व्यवसायांना थेट मेसेज पाठवणे

व्यवसायांच्या Google Maps किंवा Google Search वरील व्यवसाय प्रोफाइल द्वारे तुम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता.

तुम्ही व्यवसायाला मेसेज पाठवल्यावर काय होते:

  • तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटो हे तुमच्या माझ्याविषयी या पेजवर जसे दिसतात तसेच व्यवसायाला दिसू शकतात.
  • व्यवसायाचे एकाहून अधिक मालक किंवा प्रतिनिधी असू शकतात जे तुमचे मेसेज पाहू शकतील, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कर्मचार्‍यांकडून प्रतिसाद मिळू शकतो.
  • तुम्ही ज्या व्यवसायांसोबत चॅट करता त्यांच्याशी काय शेअर करावे हे ठरवता. पुढील गोष्टींसह संवेदनशील माहिती शेअर करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा:
    • क्रेडिट कार्ड क्रमांक
    • बँकिंगसंबंधी माहिती
    • सोशल सिक्युरिटी, पासपोर्ट किंवा इतर सरकारी ओळखपत्रांचे क्रमांक
    • पासवर्ड आणि साइन-इनशी संबंधित इतर माहिती
    • आरोग्यविषयक माहिती
    • व्यवसायामधील एकाहून अधिक लोकांकडे नसावी असे तुम्हाला वाटणारी कोणतीही खाजगी किंवा वैयक्तिक माहिती

टीप: Business Profile वर "चॅट करा" बटण दिसण्यासाठी, व्यवसायाने मेसेजिंग सुरू केलेले असणे आवश्यक आहे.

व्यवसायांसोबतची तुमची संभाषणे व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. Explore Explore आणि त्यानंतर वर टॅप करा रेस्टॉरंट किंवा बार यांसारखी वर्गवारी निवडा. सेवा किंवा खरेदी यांसारख्या आणखी वर्गवार्‍या शोधण्यासाठी, आणखी More वर टॅप करा.
  3. व्यवसाय निवडा. त्याचे मेसेजिंग सुरू केलेले असल्यास, त्यांच्या व्यवसाय प्रोफाइल वर चॅट करा वर टॅप करा. सर्वच व्यवसाय मेसेज पाठवू आणि मिळवू शकत नाहीत.
    • Google Maps मधील शोध बार वापरून, मेसेज पाठवण्यासाठी इतर व्यवसाय शोधा.
  4. तुमचा मेसेज टाइप करा आणि पाठवा पाठवा वर टॅप करा. व्यवसायांनी दिलेले प्रतिसाद मेसेज थ्रेडमध्ये दिसतात.
  5. Google Maps मध्ये तुमचे मेसेज पाहण्यासाठी, अपडेट Updates आणि त्यानंतर मेसेज वर टॅप करा. नवीन मेसेजच्या आयकनवर लाल बिंदू असतो.
  6. व्यवसायाने पाठवलेले मेसेज ब्लॉक किंवा व्यवसायाची तक्रार करण्यासाठी, संभाषण उघडा आणि त्यानंतर आणखी आणखीआणि त्यानंतर ब्लॉक करा/स्पॅम म्हणून तक्रार करा वर टॅप करा.
    • तुम्ही संभाषण ब्लॉक करू शकता किंवा संभाषण ब्लॉक करून त्याची स्पॅम म्हणून तक्रार करू शकता.

मेसेज वाचल्याच्या पावत्या सुरू किंवा बंद करणे

तुम्ही वाचल्याच्या पावत्या सुरू केलेल्या असताना नवीन मेसेज उघडता तेव्हा, तुम्हाला ज्या व्यवसायाने मेसेज पाठवला आहे त्यांना त्या मेसेजच्या खाली "वाचला" असे स्टेटस दिसते. मेसेज पाठवणाऱ्याला "वाचला" हे स्टेटस दिसण्यासाठी, मेसेज मिळवणाऱ्याने वाचल्याची पावती सुरू केलेली असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, व्यवसायाने वाचल्याची पावती सुरू केलेली असल्यास आणि तुम्ही त्यांना मेसेज पाठवल्यास, त्यांनी तुमचा मेसेज कधी वाचला हे तुम्हाला कळू शकते. त्यांनी वाचल्याची पावती बंद केल्यास, तुमच्यासाठी "वाचला" हे स्टेटस दिसणार नाही.

तुमच्यासाठी वाचल्याची पावती आपोआप सुरू केली आहे. तुम्ही वाचल्याची पावती बंद केल्यास, तुम्ही त्यांचा मेसेज उघडता तेव्हा, यापुढे व्यवसायांना "वाचला" असे स्टेटस मिळणार नाही.

