तुमच्या मार्गावरील ठिकाणे शोधण्यासाठी CarPlay वापरणे

तुमच्या मार्गावरील थांबे शोधण्यासाठी आणि जोडण्यासाठी, Apple CarPlay वर Google Maps वापरा. तुम्ही इंधनाच्या किमती आणि आडमार्गाच्या वेळा यांसारखे तुमच्या थांब्यांचे तपशील शोधू शकता.

तुम्हाला काय आवश्यक आहे

CarPlay द्वारे नेव्हिगेट करा

  1. तुमच्या CarPlay वर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. सर्वात वरती असलेल्या बारमध्ये, गंतव्यस्थान जोडा वर टॅप करा. 
  3. गंतव्यस्थान निवडा. 
  4. जा वर टॅप करा.

नेव्हिगेशन दरम्यान ठिकाणे शोधा

  1. सर्वात वरील मेनू बार दाखवण्यासाठी, तुम्ही नेव्हिगेट करत असताना स्क्रीनवर कुठेही टॅप करा.
  2. थांबा जोडा वर टॅप करा.
  3. गंतव्यस्थान निवडा:
    • पेट्रोल पंप
    • रेस्टॉरंट Restaurant
    • किराणा स्टोअर Grocery store
    • कॉफी शॉप
    • शोधा Search:
      • विशिष्ट ठिकाण शोधा: McDonald’s.
      • या प्रकारचे ठिकाण शोधा: औषधाचे दुकान.
        टीप: तुमच्या स्थानाच्या आधारावर या वर्गवाऱ्या वेगवेगळ्या असू शकतात.
  4. शोध परिणाम पाहण्यासाठी, मागील  किंवा पुढील आणि त्यानंतर वर टॅप करा.
    टीप: फक्त एकाहून अधिक शोध परिणाम असल्यास, अ‍ॅरो दिसतील.
  5. थांबा जोडा वर टॅप करा.

ठिकाण काढून टाका

  • तुमच्या CarPlay वर: सर्वात वरती उजवीकडे, बाहेर पडा आणि त्यानंतर थांबा काढून टाका वर टॅप करा.
  • तुमच्या iPhone वर: तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या थांब्याच्या बाजूला X वर टॅप करा.
    टीप: तुम्हाला तुमच्या iPhone वर तुमच्या मार्गाची माहिती सापडत नसल्यास, तुमचे थांबे शोधण्यासाठी होम बटणावर टॅप करा.

व्हॉइस शोध वापरा

  1. सर्वात वरील मेनू बार दाखवण्यासाठी, तुम्ही नेव्हिगेट करत असताना स्क्रीनवर कुठेही टॅप करा.
  2. थांबा जोडा आणि त्यानंतर मायक्रोफोन Voice search वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17920344265298598772
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false