Google Sky Maps वापरणे

Google Sky Maps हा एक खगोलीय नकाशा आहे जो तुम्हाला तारे, नक्षत्र, आकाशगंगा, ग्रह किंवा पृथ्वीचा चंद्र यांसारख्या गोष्टी दाखवतो. Google Sky Maps वापरण्यासाठी, www.google.com/sky वर जा.

आकाश शोधणे

खगोलीय गोष्टी आणि स्थाने शोधण्यासाठी, शोध संज्ञा एंटर करा आणि शोधा वर क्लिक करा. खाली काही उदाहरणे दिली आहेत.

  • क्रॅब नेब्युला
  • मृग नक्षत्र
  • NGC 2437
  • 5:34:32.01, 32:00:45.96

आकाशात भ्रमण करणे

तुमचे आकाशाचे दृश्य बदलण्याचे दोन मार्ग आहेत.

पॅन

पॅन करण्यासाठी किंवा नकाशा हलवण्यासाठी, खालीलपैकी एक गोष्ट करा:

  • दृश्य कोणत्याही दिशेने ड्रॅग करा.
  • उत्तरेकडे हलवण्यासाठी, अप अ‍ॅरो दाबा.
  • दक्षिणेकडे हलवण्यासाठी, डाउन अ‍ॅरो दाबा.
  • पूर्वेकडे हलवण्यासाठी, राइट अ‍ॅरो दाबा.
  • पश्चिमेकडे हलवण्यासाठी, लेफ्ट अ‍ॅरो दाबा.

झूम इन किंवा झूम आउट करणे

आकाश झूम इन किंवा झूम आउट करण्याचे काही मार्ग आहेत:

  • + किंवा - की दाबा.
  • नकाशावरील ठिकाणावर कर्सर हलवा आणि माउसचे स्क्रोल बटण वापरा.
  • झूम स्लायडर वर किंवा खाली ड्रॅग करा.

टीप: एखादे ठिकाण केंद्रस्थानी आणण्यासाठी आणि झूम इन करण्यासाठी, ठिकाणावर डबल क्लिक करा.

टीप: सर्वात खाली, तुम्हाला तुमच्या कर्सरचे निर्देशांक दिसतील. तुम्ही कर्सर हलवाल तसे हे निर्देशांक अपडेट होतील.

वेगवेगळी दृश्ये पाहणे

Google Sky Maps मध्ये वेगवेगळी दृश्ये पाहण्यासाठी, सर्वात वरती जा आणि दृश्य निवडा. दृश्य पाहणे थांबवण्यासाठी, त्यावर पुन्हा क्लिक करा.

टीप: तुम्ही एका वेळी एकाहून अधिक दृश्य वापरू शकता. 

  • इंफ्रारेड: सद्य दृश्याची इंफ्रारेड इमेजरी पाहा. ओपेसिटी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, स्लायडर हलवा.
  • मायक्रोवेव्ह: सद्य दृश्याची मायक्रोवेव्ह इमेजरी पाहा. ओपेसिटी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, स्लायडर हलवा.
  • हिस्टोरिकल: आकाशाचा हिस्टोरिकल नकाशा पाहा. ओपेसिटी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, स्लायडर हलवा. झूम आउट करून तुम्हाला कदाचित अधिक चांगले दृश्य मिळू शकतो.

इमेजरीचे संग्रह पाहणे

हबल शोकेस यांसारखी पेजच्या तळाशी असलेल्या थंबनेलवर क्लिक करून तुम्ही इमेजरीचे मनोरंजक संग्रह पाहू शकता. ओपेसिटी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, स्लायडर हलवा (उपलब्ध असल्यास).

लिंक शेअर करा

तुम्ही तुमच्या सद्य दृश्यामध्ये लिंक शेअर करू शकता आणि ती वेबसाइटवर पोस्ट करू शकता किंवा इतरांना देऊ शकता. लिंक शेअर करण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. सर्वात डावीकडे, या पेजला लिंक करा वर क्लिक करा.
  2. अ‍ॅड्रेस बारमधील वेब अ‍ॅड्रेस कॉपी करा.
  3. एखाद्या ईमेल किंवा मेसेज फील्डमध्ये अ‍ॅड्रेस पेस्ट करा आणि तो कोणालातरी पाठवा.

एखादी इमेज प्रिंट करा

एखादी इमेज प्रिंट करण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे जा आणि प्रिंट करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही फक्त बेस इमेजरी प्रिंट करू शकता, इंफ्रारेड किंवा हिस्टोरिकल यांसारख्या दृश्यांवरून घेतलेल्या इमेजरी प्रिंट करू शकत नाही.

KML आशय पाहणे

तुम्ही नकाशा तयार केल्यानंतर, तुम्ही KML वर आधारित आशय पाहू शकता. KML वर आधारित आशय पाहाण्यासाठी, तुमच्या KML फाइलची URL सर्च बॉक्समध्ये एंटर करा आणि शोधा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही एका वेळी फक्त एक KML फाइल प्रदर्शित करू शकता. सध्या, Google Sky Maps मध्ये ठिकाणचिन्हे दिसत नाहीत.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18004886539528285491
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false