तुमच्या कारमध्ये बिल्ट इन केलेल्या Google Maps वर शोधणे

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

तुम्ही Maps मध्ये विविध मार्गांनी गंतव्यस्थाने शोधू शकता. Maps हे तुम्हाला तुमची प्राधान्ये आणि परिस्थितीनुसार तुमची पद्धत निवडू देते.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही. इतर प्लॅटफॉर्मवर Assistant कसे वापरायचे ते जाणून घ्या.

आवाज वापरून शोधा

तुम्ही व्हॉइस कमांड वापरून Maps वर शोधू शकता.

गंतव्यस्थान शोधा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधण्यासाठी:
    • Google Maps शोध बार आणि त्यानंतर सर्व गंतव्यस्थाने शोधा Search वर टॅप करा. त्यानंतर गंतव्यस्थान एंटर करण्यासाठी ऑन-स्क्रीन कीबोर्ड वापरा.
    • स्‍पीच टू टेक्‍स्‍ट Voice search वर टॅप करा आणि तुमचे गंतव्यस्थान बोला.
  3. नेव्हिगेशन सुरू करा किंवा थांबवा:
    • सुरू करा Start वर टॅप करा.
    • बंद करा बंद करा वर टॅप करा.

टीप: नकाशावर इतर मार्ग राखाडी रेषांमध्ये दाखवले जातील. तुमचा मार्ग बदलण्यासाठी राखाडी रेषांवर टॅप करा.

शोध पर्यायातून गंतव्यस्थान निवडा

अलीकडील ठिकाणे

तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणांवर तुमच्या कारमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी:
  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमची अलीकडील ठिकाणे शोधण्यासाठी, शोध बारवर टॅप करा.
  3. तुमच्या गंतव्यस्थानावर टॅप करा.

वर्गवाऱ्यांनुसार जवळपासची ठिकाणे शोधा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. Google Maps शोध बारवर टॅप करा.
  3. वर्गवाऱ्या Categories वर टॅप करा. त्यानंतर वर्गवारी निवडा.
  4. तुम्हाला जायच्या असलेल्या स्थानावर आणि त्यानंतर सुरू करा Start वर टॅप करा.

टीप: तुम्हाला जवळपासची ठिकाणे आणि तेथे पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ दिसेल.

वैयक्तिक ठिकाणे

तुमच्या कारमध्ये तुमची सेव्ह केलेली ठिकाणे शोधण्यासाठी:
  1. तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन करा.
    1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
    2. सर्वात वरती उजवीकडे, खात्याचे वर्तुळाकार चिन्ह खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Google वर साइन इन करा वर टॅप करा.
    3. तुमची साइन इन करण्याची पद्धत निवडा त्यानंतर ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.
  2. तुमच्या सध्याच्या सेव्ह केलेल्या ठिकाणांवर जा:
    1. शोध बार आणि त्यानंतर वैयक्तिक Personal वर टॅप करा.
    2. वर्गवारीवर टॅप करा त्यानंतर तुमचे गंतव्यस्थान निवडा.

तुमच्या फोनवर नवीन ठिकाणे कशी सेव्ह करायची ते जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14724763576475245563
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false