iMessage वापरून तुम्ही कुठे आहात ते इतरांना दाखवणे

तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत iMessage वर चॅट करत असल्यास, तुम्ही कुठे आहात हे त्यांना दाखवण्यासाठी Google Maps वापरू शकता.

पहिली पायरी: संभाषण उघडा

महत्त्वाचे: MMS मेसेज पाठवण्यासाठी, iMessage ला तुमच्या फोन नंबरची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगितले गेल्यास, तुमचा नंबर जोडण्यासाठीसेटिंग्ज वर टॅप करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad च्या होम स्क्रीनवरून, iMessage शोधा.
  2. अस्तित्वात असलेले संभाषण उघडा किंवा सर्वात वरती उजवीकडे जा आणि नवीन मेसेज New Message वर टॅप करा.

दुसरी पायरी: iMessage ला Google Maps जोडा

  1. स्क्रीनच्या तळाशी, ॲप्स वर टॅप करा. 
  2. तळाशी डावीकडे, ॲप ड्रॉवरApps वर टॅप करा.
  3. जोडा + वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  5. “Google Maps” च्या बाजूला, स्विच सुरू करा. तुम्हाला Google Maps दिसत नसल्यास, Google Maps ॲप डाउनलोड करा
  6. सर्वात वरती उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा.

तिसरी पायरी: तुमचे स्थान पाठवा

महत्त्वाचे: स्थान शेअरिंग थांबवण्यासाठी, थंबनेलवरील थांबा वर टॅप करा.

  1. स्क्रीनच्या तळाशी, ॲप्स वर टॅप करा.
  2. तळाशी डावीकडे, ॲप ड्रॉवरApps वर टॅप करा.
  3. Google Maps वर टॅप करा.
  4. तुम्‍हाला तुमचे स्‍थान किती वेळ शेअर करायचे आहे ते निवडा.
    • तुमचे रीअल टाइम स्थान शेअर करण्यासाठी: तुमचे रीअल टाइम स्थान एका तासासाठी शेअर करा हे निवडा. तुम्ही तुमचे स्थान शेअर करण्याचा कालावधी तीन दिवसांपर्यंत वाढवू शकता.
    • तुमचे सध्याचे स्थान शेअर करण्यासाठी: तुमचे सध्याचे स्थान पाठवा हे निवडा.
  5. पाठवा वर टॅप करा.
  6. अप ॲरोवर टॅप करा.

टीप:  तुम्ही तुमचे रीअल टाइम स्थान शेअर करणे निवडल्यास, तुमचे स्थान अपडेट करण्यासाठी तुम्ही Google Maps अ‍ॅप उघडे ठेवणे आवश्यक आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3880458518724230914
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false