मार्ग दृश्य साठी 360 व्हिडिओ कॅप्चर करण्याच्या टिपा

तुम्ही मार्ग दृश्य साठी 360 व्हिडिओ कॅप्चर करता, तेव्हा तुम्ही या टिपा फॉलो केल्यास, तुमची इमेजरी Google Maps वर कशी प्रदर्शित होते हे ऑप्टिमाइझ करण्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता. इमेजरी प्रकाशित झाल्यानंतर निळ्या रेषा दिसण्यासाठी वेळ लागू शकतो. Google कधीकधी इमेजरीच्या स्थान निर्धारणावर पुन्हा प्रक्रियादेखील करू शकते. या प्रक्रिया सहसा ४८ तासांमध्ये पूर्ण होतात.

टीप: आतमध्ये घेतलेल्या व्हिडिओसाठी सध्या मार्ग दृश्य उपलब्ध नाही.

तुमचा कॅमेरा सेट करा आणि हवा तसा ठेवा

  • जायरोस्‍कोपिक स्टेबलायझेशन बंद करा.
  • तुमचा कॅमेरा सरळ आणि तुमच्या कॅमेरा सपोर्ट सिस्टीमपेक्षा शक्य असेल तितक्या उंचीवर ठेवा.
  • प्रो-ग्रेड कॅमेरा: तुम्ही वाहन वापरत असल्यास, कॅमेरा रोटेट होणाऱ्या गिंबलवर न लावता तो हलणार नाही असा माउंट करा आणि पृष्ठभागाच्या जवळ ठेवा.
  • वाहनाच्या सर्वात वरून कॅप्चर करा. वाहनाच्या बाजूने किंवा आतून कॅप्चर करू नका.
  • तुमची कॅमेरा सपोर्ट सिस्टीम अशा प्रकारे ठेवा, जेणेकरून 360 इमेजची २५% जागा कमी घेईल. तुमचा कॅमेरा रीअल-टाइम पूर्वावलोकनाला सपोर्ट करत असल्यास, तुमच्या कॅमेराची स्थिती तपासण्यासाठी पूर्वावलोकन वापरा.
  • इमेजच्या वरच्या ७५% भागामध्ये फक्त आजूबाजूचे वातावरण दाखवणे आवश्यक आहे जे दृश्य ब्लॉक करणार नाही. 
  • इमेजच्या फक्त तळाशी २५% पुढील गोष्टी असू शकतात:
    • वाहन किंवा त्याला जोडलेले काहीतरी.
      • वाहनांमध्ये बोटी, बाइक किंवा इतर वाहतुकीचा समावेश आहे.
    • हाताने धरलेला किंवा हॅल्मेटवर माउंट केलेला कॅमेरा असलेली व्यक्ती.
    • वाहन किंवा लोक झाकण्यासाठी कृत्रिम फिलर. 
      • वरील ७५% भागामध्ये फिलर जोडण्याचा प्रयत्न करू नका.
    • नादिर कॅपसारखी सुपरइंपोज केलेली ग्राफिक.
  • तुमच्या सभोवतालच्या प्रकाशयोजनेचा विचार करा:
    • सूर्योदय आणि सूर्यास्त टाळा.
    • प्रकाशमान परिस्थितीसाठी एक्सपोजर अ‍ॅडजस्ट करा.
    • तुमचा कॅमेरा रीअल-टाइम पूर्वावलोकनाला सपोर्ट करत असल्यास, एक्सपोजर योग्य असल्याची पडताळणी करण्यासाठी चिन्हे आणि स्टोअरफ्रंट वापरा.
    • ब्लर, गडद आणि खराब इमेज नकाशावर अचूकपणे ठेवल्या जाऊ शकत नाहीत.
  • कॅमेरा नियंत्रित करण्यासाठी, मोबाइल अ‍ॅपसारखी उत्पादकाची उपलब्ध असलेली टूल वापरण्याचा विचार करा.