Google Maps मधील वाचल्याच्या पावत्या सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. “अपडेट” टॅबमधून, आणखी आणखी आणि त्यानंतर मेसेज व्यवस्थापित करा आणि त्यानंतर मेसेज वर टॅप करा.
  3. वाचल्याच्या पावत्या सुरू किंवा बंद करा.

व्यवसायांसोबतची तुमची संभाषणे हटवणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तळाशी अपडेट आणि त्यानंतर मेसेज वर टॅप करा.
  3. तुम्ही मेसेज पाठवलेल्या व्यवसायावर टॅप करा.
  4. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
  5. कंफर्म करण्यासाठी, हटवा वर टॅप करा.

टीप: तुम्ही संभाषण हटवल्यास, फक्त तुमच्या डिव्हाइसवरील संभाषणाची तुमची प्रत हटवली जाते. व्यवसायाला त्यांच्या डिव्हाइसवर संभाषण करणे सुरू ठेवणे आणि तुम्हाला प्रतिसाद देणे आवश्यक असू शकते.

व्यवसायांसोबतच्या तुमच्या संभाषणांचा बॅकअप घेणे

महत्त्वाचे: संभाषणे तुमच्या Google खाते वर सेव्ह केली जातात. 

  • तुमच्या खात्याशी लिंक केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर तुम्हाला तुमची संभाषणे सापडू शकतात. 
  • तुम्ही एका डिव्हाइसवरून संभाषण हटवल्यास, ते लिंक केलेल्या सर्व डिव्हाइसवरून कायमचे काढून टाकले जाते. तुम्ही ती यापुढे अ‍ॅक्सेस करू शकत नाही. लक्षात ठेवा की, यामुळे मिळवणार्‍याची प्रत हटवली जात नाही.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी ठेवण्याकरिता किंवा इतर Google उत्पादनांमध्ये वापरण्याकरिता तुम्ही संभाषणे एक्सपोर्ट आणि डाउनलोड करू शकता.

तुमची भाषा बदलणे

तुम्ही एखाद्या व्यवसायाला मेसेज पाठवता तेव्हा, आम्ही त्यांच्यासोबत तुमच्या डिव्हाइसची भाषा शेअर करतो जेणेकरून, शक्य असेल तेव्हा त्यांना तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेत तुम्हाला प्रतिसाद देता येईल. तुम्ही मेसेज पाठवेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत तुमची भाषा प्राधान्ये शेअर करत नाही.

तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये तुम्ही तुमची भाषा प्राधान्ये बदलू शकता. भाषेतील बदल लागू होण्यासाठी कमाल २४ तास लागू शकतात.

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोनची भाषा सेटिंग्ज बदलल्यास, तुमच्या फोनवरील सर्व अ‍ॅप्सची भाषा बदलली जाईल.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  2. सर्वसाधारण व्यवस्थापन आणि त्यानंतर भाषा आणि इनपुट आणि त्यानंतर भाषा वर टॅप करा.
  3. भाषा जोडा वर टॅप करा आणि तुम्हाला जोडायची असलेली भाषा निवडा.
  4. डीफॉल्ट म्हणून सेट करा वर टॅप करा. तुमच्या सूचीमधील सर्वात वरची भाषा तुमची डीफॉल्ट भाषा म्हणून वापरली जाते.

Business Messages बद्दल अधिक जाणून घ्या

थेट व्यवसायांशी मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठी, Search, Maps आणि तृतीय पक्ष वेबसाइटवरील चॅट बटणावर क्लिक करा. Business Messages हे मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठी तुमच्याकडून काही माहिती गोळा करते. यांपैकी काही कार्यक्षमता Google Play सेवा वापरतात.

तुम्ही Business Messages द्वारे एखाद्या व्यवसायाला मेसेज करता, तेव्हा:

  • तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटो त्या व्यवसायासोबत शेअर केला जातो.
  • तुम्ही तयार केलेले मेसेज आणि तुम्ही पाठवण्यासाठी निवडलेले फोटो या गोष्टी त्या व्यवसायाला पाठवल्या जातात, क्लाउड स्टोरेजवर सेव्ह केल्या जातात व तुमच्या सर्व डिव्हाइसवर सिंक केल्या जातात.
  • Google हे खाते व्यवस्थापनासाठी तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस गोळा करते, पण तुम्ही मेसेज पाठवलेल्या व्यवसायांसोबत आम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस शेअर करत नाही.
  • आम्ही तुमच्या डिव्हाइसची भाषा व्यवसायासोबत शेअर करतो, जेणेकरून त्यांना तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेमध्ये प्रतिसाद देता येईल.
  • आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी, Business Messages तुमची वापर माहिती, क्रॅश लॉग आणि निदान गोळा करते.

टीप: तुम्ही तुमचे Google खाते वापरून पाठवलेले मेसेज हे Google Cloud मध्ये स्टोअर आणि एन्क्रिप्ट केले जातात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3048250682286911061
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false