तुमच्या कारमध्ये बिल्ट इन असलेल्या Google Maps मधील डेटा शेअरिंग सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

तुमचा वाहन डेटा शेअर करा, ऑफलाइन नकाशे कसे डाउनलोड केले जातात ते निवडा आणि गोपनीयता केंद्रामध्ये Google सोबत Maps कोणता डेटा शेअर करते ते समजून घ्या.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही. इतर प्लॅटफॉर्मवर Assistant कसे वापरायचे ते जाणून घ्या.

गोपनीयता केंद्र शोधा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings वर टॅप करा
  3. गोपनीयता केंद्र वर टॅप करा.

Google सोबत वाहनाचा डेटा शेअर करणे

प्रवास आणि सेन्सर डेटा शेअर करा

तुम्ही ड्राइव्ह करत असताना, Google यासारखा डेटा गोळा करते:

  • GPS स्थान
  • तुम्ही निवडलेल्या मार्गासह नेव्हिगेशनशी संबंधित तपशील
  • रस्त्यासंबंधित चिन्हाची माहिती किंवा लेन मार्किंग यांसारखी रस्त्याची वर्णने
  • तुमची विंडशिल्ड वायपर कधी सुरू होतात यासारखे वाहन सेन्सर स्टेटस
  • तुमच्‍या सर्व डिव्‍हाइसमधील सेन्सर डेटा, जसे की तुमच्‍या फोनवरील बॅरोमीटर रीडिंग आणि तुमचा फोन कंपॅटिबल वाहनाशी जोडलेला असल्‍यास, चाकाचा वेग

Maps ला आणखी चांगले बनवण्यासाठी, Google तुमचा डेटा स्वतंत्रपणे किंवा इतरांसह एकत्रित वापरते. तुम्ही हा डेटा शेअर केल्यास, Google त्याचा वापर नकाशा अपडेट करण्यासाठी आणि इतरांना दृश्यमान असलेल्या रीअल-टाइम रहदारीच्या स्थितीच्या समावेशासह माहिती तयार करण्याकरिता करते.

Google प्रवास आणि सेन्सर डेटाचे संरक्षण कसे करते

  • प्रवास आणि सेन्सर डेटा यांवर आधारित नकाशाची अपडेट तुमच्या Google खाते किंवा वाहनाशी संलग्न नाहीत.
  • प्रवास आणि सेन्सर डेटा तुमच्या Google खाते शी संलग्न नाही, पण सुरक्षितपणे जनरेट होणाऱ्या आयडेंटिफायरसोबत तो नियमित रीसेट केला जातो. याचा अर्थ असा, की तुमच्या Google खाते च्या आधारावर Google हा डेटा पाहू शकत नाही.
  • तुम्ही जग एक्सप्लोर करता, तेव्हा संग्रहित केलेला इतर डेटा, जसे की तुम्ही Google Assistant वापरता तेव्हा ते कदाचित तुमच्या Google खाते शी संलग्न असू शकते. तुम्ही myactivity.google.com ला भेट देऊन वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी नियंत्रित करू शकता.
  • कारमधील Google Maps साठी स्थानासंबंधित परवानगी बदलण्यासाठी, सेटिंग्ज आणि त्यानंतर अ‍ॅप्स आणि सूचना आणि त्यानंतर अ‍ॅप परवानग्या आणि त्यानंतर स्थान आणि त्यानंतर Maps वर जा.
  • Google फक्त सर्वांना सर्वोत्तम Maps अनुभव देण्यासाठी प्रवास आणि सेन्सर डेटा संग्रहित करते—प्रक्रिया झाल्यावर तो हटवला जातो.
EV डेटा शेअर करणे
तुमचे इलेक्ट्रिक वाहन Google सोबत डेटा शेअर करू शकते, जसे की:
  • वेगवेगळ्या परिस्थितींमधील बॅटरीची पातळी, क्षमता आणि चार्जिंगचा वेग 
  • एअर कंडिशनिंगची स्थिती 
  • इंजीन आणि ब्रेकिंगची कार्यक्षमता 
  • तुमच्या वाहनाच्या वजनासारखे तपशील

तुम्ही हा डेटा शेअर केल्यास, तो Google सर्व्हरवर सेव्ह केला जाईल. डेटाचा वापर तुम्हाला पुढील गोष्टी देण्यासाठी केला जातो:

  • कारची रेंज 
  • तुमच्या गंतव्यस्थानाच्या आधारावर बॅटरीचा अंदाज 
  • चार्जिंगच्या शिफारस केलेल्या किमान वेळा
  • तुमचा पुढील थांबा बॅटरीच्या क्षमतेबाहेर आहे किंवा तुम्ही तुमच्या पुढील थांब्यावर पोहोचला असताना बॅटरी कमी आहे यांसारख्या सूचना
  • सुधारणा केलेले बॅटरी व्यवस्थापन आणि वाहन कार्यक्षमता
तुमचे ऑफलाइन नकाशांचे पर्याय निवडा
ऑफलाइन नकाशे तुमच्या वाहनाच्या सुरक्षिततेशी संबंधित ड्रायव्हर साहाय्यक वैशिष्ट्ये यांना सपोर्ट करतात आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय Maps वापरणे यामध्ये तुम्हाला मदत करतात.
तुम्ही ऑफलाइन नकाशे ऑटो-डाउनलोड करणे निवडल्यास:
  • Maps तुमच्यासाठी ऑफलाइन नकाशे ऑटो-डाउनलोड करेल आणि ते अप टू डेट ठेवेल
  • तुमच्या वाहनाचे स्थान, स्थान इतिहास आणि तुम्ही आधीच डाउनलोड केलेले ऑफलाइन नकाशे यांसारखी माहिती पुरवण्यासाठी, तुमचे वाहन अधूनमधून Google सर्व्हरशी संपर्क साधू शकेल
  • तुम्ही तरीही डाउनलोड करण्यासाठी तुमचे स्वतःचे नकाशे निवडू शकता 
  • हे बंद केल्याने आधीच डाउनलोड केले गेलेले ऑफलाइन नकाशे हटवले जाणार नाहीत
  • ऑफलाइन नकाशे हटवण्यासाठी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर जा

तुम्ही ऑफलाइन नकाशे मॅन्‍युअली डाउनलोड करणे निवडल्यास:

  • तुम्ही तुम्हाला डाउनलोड करायचे असलेले ऑफलाइन नकाशे निवडता आणि ते स्वतः मॅन्युअली अपडेट करता. सुरुवात करण्यासाठी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर जा
  • तुम्ही ज्या भागात ड्रायव्हिंग करत आहात त्या भागाचा ऑफलाइन नकाशा तुम्ही डाउनलोड किंवा अपडेट न केल्यास, तुमच्या वाहनाची काही सुरक्षितता वैशिष्ट्ये कदाचित काम करणार नाहीत 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16762388992020271301
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false