तुमच्या फीचर फोनवर Google Maps वापरणे

तुम्ही खालील गोष्टींसाठी तुमच्या फीचर फोनवर Google Maps वापरू शकता:

  • तुमचा आवाज वापरून किंवा टाइप करून ठिकाणे शोधा
  • स्‍टेप बाय स्‍टेप दिशानिर्देश मिळवा
  • नकाशावर तुमचे सध्याचे स्थान पाहा
  • नकाशावर ठिकाणे एक्सप्लोर करा आणि निवडा
ठिकाण शोधा
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. शोध बारवर टॅप करा.
  3. पत्ता किंवा स्थान शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरण्याकरिता शोध बारमध्ये टाइप करा किंवा स्पर्श करा आणि धरून ठेवा.
  4. सूचीमधून ठिकाण निवडा.
टीप: ठिकाण निवडा, नंतर दिशानिर्देश मिळवा किंवा ते नकाशावर पाहा. तुम्ही ठिकाणाचे फोटो पाहू शकता, फोन कॉल करू शकता, सुरू होण्याच्या वेळा पाहू शकता किंवा परीक्षणेदेखील वाचू शकता.
ठिकाणांचे प्रकार शोधा
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. शोध बारवर टॅप करा.
  3. "रेस्टॉरंट" सारखी वर्गवारी शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरण्याकरिता शोध बारमध्ये टाइप करा किंवा स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  4. सूचीमधून ठिकाण निवडा.
टीप: तुम्ही सुरुवातीच्या स्क्रीनवर सामान्य वर्गवाऱ्यांसाठी शॉर्टकट शोधू शकता.
दिशानिर्देश मिळवा
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  3. ठिकाणाचे नाव किंवा पत्ता एंटर करा किंवा तुमच्या नकाशावरील स्थानावर टॅप करा:
    • नकाशावर दिशानिर्देश पाहाण्यासाठी, नकाशावर टॅप करा.
    • तुमच्या गंतव्यस्थानासाठी स्‍टेप बाय स्‍टेप सूचना पाहण्याकरिता, तपशील वर टॅप करा.
    • दिशानिर्देशांचे पूर्वावलोकन मिळवण्यासाठी, जा वर टॅप करा.
टीप: "ट्रेन किंवा बस" सारखी तुमची प्रवास पद्धती निवडा. तुम्ही तुमचे गंतव्यस्थान, सुरूवातीचे ठिकाण, किंवा परिवहनाची पद्धत संपादित करण्यासाठी मागे जाऊ शकता.
नकाशावर तुमचे स्थान शोधा
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचे स्थान Your location निवडा.
  3. तुमचे सध्याचे स्थान नकाशावर निळा बिंदू म्हणून दाखवले आहे.

तुम्हाला तुमच्या स्थानाबाबत समस्या येत असल्यास:

  • तुमचा फोन रीस्टार्ट करा
  • चांगल्या GPS कनेक्शनसाठी खुल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्थान मिळवण्याची ही पहिली वेळ असल्यास, निराकरणासाठी कमाल दहा मिनिटे थांबण्याचा प्रयत्न करा.
  • Settings अ‍ॅपमध्ये भौगोलिक स्थान सुरू असल्याची खात्री करा
  • तुम्ही Settings अ‍ॅपमध्ये भौगोलिक स्थानाला अ‍ॅक्सेस दिला असल्याची खात्री करा
     
नकाशा एक्सप्लोर करा
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. नकाशा दाखवा निवडा.
  3. नकाशाचा आकार अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, झूम इन करा Zoom in किंवा झूम आउट करा Zoom out दाबा.
  4. नकाशावर ठिकाण निवडण्यासाठी, ठिकाण आणि त्यानंतर तुमचे स्थानYour location वर टॅप करा.

टीप: तुम्ही कीबोर्डवरील एक किंवा तीन वापरून झूम इन आणि झूम आउटदेखील करू शकता.

इतर नकाशा दृश्ये शोधा आणि अधिक माहिती मिळवा
तुम्ही सध्याची रहदारी किंवा दुचाकी मार्गांची माहिती स्तरांमध्ये अथवा विशेष नकाशा दृश्यांमध्ये पाहू शकता.
महत्त्वाचे: रहदारीची माहिती सर्व ठिकाणी उपलब्ध नाही.
  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. नकाशा स्तर स्तर वर टॅप करा, त्यानंतर स्तर निवडा:
    • परिवहन: ट्रेन लाइन किंवा बस मार्ग, यांसारखी सार्वजनिक परिवहन माहिती.
    • रहदारी: रस्त्यांवरील रहदारीची स्थिती.
    • उपग्रह: वरून दिसणाऱ्या पृथ्वीच्या इमेज.
  3. स्तर बंद करा, स्तरावर पुन्हा टॅप करा.

टीप: तुमच्या खात्याशी संबंधित डेटा संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी, तुमचा डेस्कटॉप, Android किंवा iOS डिव्हाइस वापरा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1688854274626022292
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false