेंटविषयी अपडेट आणि सुरक्षेसंबंधित माहितीसह इशारा मिळू शकेल. अ‍ॅक्टिव्ह आपत्तींमध्ये वणवा, पूर किंवा भूकंप यांचा समावेश आहे.

आपत्तीसंबंधित इशारे तुमच्या नकाशावर दिसतात जेव्हा:

  • तुम्ही वणवा असलेला भाग शोधता आणि योग्य झूम पातळीवर असता
  • तुम्ही नेव्हिगेशनमध्ये आपत्तीने प्रभावित झालेल्या भागातून जाणारा मार्ग निवडता

आपत्तीसंबंधित पत्रक वापरा

इशाऱ्यामध्ये, आपत्तीसंबंधित शीटचा विस्तार करण्यासाठी आपत्ती आयकन किंवा इशारा कार्डवर टॅप करा.

शीट अधिक माहिती, अपडेट आणि आपत्तीसंबंधित बातमीविषयक लेखदेखील दाखवू शकते.

इव्हेंटबद्दल जाणून घ्या आणि शेअर करा

“विषयी” अंतर्गत:
  • इव्हेंट आणि इव्हेंटच्या इतर तपशीलांचा सारांश शोधा.
  • इव्हेंट शेअर करण्यासाठी, शेअर करा  निवडा.
  • इव्हेंटचे स्थान शेअर करण्यासाठी, स्थान शेअर करा निवडा.
“मदत आणि माहिती” अंतर्गत, संबंधित बाह्य स्रोतांची सूची शोधा.

इतरांना नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी रस्ता बंद असल्याची तक्रार करा

  1. Google Maps ॲप उघडा.
  2. आपत्तीसंबंधी पत्रक उघडा. “नेव्हिगेशन प्रभाव,” अंतर्गत रस्ता बंद असल्याची तक्रार करा निवडा.
  3. ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.

आपत्तीसंबंधित पत्रकाविषयी फीडबॅक पाठवा

  1. Google Maps ॲप उघडा.
  2. आपत्तीसंबंधी पत्रक उघडा. “तुम्हाला काय वाटते?” अंतर्गत फीडबॅक पाठवा निवडा.
  3. ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.

आपत्तीसंबंधित इशारे समजून घ्या

आपत्तीदरम्यान इशारे स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांकडून मिळालेली अतिमहत्त्वाची माहिती सहज अ‍ॅक्सेस करण्यायोग्य बनवतात. तुम्हाला ती माहिती Google Maps वर हायलाइट केलेली दिसेल. आपत्तीसंबंधित माहितीच्या उदाहरणांमध्ये आणीबाणी फोन नंबर, वेबसाइट किंवा तपशीलवार दृश्यासाठी नकाशा व्हिज्युअलायझेशनचा समावेश आहे.

Google Maps या नैसर्गिक आपत्तींसाठी इशारे दाखवते:

  • भूकंप
  • पूर
  • चक्रीवादळे किंवा तीव्र चक्रीवादळे 
  • उष्णकटिबंधीय वादळे
  • वणवे
इशारा उघडून आपत्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नकाशावरील आयकन निवडा.
टीप: सर्व झूम पातळ्यांमध्ये वणव्याच्या सीमा कदाचित दिसू शकत नाहीत.

अ‍ॅक्टिव्ह वणव्यांविषयी माहिती मिळवा

तुम्ही Google Maps वर वणव्यांविषयी माहिती अनेक मार्गांनी शोधू शकता. ही माहिती तुमच्या नकाशावर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये दाखवली जाऊ शकते.
वणव्यांविषयी माहिती शोधा

तुमच्या नकाशावर अ‍ॅक्टिव्ह वणव्यांविषयी माहिती शोधण्याचे अनेक मार्ग आहेत:

  • वणव्याचे स्तर सुरू करा: स्तरस्तर आणि त्यानंतर वणवे बटणावर टॅप करा.
  • आग शोधा: Google Maps सर्च बॉक्समध्ये आगीसंबंधित क्वेरी एंटर करा जसे की, "वणवे" किंवा स्वतंत्र आगीचे नाव. स्तर दाखवण्यासाठी परिणामावर टॅप करा.
  • आगीसंबंधित इशाऱ्याच्या बॅनरवर टॅप करा: एखाद्या अ‍ॅक्टिव्ह आगीचे स्थान तुमच्या नकाशावर दृश्यमान भागासह ओव्हरलॅप होत असल्यास, Maps होमस्क्रीनवरील एक्सप्लोर शीटमध्ये आगीसंबंधित इशाऱ्याचा बॅनर दिसेल. स्तर सुरू करण्यासाठी बॅनरवर टॅप करा.
टीप: वणवे फक्त ठरावीक झूम स्तरांवर नकाशावर दिसतात. नकाशावर उपलब्ध आगीसंबंधित माहिती पाहण्यासाठी झूम इन करण्याची खात्री करा.
वणव्यांविषयी माहिती समजून घ्या

तुमच्या नकाशावर, वणवे अशा प्रकारे दाखवले जाऊ शकतात:

  • वणव्यांचा आयकन किंवा लहान लाल वर्तुळ
  • वणव्याने प्रभावित झालेला अंदाजे भाग दाखवणारा लाल आकार

वणव्यांमुळे प्रभावित भागांबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: कधीकधी, स्तरामध्ये कोणत्याही अ‍ॅक्टिव्ह आगी दिसत नाहीत. 

