तुमच्या कारमध्ये बिल्ट इन केलेल्या Google Maps मध्ये नेव्हिगेशन वापरणे

महत्त्वाचे: हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते.

सोप्या आणि विश्वसनीय नेव्हिगेशनसाठी, तुमच्या कारमध्ये Google Maps अ‍ॅप वापरा. तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी Maps तुम्हाला रीअल-टाइम रहदारी माहितीसह मार्गदर्शन करेल.

व्हॉइस नेव्हिगेशन हे तुम्हाला रहदारीसंबंधित माहिती, टर्न-बाय-टर्न सूचना, कोणती लेन्स वापरायची आणि एखादा उत्तम मार्ग उपलब्ध असल्यास, त्याबद्दलच्या अपडेट यांसारख्या सूचना देते.

टीप: हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही.

नेव्हिगेशन सुरू करा किंवा थांबवा

तुम्ही व्हॉइस कमांड किंवा कारची मध्यभागी असलेली स्क्रीन वापरून Maps वर शोधू शकता:

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुम्हाला सुचवलेली कमाल दोन गंतव्यस्थाने दिसतील. नेव्हिगेट करण्यासाठी त्यांच्यावर टॅप करा किंवा तुमचे गंतव्यस्थान शोधा.
  3. नेव्हिगेशन सुरू करा किंवा थांबवा:
    • नकाशावर इतर मार्ग राखाडी रेषांमध्ये दाखवले जातील. तुमचा निवडलेला मार्ग बदलण्यासाठी राखाडी रेषांवर टॅप करा.
    • नेव्हिगेशन सुरू करण्यासाठी, सुरू करा Start वर टॅप करा.
    • नेव्हिगेशन थांबवण्यासाठी, बंद करा बंद करा वर टॅप करा.

टीप: काही कारमध्ये स्टिअरिंग व्हीलवर एक अ‍ॅक्टिव्हिटी टॉगल बटण असते जे तुमच्या ड्रायव्हर डॅशबोर्डवर Maps दाखवू शकते.

तुमचा मार्ग कस्टमाइझ करा

मार्गावर थांबा जोडा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, एक्सप्लोर करा Explore आणि त्यानंतर थांबा जोडा Add stop वर टॅप करा.
  4. यांपैकी एक पर्याय वापरून तुमचा थांबा शोधा:
    • एक वर्गवारी निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये जोडायच्या असलेल्या स्थानावर टॅप करा.
    • आवाज वापरून शोधा Voice search वर टॅप करा. तुमचा थांबा शोधण्यासाठी आवाज वापरा.
  5. ​थांबा जोडा Add stop आणि त्यानंतर कंफर्म करा Checkmark वर टॅप करा. निवडलेला थांबा हा तुमचा पुढील थांबा म्हणून जोडला जाईल.

मार्गावर असताना वर्गवारीनुसार शोधा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. तळाशी, शोधा Search वर टॅप करा.
  4. रेस्टॉरंट Restaurant किंवा किराणा दुकानGrocery store यांसारखी वर्गवारी निवडा. तुम्हाला जवळपासची ठिकाणे आणि तेथे पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ दिसेल.
  5. तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये जोडायच्या असलेल्या स्थानावर टॅप करा.
  6. थांबा जोडा Add stop आणि त्यानंतर निश्चित करा Checkmark वर टॅप करा.

टोल, महामार्ग किंवा फेरी टाळा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. मार्ग अवलोकन Route overview आणि त्यानंतर मार्ग पर्याय Route options वर टॅप करा.
  4. पर्याय आणि त्यानंतर मागे जा Back वर टॅप करा.

रहदारीचे स्तर सुरू किंवा बंद करा

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  3. रहदारी सुरू किंवा बंद करा.

नेव्हगेशनची आणखी वैशिष्ट्ये

म्यूट करा, अनम्यूट करा किंवा फक्त रहदारीसंबंधित सूचना ऐका

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर सेटिंग्ज म्यूट करा वर टॅप करा.
  3. खालीलपैकी एक निवडा:
    • म्यूट करा Mute: नेव्हिगेशन सुरू असताना तोंडी दिशानिर्देश म्यूट करते.
    • आवाज Sound: नेव्हिगेशन सुरू असताना तोंडी दिशानिर्देश अनम्यूट करते.
    • फक्त रहदारीसंबंधित सूचना Alerts: रहदारी, बांधकाम आणि क्रॅशसंबंधित सूचना ऐका.

घर किंवा ऑफिसवर नेव्हिगेट करा

तुमच्या लेबल केलेल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पत्त्यावर नेव्हिगेट करण्यासाठी:

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. शोध बार आणि त्यानंतर वैयक्तिक वर टॅप करा.
  3. घर किंवा ऑफिस वर टॅप करा.

तुम्ही तुमच्या घराचे आणि ऑफिसचे पत्ते थेट तुमच्या कारमधून लेबल करू शकता किंवा संपादित करू शकता:

  1. तुमच्या कारच्या होम स्क्रीनवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर घराचा किंवा ऑफिसचा पत्ता संपादित करा वर टॅप करा.
  3. घर किंवा ऑफिस आणि त्यानंतर चा पत्ता संपादित करा Edit वर टॅप करा.

कंपास वापरा किंवा नकाशा रीसेंटर करा

  • तुम्ही ज्या दिशेने प्रवास करत आहात ती आणि उत्तर दिशा दाखवण्याच्या दरम्यान नकाशा स्विच करण्यासाठी, कंपास Compass वर टॅप करा.
  • तुमच्या सध्याच्या स्थानावर नकाशा रीसेंटर करण्यासाठी, तुमचे स्थान Your location वर टॅप करा.

वेगमर्यादा शोधा

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य काही स्थानांसाठी उपलब्ध नाही.

काही भागांमध्ये नेव्हिगेशन वापरताना तुम्हाला वेगमर्यादेसंबंधित माहिती दिसू शकते.

Maps मध्ये दाखवलेल्या वेगमर्यादा फक्त माहितीपर वापरासाठी आहेत. रहदारीसंबंधित पोस्ट केलेली चिन्हे वापरून वेगमर्यादा कंफर्म केल्याची खात्री करा.

ऑफलाइन नेव्हिगेट करा

तुमच्याकडे खराब इंटरनेट कनेक्शन असल्यास, ऑफलाइन नकाशे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता वापरले जातील.

ऑफलाइन नकाशे कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या.

पोहोचल्यानंतर बॅटरीची पातळी पाहा आणि स्थान बॅटरीच्या क्षमतेच्या बाहेर असल्यास, सूचना पाहा

तुम्ही इलेक्ट्रिक वाहनामधून एखादे गंतव्यस्थान शोधता तेव्हा, Maps तुम्हाला त्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तुमच्या बॅटरीची अंदाजे पातळी Battery on arrival काय असेल ते दाखवेल. गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमची कार चार्ज करण्याची आवश्यकता असल्यास, तुमच्यासाठी कंपॅटिबल चार्जिंग स्टेशन कदाचित आपोआप जोडली जातील.

तुमच्या इलेक्ट्रिक वाहनामध्ये Google Maps वापरण्याबाबत अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7335760602680469527
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false