नवीन ठिकाणे शोधणे आणि अनुभव मिळवणे

तुमच्या आवडत्या भागांमधील ठिकाणे आणि इव्हेंट यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, Google Maps पाहा. तुम्ही वैयक्तिक शिफारशी, अलीकडील परीक्षणे आणि ट्रेंडिंग स्थळे पाहाल. या माहितीमध्ये आमचे भागीदार, आमचे वापरकर्ते किंवा सार्वजनिक वेब यांच्या समावेशासह विविध स्रोतांवरील आशयाचा समावेश असू शकतो.

टीप: आशय हा आमची आशय धोरणे किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्हाला आढळल्यास, Google तो काढून टाकू शकतो. Google Maps मधील अपडेट विभागात दाखवलेल्या परिणामांवर इतर कंपन्यांच्या पेमेंटचा परिणाम होत नाही. Google Maps मधील सशुल्क आशयाला लेबल लावले जाते.

Google Maps वर कोणता आशय दाखवला जातो यावर परिणाम करण्यासाठी, आम्ही स्थान इतिहास व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीवरून मिळवलेले पर्सनलायझेशन सिग्नल वापरतो. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीस्थान इतिहासाविषयी अधिक जाणून घ्या आणि या गोष्टी बंद कशा कराव्यात हे जाणून घ्या.

 महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सर्व देशांमध्ये उपलब्ध नाही.

टीप: हे वैशिष्ट्य सगळीकडे उपलब्ध नाही.

तुम्हाला सुचवलेली ठिकाणे पाहणे

  1. तुमच्या Android फोनवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, अपडेट Updates वर टॅप करा.
  3. "फॉलो करत आहे" अंतर्गत, तुम्हाला तुमच्या भागातील ठिकाणे आणि इव्‍हेंटबद्दल शिफारशी व अपडेट दिसतील.

सुचवलेली ठिकाणे एक्सप्लोर करणे

  • नवीन आणि स्वारस्यपूर्ण काय आहे ते पाहण्यासाठी, अपडेटमध्ये स्क्रोल करा.
  • ठिकाण कुठे आहे ते पाहण्यासाठी, कार्डच्या सर्वात वरती उजवीकडे, नकाशा Map वर टॅप करा.
  • तुम्हाला भेट द्यायचे असलेले ठिकाण तुम्हाला सापडल्यास, जायचे आहे Want to go वर टॅप करा. ते तुमच्या "जायचे आहे" सूचीमध्ये सेव्ह होईल.
  • तुमची "जायचे आहे" सूची पाहाण्यासाठी, सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, जायचे आहे Want to Go वर टॅप करा.

सूचना आणि अपडेट कुठून येतात

Google Maps मध्ये, तुम्हाला आवडतील असे आम्हाला वाटत असलेल्या शेजार, शहरे व प्रदेशातील ठिकाणे आणि अनुभवांच्या शिफारशी तुम्हाला दिसतील. सूचना या तुमचा स्थान इतिहास, तुमच्या घराचा आणि ऑफिसचा सेव्ह केलेला पत्ता व तुमची Maps अ‍ॅक्टिव्हिटी यांवर आधारित असतात. तुमच्या प्राधान्यांनुसार, सूचना या ठिकाणांचा आणि इव्‍हेंटचा वक्तशीरपणा व उपयुक्तता या गोष्टींच्या आधारे रँक केल्या जातात.

अपडेट विभाग पुढील गोष्टींविषयी अपडेट दाखवतो:

  • तुम्ही फॉलो करत असलेले लोक आणि व्यवसाय
  • तुम्हाला स्वारस्य असेल असे Google Maps ला वाटणारी ठिकाणे

तुम्हाला स्वारस्य असलेले भाग निवडा

  1. तुमच्या Android फोनवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी, अपडेट Updates वर टॅप करा.
  3. शिफारशी कार्डवर खाली स्क्रोल करा, त्यानंतर आणखी आणखी आणि त्यानंतर तुमचे भाग व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    टीप: तुम्हाला स्वारस्य असलेल्या किंवा ज्यामध्ये स्वारस्य नाही अशा भागांची सूची तुम्ही तयार करू शकता.
  4. पर्याय निवडा:
    • या सूचीमधून भाग काढून टाकण्यासाठी, काढून टाका काढून टाका वर टॅप करा.
    • नवीन भाग जोडण्यासाठी, भाग जोडा वर टॅप करा आणि नकाशा हलवा.
    • भाग निवडा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16750841237995560288
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false