ऑफलाइन असताना तुमच्या कारमध्ये बिल्ट इन असलेले Google Maps वापरणे

तुमच्या कारमध्ये खराब इंटरनेट कनेक्शन असते, तेव्हा तुम्ही विश्वसनीय नेव्हिगेशन आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसाठी ऑफलाइन नकाशे वापरू शकता.

ऑफलाइन नकाशे हे तुमचे सध्याचे स्थान आणि प्रवासाच्या पॅटर्नच्या आधारे आपोआप डाउनलोड व अपडेट केले जाऊ शकतात.

महत्त्वाचे

  • हा लेख फक्त तुमच्या कारमध्ये बिल्ट केलेल्या Google Maps साठी आहे. वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमचा कार उत्पादक किंवा प्रदेश आणि डेटा प्लॅन यांवर अवलंबून असू शकते. तुमच्या कारमध्ये Google Maps वापरण्याबाबत अधिक जाणून घ्या.
  • हे वैशिष्ट्य सर्व भाषा आणि देश/प्रदेश यांमध्ये उपलब्ध नाही. तुम्ही तुमचे ऑफलाइन नकाशे यांनी व्यापलेल्या भागाच्या बाहेर असल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल.

Google Maps ला तुमचे ऑफलाइन नकाशे व्यवस्थापित करू द्या

Google Maps हे रस्त्यासंबंधित चिन्हाचे इंटिग्रेशन आणि अडॅप्टिव्ह क्रूझ नियंत्रण यांसारख्या कारमधील सुरक्षिततेशी संबंधित ड्रायव्हर साहाय्य वैशिष्ट्यांना सपोर्ट करण्यासाठी वाहन नकाशा सेवा (VMS) याद्वारे डेटा पुरवते. ही सुरक्षितता वैशिष्ट्ये ऑफलाइन नकाशा डेटावर अवलंबून असतात. नकाशा डेटा नेहमी उपलब्ध असेल याची खात्री करण्यासाठी, गोपनीयता केंद्र यामध्ये “ऑटो-डाउनलोड” सुरू करा.

गोपनीयता केंद्रामध्ये ऑटो-डाउनलोड सुरू करा

ऑटो-डाउनलोड सुरू करण्यासाठी:

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  3. गोपनीयता केंद्र आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  4. ऑफलाइन नकाशे ऑटो-डाउनलोड करणे निवडा.
  5. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा आणि तुमचा ऑफलाइन नकाशा पूर्ण डाउनलोड होईपर्यंत थांबा.
टीप: तुम्ही ऑटो-डाउनलोड बंद केल्यास, आधी डाउनलोड केलेले नकाशे तसेच सेव्ह केलेले राहतील, पण कोणतेही नवीन नकाशे आपोआप डाउनलोड होणार नाहीत.

ऑफलाइन नकाशे व्यवस्थापित करा

तुमच्या कारमध्ये, "ऑफलाइन नकाशे" अंतर्गत, तुमचे ऑफलाइन नकाशे दिसतील:

  1. तुम्ही याआधी ऑटो-डाउनलोड सुरू केले असल्यास, ऑटो-डाउनलोड केलेले नकाशे तुम्ही कारमधून केलेल्या प्रवासावर आधारित असतील.
  2. पर्यायी: तुम्ही साइन इन केलेले असल्यास, घर आणि ऑफिसचे नकाशे.
  3. पर्यायी: तुम्ही मॅन्युअली डाउनलोड केलेले नकाशे.

टीप: तुमचे घर आणि ऑफिसचे नकाशे तुमच्या घराच्या व ऑफिसच्या पत्त्यावर किंवा तुमचे Google खाते स्थान इतिहास यावर आधारित आहेत.

ऑफलाइन नकाशे डाउनलोड करा
तुम्ही फक्त डेटा प्लॅन वापरून ऑफलाइन नकाशे डाउनलोड करू शकता.

ऑफलाइन नकाशे डाउनलोड करण्यासाठी:

  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  3. तुमचा स्वतःचा नकाशा निवडा Select your own map वर टॅप करा.
  4. तुम्हाला डाउनलोड करायचे असलेले क्षेत्र व्यापण्यासाठी नकाशा हलवा.
  5. डाउनलोड करा Download वर टॅप करा
ऑफलाइन नकाशांचे नाव बदला
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  3. संपादित करण्यासाठी नकाशा निवडा, त्यानंतर नाव बदलाEdit वर टॅप करा.
ऑफलाइन नकाशे अपडेट करा
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  3. संपादित करण्यासाठी नकाशा निवडा, त्यानंतर अपडेट करा Update वर टॅप करा.
ऑफलाइन नकाशे हटवा
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर ऑफलाइन नकाशे वर टॅप करा.
  3. संपादित करण्यासाठी नकाशा निवडा, त्यानंतर हटवा Delete वर टॅप करा
टीप: तुम्ही ऑटो-डाउनलोड केलेला नकाशा ऑटो-डाउनलोड सुरू असताना हटवल्यास, तुमच्या सध्याच्या स्थानाच्या आजूबाजूला असलेला भाग हटवलेल्या नकाशाशी बदलण्यासाठी आपोआप डाउनलोड केला जाईल.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10676841716885941226
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false