व्हीलचेअरसाठी सोयीची असलेली ठिकाणे शोधणे

Google Maps वर व्हीलचेअरसाठी सोयीच्या असलेल्या ठिकाणांकरिता शोध परिणाम फिल्टर करण्यासाठी, तुम्हाला तुमची अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करावी लागतील. Google Maps वरील व्हिलचेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी विशेषता ही व्हीलचेअरवरील लोकांना व्यवसायाचे प्रवेशद्वार, प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, पार्किंग आणि लिफ्ट या सुविधा अ‍ॅक्सेस करता येतील का ते दाखवते.

अ‍ॅक्सेसिबल ठिकाणे शोधणे

महत्त्वाचे: व्हीलचेअरसाठी सोयीची असलेली ठिकाणे तुम्ही Google Maps वर फक्त ठरावीक देशांमध्ये शोधू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. अ‍ॅक्सेसिबल ठिकाणे सुरू करा.

व्हीलचेअरसाठी सोयीची असलेली ठिकाणे परिणामांमध्ये व्हीलचेअर आयकन Wheelchair accessible दाखवतात. तुम्ही ठिकाण निवडल्यानंतर, तुम्हाला स्थानाच्या अ‍ॅक्सेसिबिलिटी विशेषतांचा सारांश सापडेल.

व्यवसायाच्या अ‍ॅक्सेसिबिलिटी विशेषता संपादित करणे

एखाद्या स्थानामध्ये ते व्हिलचेअरसाठी सोयीचे असल्याची चुकीची विशेषता असल्यास, तुम्ही योग्य विशेषता सुचवू शकता:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या व्यवसायाची प्रोफाइल शोधा.
  3. याबद्दल आणि त्यानंतर या ठिकाणाचे वर्णन करा  वर टॅप करा.
  4. विशेषता बदलण्यासाठी, तिच्यावर टॅप करा.
  5. तुम्ही तुमची संपादने पूर्ण केल्यावर, पाठवा Send वर टॅप करा.

व्हीलचेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी समजून घेणे

तुम्ही व्यवसायाची अ‍ॅक्सेसिबिलिटी विशेषता संपादित करू शकता. त्याबद्दल खाली अधिक जाणून घ्या:

व्हीलचेअरसाठी सोयीचे प्रवेशद्वार

व्यवसायाचे प्रवेशद्वार अंदाजे तीन फूट रुंद असल्यास आणि त्याला पायर्‍या नसल्यास, ही विशेषता जोडा. दोन लोकांना एकमेकांशेजारी सहजपणे उभे राहता येण्यासाठी सुमारे तीन फूट (एक मीटर) रुंदी लागते. एक किंवा अधिक पायर्‍या असल्यास, कायमची रँप किंवा निदान हलवता येणारी रँप असली पाहिजे. या विशेषतेसाठी फक्त फिरते दरवाजे असलेली प्रवेशद्वारे “नाही” अशी मार्क केली गेली पाहिजेत.

व्हीलचेअरसाठी सोयीचे प्रसाधनगृह

प्रसाधनगृहाचे प्रवेशद्वार किमान एक मीटर रुंद असल्यास आणि तेथे कोणत्याही पायर्‍यांशिवाय चढता किंवा उतरता येत असल्यास, ही विशेषता जोडा. व्हीलचेअरवरील व्यक्तीला प्रसाधनगृहामधील स्टॉलमध्ये प्रवेश करायचा असल्यास, स्टॉलचे प्रवेशद्वारदेखील एक मीटर रुंद असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, दोन लोकांना एकमेकांशेजारी सहजपणे उभे राहता येण्यासाठी सुमारे एक मीटर रुंदी लागते.

व्हीलचेअरसाठी सोयीची आसनव्यवस्था

व्यवसायाच्या मुख्य भागामध्ये पायर्‍यांशिवाय प्रवेश करता येत असल्यास, ही विशेषता जोडा. व्हीलचेअरवरील एखाद्या व्यक्तीला टेबलपर्यंत जाता येण्यासाठी आणि टेबलजवळ बसता येण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे. सर्व टेबल उंच (उदाहरणार्थ, उभे राहण्याच्या उंचीवरील) असल्यास , व्यवसाय व्हीलचेअरसाठी अनुकूल नाही.

व्हीलचेअरसाठी सोयीचे पार्किंग

अपंगत्वामुळे मर्यादा असलेल्या व्यक्तींसाठी विशेषतः मार्क केलेल्या पार्किंगच्या जागा असल्यास, ही विशेषता जोडा. तुमचा देश आणि प्रदेश यांनुसार, या जागा बरेचदा जमिनीवरील खास रंगकाम, फलक किंवा चिन्हांनी मार्क केलेल्या असतात.

व्हीलचेअरसाठी सोयीची लिफ्ट

एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक मजले असल्यास आणि तेथे व्हीलचेअर मावेल इतकी पुरेशी जागा असलेली लिफ्ट असल्यास, ही विशेषता जोडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11032851827011779388
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false