तुमच्या इलेक्ट्रिक वाहनामध्ये बिल्ट इन असलेली Google Maps वैशिष्ट्ये वापरणे

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

Google Maps वर तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी उपयुक्त माहिती मिळू शकते. आगमनाच्या वेळी तुम्ही तुमच्या कारच्या बॅटरीची पातळी पाहू शकता, बॅटरीसंबंधी महत्त्वाच्या सूचना मिळवू शकता आणि कंपॅटिबल चार्जिंग स्टेशन शोधू शकता.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही.

आगमनाच्या वेळी बॅटरी

तुम्ही Maps वर ठिकाण शोधता तेव्हा, आगमनाच्या वेळी तुमच्या कारच्या बॅटरीची क्षमता अंदाजे किती असेल Battery on arrival हे तुम्हाला दिसेल. नेव्हिगेशन सुरू झाले की, आगमनाच्या वेळी तुमच्या बॅटरीची क्षमता किती असेल हे तुम्ही ड्राइव्ह करत असताना सतत अपडेट होत राहील.

चार्जिंगशी संबंधित मदत

तुम्ही एखाद्या गंतव्यस्थानावर नेव्हिगेट करता तेव्हा:

  • तुम्हाला चार्जिंगशिवाय तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचता येणार नसल्यास आणि तुम्हाला फक्त एका चार्जिंग थांब्याची आवश्यकता असल्यास, तुम्हाला तुमच्या मार्गावरील चार्जिंग स्टेशन निवडण्यासाठी सूचित केले जाईल. 
  • तुम्हाला चार्जिंगशिवाय तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचता येणार नसल्यास आणि त्यासाठी एकाहून अधिक चार्जिंग थांब्यांची आवश्यकता असल्यास, ती सर्व आपोआप तुमच्या मार्गावर जोडली जातील. प्रवासाच्या कालावधीमध्ये चार्जिंगच्या वेळेचा समावेश केला जाईल.

तुमच्या मार्गावर चार्जिंग स्टेशन जोडण्यासाठी:

  1. चार्जिंग थांबा जोडा वर क्लिक करा.
  2. चार्जिंग स्टेशन निवडा.

चार्जिंग स्टेशनची माहिती पुरवली नसल्याची किंवा ती चुकीची असल्याची तक्रार करण्यासाठी, तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून आम्हाला फीडबॅक पाठवा.

चार्जिंग स्टेशन शोधा

तुम्ही तुमच्या कारसह कंपॅटिबिल प्लग Maps वर शोधू शकता आणि तुमच्या परिणामांमध्ये काय दिसते ते निवडू शकता:

  • चार्जरचे प्रकार
  • पेमेंट नेटवर्क
  • चार्जिंग गती

तुमच्या मार्गावर नेव्हिगेशन सुरू करण्यापूर्वी किंवा मार्गामध्ये नेव्हिगेशनदरम्यान चार्जिंग स्टेशन कसे जोडायचे ते जाणून घ्या.

तुम्ही मार्गामध्ये चार्जिंग स्टेशन जोडल्यास, तुम्हाला शिफारस केलेली किमान चार्जिंग वेळ दिसेल. आगमनाच्या वेळी कारच्या बॅटरीनुसार, चार्जिंग कार्यक्षमतेनुसार आणि स्टेशनच्या चार्जिंगच्या वेगानुसार चार्जिंग वेळा बदलतात.

टीप: अधिक माहितीसाठी चार्जिंग स्टेशनवर टॅप करा, जसे की पॉवर आउटपुट.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18372072127639754584
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false