अतिरिक्त माहिती मिळवा

उपलब्ध असताना, आम्ही एका विशिष्ट घटनेशी संबंधित अधिक माहिती पुरवतो. ही माहिती आगीसंबंधित आपत्ती शीटवर सूचीबद्ध आहे आणि त्यात हे समाविष्ट असू शकते:

  • स्थानिक अधिकाऱ्यांकडून मदत आणि माहिती
  • बातम्यांची ठळक शीर्षके
  • कंटेनमेंटसंबंधित माहिती

आपत्तीसंबंधित माहिती पत्रक उघडण्यासाठी, नकाशावरील आगीच्या आयकनवर टॅप करा.

वणव्यांविषयी माहितीचे स्रोत

वणव्यांच्या स्तरासाठी डेटा एकत्रित करण्याकरिता Google Maps अनेक स्रोत वापरते.

  • Google SOS Alerts: आपत्ती आल्यास, अतिमहत्त्वाची माहिती आणखी अ‍ॅक्सेस करण्यायोग्य बनवणे हे SOS Alerts चे लक्ष्य आहे. आम्ही वेब, सोशल मीडिया आणि Google उत्पादनांमधून संबंधित व विश्वासार्ह आशय एकत्रित करतो आणि त्यानंतर Search व Maps यांसारख्या Google उत्पादनांवर ती माहिती हायलाइट करतो. SOS Alerts बद्दल अधिक जाणून घ्या.
  • Google सार्वजनिक सूचना: Google सार्वजनिक सूचना जगभरातील अधिकार्‍यांकडून थेट विश्वसनीय सुरक्षा माहितीचा अ‍ॅक्सेस पुरवतात. सार्वजनिक सूचनांना आशय कोण पुरवते याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • नॅशनल इंटरएजन्सी फायर सेंटर (NIFC): या स्तरातील अनेक आगी वाइल्डलँड फायर इंटरएजन्सी जिओस्पेशियल सर्व्हिस (WFIGS) मार्फत NIFC द्वारे पुरवल्या जातात. नकाशावर या आगी एका बिंदूच्या स्वरूपात दाखवल्या जातात आणि नोंदवण्यात आलेल्या आगीचे सुरुवातीचे स्थान दाखवतात. यांपैकी काही आगींना "नियोजित आग" असे लेबल लावले जाऊ शकते, ज्यास विहित आग किंवा नियंत्रित आग असेही म्हटले जाते, ज्यांचा वापर जंगलांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वणव्यांपासून बचाव करण्याकरिता केला जातो. पाच एकरपेक्षा कमी भागात लागलेल्या आगी दाखवल्या जात नाहीत.

काही आगींसाठी, तुम्हाला लाल आउटलाइन दिसेल. हे आगीमुळे प्रभावित झालेला अंदाजे भाग दाखवते. सीमा नकाशांविषयी अधिक जाणून घ्या.

Google यावरूनदेखील डेटा गोळा करते:

  • नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉसफिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)
  • नॅशनल मीटिओरॉलॉजिकल सॅटेलाइट सेंटर (NMSC)
  • जपान मीटिओरॉलॉजिकल एजन्सी (JMA)

Google Maps वरील वणव्यांसंबंधित माहिती अंदाजे आहे. वास्तविक आगीच्या आउटलाइनमध्ये Maps वर ती दाखवली आहे त्यापेक्षा काही मैलांचा फरक असू शकतो. वास्तविक परिस्थितींबद्दल जाणून घेण्यासाठी, अधिकृत स्रोत पहा.

आगीसंबंधित सूचना जनरेट करण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो?

आगीसंबंधित सूचना जनरेट करण्यासाठी, आम्ही रीअल-टाइम सॅटेलाइट इमेजरीमधून आगीची व्यापती ट्रॅक करण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल लागू करतो. हे मॉडेल तृतीय पक्ष सॅटेलाइटच्या हायपरस्पेक्ट्रल इमेजरीच्या सुपररेझोल्यूशन इमेज फ्यूजनवर आधारित आहे, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे:

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14175449627730629488
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false