सेव्ह केलेला टॅब वापरणे

तुम्ही वैयक्तिक आशय शोधण्यासाठी सेव्ह केलेला टॅब वापरू शकता, जसे की:
  • तुमची अलीकडे सेव्ह केलेली ठिकाणे
  • तुमची जवळपासची सेव्ह केलेली ठिकाणे
  • तुमच्या सूची आणि तुम्ही फॉलो करता त्या सूची
  • लेबल केलेल्या जागा
  • तुमची भेट दिलेल्या ठिकाणांची टाइमलाइन
  • My Maps
  • Gmail आणि Calendar मधील आरक्षणे

सेव्ह केलेली ठिकाणे शोधा

महत्त्वाचे: सेव्ह केलेल्या टॅबमधील आशय Google Maps वरील तुमच्या ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असतो.

अलीकडे सेव्ह केलेली

तुम्ही मागील काही महिन्यांमध्ये सेव्ह केलेली ठिकाणे शोधा. तुम्ही मागील १८० दिवसांमध्ये कोणतीही ठिकाणे सेव्ह केली नसल्यास, “अलीकडे सेव्ह केलेली” उपलब्ध नसेल.
  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. तुम्ही तुमच्या सूचीमध्ये अलीकडे जोडलेली ठिकाणे शोधण्यासाठी तुम्ही “अलीकडे सेव्ह केलेली” वर स्क्रोल करू शकता.
  4. आणखी तपशिलांसाठी आणि नकाशावरील त्याच्या स्थानासाठी ठिकाणावर टॅप करा.
  5. सूचीमध्ये थेट जाण्यासाठी सूचीच्या नावावर टॅप करा.

जवळपासची सेव्ह केलेली ठिकाणे

तुम्ही सेव्ह केलेली जवळपासची ठिकाणे शोधा. तुम्ही सेव्ह केलेली ठिकाणे २५ किमीच्या (सुमारे १६ मैल) आत नसल्यास, “जवळपासची सेव्ह केलेली ठिकाणे” उपलब्ध नसेल.
  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. तुम्ही तुमच्या सूचीमध्ये जोडलेली जवळपासची ठिकाणे शोधण्यासाठी तुम्ही “जवळपासची सेव्ह केलेली ठिकाणे” कार्डमधून स्क्रोल करू शकता.
  4. आणखी तपशिलांसाठी आणि नकाशावरील त्याच्या स्थानासाठी ठिकाणावर टॅप करा.
  5. सूचीमध्ये थेट जाण्यासाठी सूचीच्या नावावर टॅप करा.

भेट दिलेली

तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असल्यास, तुम्हाला तुम्ही भेट दिलेली ठिकाणे आणि अ‍ॅक्टिव्हिटी यांच्या टाइमलाइनचा झटपट ॲक्सेस मिळेल.
  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. तुमच्या टाइमलाइनच्या लिंक शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा.

“भेट दिलेले” अंतर्गत, तुम्हाला पुढील माहिती दिसू शकते: काल, तुम्ही भेट दिलेली ठिकाणे, शहरे आणि देश/प्रदेश. टाइमलाइनमध्ये आणखी तपशीलवार माहितीसाठी त्यापैकी कोणत्याही पर्यायावर टॅप करा.

Google Maps टाइमलाइन विषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या सूची

  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. तुमच्या सूची शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. तुम्ही फॉलो करत असलेल्या सूचीदेखील तुम्हाला आढळतील.
  4. नवीन सूची तयार करण्यासाठी नवीन सूची वर टॅप करा.

ठिकाणांची सूची कशी तयार आणि व्यवस्थापित करावी ते जाणून घ्या.

आरक्षणे

तुम्ही वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, तुम्ही फ्लाइट, रेस्टॉरंटमधील आरक्षणे किंवा हॉटेल बुकिंग यांसारख्या आगामी इव्हेंटसंबंधित तपशीलांसाठी सेव्ह केलेला टॅब तपासू शकता.
  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. खाली स्क्रोल करा आणि आरक्षणे वर टॅप करा.

Maps मधील वैयक्तिक आशयाविषयी अधिक जाणून घ्या.

फॉलो करत आहे

तुम्ही फॉलो करत असलेली सर्व ठिकाणे तुम्ही पाहू आणि व्यवस्थापित करू शकता.
  1.  Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. खाली स्क्रोल करा आणि फॉलो करत आहे वर टॅप करा.

व्यवसाय आणि ठिकाणांचे अपडेट मिळवण्यासाठी कसे फॉलो करावे ते जाणून घ्या.

Maps

तुम्ही My Maps मध्ये सेव्ह किंवा तयार केलेली नकाशांची सूची शोधा.
  1. Google Maps Maps उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेली वर टॅप करा.
  3. तुमच्या सूचीखाली, Maps वर टॅप करा.

नकाशा कसा तयार करावा किंवा उघडावा ते जाणून घ्या.

संबंधित लेख

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3523527499766315158
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false