तुमच्या कारमध्ये बिल्ट इन असलेल्या Google Maps मध्ये असलेली सुरक्षिततेसंबंधित ड्रायव्हर साहाय्य वैशिष्ट्ये

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

तुमच्या कारमध्ये Google Maps च्या बाहेर सुरक्षिततेशी संबंधित ड्रायव्हर साहाय्य असू शकते. स्टिअरिंग व्हीलवरील किंवा इंफोटेनमेंट सिस्टममधील वाहन नियंत्रणे वापरून ती सुरू किंवा बंद केली जाऊ शकतात. ठरावीक वैशिष्ट्ये बाह्य कॅमेरा, ड्रायव्हिंग वैशिष्ट्ये आणि इतर अनेक गोष्टींसारख्या वाहन तंत्रज्ञानासोबतच्या इंटिग्रेशनवर अवलंबून असू शकतात. तुमच्या कारमध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतात हे निर्धारित करण्यासाठी, ड्रायव्हर मॅन्युअल वाचा किंवा तुमच्या कारमधील मध्यभागी असलेली स्क्रीन एक्सप्लोर करा.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही. इतर प्लॅटफॉर्मवर Assistant कसे वापरायचे ते जाणून घ्या.

सध्याच्या कायदेशीर वेगमर्यादेबाबत माहिती

तुमचा बाह्य कॅमेरा आणि Maps ने पुरवलेली वेगमर्यादेसंबंधी माहिती यांच्या आधारावर, तुमच्या कारमध्ये सध्याची कायदेशीर वेगमर्यादा दाखवण्याची क्षमता असू शकते. ज्या भागांमध्ये वेगमर्यादा फलक/चिन्हे दृश्यमान नाहीत तेथे, तुमच्या वाहनामध्ये दाखवलेली वेगमर्यादा सुचवण्यासाठी Maps मधील माहिती वापरली जाऊ शकते.
हवामान, वेळ, ऋतू किंवा इतर परिस्थितींनुसार कायदेशीर वेगमर्यादा वेगवेगळी असू शकते. सशर्त वेगमर्यादा लागू होते का हे निर्धारित करण्यासाठी, सध्याची हवामानाची परिस्थिती यासारखी Maps मधील माहिती वापरली जाऊ शकते.

पुढे येणार्‍या कायदेशीर वेगमर्यादेसंबंधी माहिती

तुमची कार कुठे प्रवास करण्याची शक्यता आहे त्याच्या आधारावर, पुढे येणारी कायदेशीर वेगमर्यादा डिस्प्ले करण्याची क्षमता तुमच्या कारमध्ये असू शकते. तुम्ही Google Maps मध्ये गंतव्यस्थान सेट केले असल्यास, ती माहिती वापरली जाईल. तुम्ही गंतव्यस्थान सेट केले नसल्यास, पुढे येणार्‍या भागाच्या वेगमर्यादेचे अनुमान करण्यासाठी, Google Maps वाहन सिस्टमला संभाव्य मार्ग सुचवू शकते.

अडॅप्टिव्ह क्रूझ नियंत्रण

पुढे असलेल्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी, तुमच्या कारमध्ये आपोआप अ‍ॅक्सिलरेट करण्याची आणि ब्रेक लावण्याची क्षमता असू शकते. पुढे कार नसल्यास, ड्रायव्हरला वाहनाचा वेग अ‍ॅडजस्ट करता येतो किंवा त्यावर कारचा अपेक्षित वेग आणि कायदेशीर वेगमर्यादा परिणाम करतात. वैशिष्ट्याच्या एकंदर गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी Google Maps अडॅप्टिव्ह क्रूझ नियंत्रण सिस्टमला माहिती पुरवू शकते.

ऑफलाइन नकाशे आणि वाहन नकाशा सेवा (VMS)

वाहन नकाशा सेवा (VMS) वापरून, Google Maps तुमच्या कारला डेटा पुरवते. तुमच्या कारमधील वेगमर्यादेसंबंधी माहिती किंवा अडॅप्टिव्ह क्रूझ नियंत्रण यांसारख्या सुरक्षिततेशी संबंधित ड्रायव्हर साहाय्य वैशिष्ट्यांना सपोर्ट करण्यासाठी डेटा वापरला जातो. विशेषतः इंटरनेट कनेक्शन नसलेल्या किंवा खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्ये, ही वैशिष्ट्ये ऑफलाइन नकाशा डेटावर अवलंबून असतात.
ऑफलाइन नकाशा डेटा नेहमी उपलब्ध असेल याची खात्री करण्यासाठी, गोपनीयता केंद्रामध्ये “ऑटो-डाउनलोड” सुरू करा. तुम्ही ऑफलाइन नकाशे ऑटो-डाउनलोड करणे निवडल्यास, तुमची कार तुमच्या वाहनाचे स्थान आणि यापूर्वी डाउनलोड केलेले ऑफलाइन नकाशे यांसारखी माहिती Google सर्व्हरसोबत शेअर करू शकते.
तुम्ही ऑफलाइन नकाशे मॅन्युअली डाउनलोड करणे निवडल्यास आणि तुम्ही ज्या भागामध्ये ड्रायव्हिंग करत आहात त्या भागाचा ऑफलाइन नकाशा डाउनलोड न केल्यास, यांपैकी काही सुरक्षिततेशी संबंधित ड्रायव्हर साहाय्य वैशिष्ट्ये कदाचित काम करणार नाहीत.
टीप: यापूर्वी डाउनलोड केलेले कोणतेही नकाशे तरीही उपलब्ध असतील, परंतु ते आपोआप अपडेट केले जाणार नाहीत. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4965013533208359567
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false