नेव्हिगेट करण्यासाठी, तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेले Google Assistant वापरणे

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

तुम्ही ड्राइव्ह करत असताना Google Assistant वापरून माहिती शोधू शकता आणि कामे करून घेऊ शकता. Google Maps मध्ये त्याला प्रश्न विचारा आणि कामे करण्यास सांगा, जेणेकरून, तुम्हाला रस्त्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही.

Google Assistant शी बोला

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करा, किंवा म्हणा, "Ok Google, घराकडे नेव्‍हिगेट करा".
  3. नेव्हिगेशन मोडमध्ये, “Ok Google” म्हणा किंवा मायक्रोफोन Voice search वर टॅप करा.
  4. Google Assistant ला एखाद्या गोष्टीमध्ये मदत करण्यास सांगा.

टीप: तुमच्या स्टिअरिंग व्हीलवरील बटणे वापरून किंवा तुमच्या कारमध्ये Assistant कसे सुरू करायचे ते जाणून घेण्यासाठी, तुमच्या कारचे वापरकर्ता मॅन्युअल पहा.

तुम्ही Google Assistant ला काय विचारू शकता

प्रवास आणि जवळपासची ठिकाणे

  • "हा कोणता रस्ता आहे?"
  • “[name of place] कधी बंद होते?”
  • "मार्ग अवलोकन दाखवा" किंवा "पर्यायी मार्ग दाखवा"
  • "जवळपासची रेस्टॉरंट"

दिशानिर्देश आणि नेव्हिगेशन

  • "माझे पुढील वळण कोणते आहे?" किंवा “पुढील पायरी”
  • “मला तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल?”
  • "पुढे रहदारी कशी आहे?" किंवा "घराकडे जाताना रहदारी कशी आहे?"
  • "रहदारी दाखवा" किंवा "रहदारी लपवा"
  • "उपग्रह दृश्य दाखवा" किंवा "उपग्रह दृश्य लपवा"
  • "टोल टाळा" किंवा "टोलना अनुमती द्या"
  • "तोंडी मार्गदर्शन म्यूट करा" किंवा "तोंडी मार्गदर्शन अनम्यूट करा"
  • "पुन्हा मध्यभागी आणा"
  • “दिशानिर्देशांची सूची दाखवा”
  • "महामार्ग टाळा" किंवा "महामार्गांना अनुमती द्या"
  • “माझे गंतव्यस्थान काय आहे?” किंवा “माझे गंतव्यस्थान किती दूर आहे?”
  • "नेव्हिगेशनमधून बाहेर पडा"
  • “मी कुठे आहे?”
  • “आपण आता तेथे आलो आहोत का?”
  • “मदत”

तुम्ही Google Assistant ला माहिती आणि दररोजच्या कामांमध्ये मदतीसाठीदेखील विचारू शकता. तुम्ही आणखी काय विचारू शकता ते जाणून घ्या.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13472691640897406661
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false