अधिक टिपा

  • GPS डेटा योग्यरीत्या गोळा झाला आहे याची खात्री करण्यासाठी, जिथे आकाश स्पष्टपणे दिसत असेल अशा भागांमध्ये तुमचा संग्रह पाथ सुरू आणि बंद करा.
    • झाडे किंवा इमारती टाळा.
    • घरामध्ये किंवा बोगद्याच्या आत घेतलेल्या व्हिडिओमध्ये पुरेसा GPS सिग्नल नसतो आणि ते कदाचित यशस्वीरीत्या प्रकाशित होणार नाहीत.
  • GPS नमुने:
    • नमुन्यांमध्ये पाच सेकंदांपेक्षा जास्त वेळ अंतर नसल्याची खात्री करा.
    • कॅमेरा हलत असताना लागोपाठ नमुने फ्रीझ केले जाऊ नयेत.
    • तुमचे GPS नमुने अशक्य नाहीत हे तपासा. कार किंवा व्यक्ती साध्य करू शकत नसलेल्या मार्गांनी अक्षांश आणि रेखांश सर्वत्र हलत असल्यास, आम्ही व्हिडिओ नाकारू शकतो.
  • 360 इमेज आपोआप एकमेकांशी संबंधित ठेवण्यास आम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्या संग्रहाच्या पाथमधील वळणे किंवा शहर ब्लॉक यांसारख्या तुम्ही आधीच कॅप्चर केलेल्या काही भागांसह ओव्‍हरलॅप करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमचा कॅमेरा या वैशिष्ट्याला सपोर्ट करत असल्यास, फ्रेम दर रीसेट करण्याचा विचार करा:
    • ड्रायव्हिंग किंवा बाइकची गती: ५ फ्रेम प्रति सेकंदानुसार (FPS)
    • चालण्याची गती: 1 FPS
  • नियम म्हणून, तुमची वेग मर्यादा पुढीलप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करा:
    • 1 FPS साठी ५ mph किंवा ताशी ८ किमीपेक्षा कमी.
    • 5 FPS साठी ३० mph किंवा ताशी ४५ किमीपेक्षा कमी.
    • 7 FPS साठी ४५ mph किंवा ताशी ७० किमीपेक्षा कमी.
  • यशस्वी प्रकाशन सुनिश्चित करण्‍यासाठी, एकामागून एक इमेज मोठ्या प्रमाणात समान दृश्य आशय कॅप्चर करण्‍यासाठी फ्रेम दर पुरेसा उच्च असणे आवश्यक आहे.
    • अरुंद मार्गिकांसाठी कमी गती किंवा उच्च FPS आवश्यक असू शकते.
    • वेळेमध्ये अंतर असलेले व्हिडिओ क्रम योग्यरीत्या काम करणार नाहीत. दूरच्या, स्थिर इमेज वापरून व्हिडिओ बनवू नका.
  • टाइमस्टॅंप विश्वसार्ह असायला हवेत.
    • तयार केलेल्या टाइमस्टॅंपसह GPS ट्रॅक किंवा व्हिडिओ क्रम तयार करू नका.
      • उदाहरणार्थ, एका सेकंदाच्या कृत्रिम वाढीसह व्हिडिओचा क्रम.
    • प्रो-ग्रेड कॅमेरासाठी GPS, इमेजरी आणि IMU सिंक झालेले असणे आवश्यक आहेत, उशीर झालेले नकोत. तारीख भविष्यातील किंवा अगदी जुनी नसावी.
  • व्हिडिओ कॅप्चर केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्यास, तुम्ही तेच FPS सेटिंग वापरणे आवश्यक आहे.
  • स्टिच केलेल्या इमेजरीचे स्वरूप २:१ आस्पेक्ट रेशोसह समभुज आयताकार पॅनोरमा असणे आवश्यक आहे.
  • कॅमेरा उत्पादकाने अन्यथा सल्ला दिला नसल्यास, तुमचे 360 व्हिडिओ एकावेळी किमान दोन मिनिटांसाठी रेकॉर्ड करा आणि हा कालावधी ६० मिनिटांसाठीपेक्षा जास्त असू नये.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4891477312929047979
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false