तुमच्या Apple Watch वर Google Maps वापरणे

तुमच्या फोन आणि वॉचदरम्यान अखंडपणे नेव्हिगेशन मिळवण्यासाठी, तुमच्या Apple Watch वर Google Maps इंस्टॉल करा.

तुमच्या वॉचवर, तुम्ही अस्तित्वात असलेल्या शॉर्टकटवर नेव्हिगेट करणे, स्टेप-बाय-स्टेप दिशानिर्देश मिळवणे आणि तुमच्या प्रवासासंबंधित सध्याची पोहोचण्याची वेळ मिळवणे यांसारख्या गोष्टीदेखील करू शकता.

तुमच्या वॉचवर Google Maps वापरण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसमध्ये पुढील गोष्टी असल्याची खात्री करा:

  • WatchOS 5 किंवा त्यावरील आवृत्ती
  • iOS 10 किंवा त्यावरील आवृत्ती
  • ब्लूटूथ सुरू केलेले असणे

तुमच्या Apple Watch वर Google Maps सेट करा

स्थान सेवा सुरू करा

महत्त्वाचे: तुमच्या वॉचवर Google Maps वापरण्यासाठी, स्थान सेवा सुरू करा.

  1. iPhone वर, सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि त्यानंतर स्थान सेवा आणि त्यानंतर Google Maps वर टॅप करा.
  2. फक्त अ‍ॅप वापरत असताना किंवा नेहमी अनुमती द्या वर टॅप करा.

घर, ऑफिस आणि इतर शॉर्टकट जोडा किंवा संपादित करा

  1. तुमच्या Apple Watch वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. घरऑफिस किंवा शॉर्टकट संपादित करा वर टॅप करा.
  3. iPhone वर, तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता सेट करणे अथवा शॉर्टकट जोडणे हे करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुमचे Apple Watch वापरून नेव्हिगेट करा

एखाद्या अस्तित्वात असलेल्या शॉर्टकटवर नेव्हिगेट करा

  1. तुमच्या Apple Watch वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. शॉर्टकटवर टॅप करा. तुम्हाला तुमच्या वॉचवर स्टेप-बाय-स्टेप दिशानिर्देश मिळतील.

तुम्ही तुमच्या Apple Watch वर नेव्हिगेशन सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनवरदेखील मार्ग उघडू शकता. 

  1. तुमच्या iPhone वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा. 
  2. सुरू करा Start वर टॅप करा.

नवीन गंतव्यस्थानावर नेव्हिगेट करा

नवीन गंतव्यस्थानांसाठी, तुम्ही तुमच्या फोनवर नेव्हिगेशन सुरू करता तेव्हा तुमच्या Apple Watch वर स्टेप-बाय-स्टेप दिशानिर्देश मिळवू शकता

  1. तुमच्या iPhone वर, तुमचे नेव्हिगेशन सुरू करा.
  2. तुमच्या Apple Watch वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  3. “सध्याचा प्रवास” अंतर्गत पोहोचण्याच्या वेळेवर टॅप करा.

तुमच्या घड्याळावर प्रवासाचा मोड सेट करा

  1. तुमच्या Apple Watch वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. खाली स्क्रोल करा आणि प्रवास मोड सेट करा वर टॅप करा.
  3. तुमचा प्रवासाचा मोड निवडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1322501794330611421
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false