ठिकाणांची सूची तयार करणे

Google Maps मध्ये, तुम्ही तुमची आवडती ठिकाणे किंवा तुम्हाला भेट द्यायची असलेली ठिकाणे यांसारख्या ठिकाणांची सूची तयार करू शकता.

नवीन सूची तयार करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. तळाशी उजवीकडे, नवीन सूची Plus वर टॅप करा.
  4. नाव आणि वर्णन एंटर करा.
  5. सूचीचा प्रकार निवडा:
    • खाजगी: फक्त तुम्ही पाहू आणि संपादित करू शकता.
    • शेअर केलेली: पाहाण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी लिंक शेअर करा.
    • सार्वजनिक: तुमच्या प्रोफाइल आणि फोटोसह वेबवरील Google च्या सेवांमध्ये सार्वजनिकरीत्या दिसेल.
  6. सेव्ह करा वर टॅप करा.

सूचीमध्ये ठिकाण सेव्ह करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
  5. सूची निवडा. नवीन सूची तयार करण्यासाठी, नवीन सूची Plus वर टॅप करा.
  6. पर्यायी: टीप सूचीमध्ये सेव्ह केल्यानंतर ती ठिकाणावर जोडली जाऊ शकते.

तुमच्या सूची शोधा

तुमच्या सूची शोधण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps ॲपMaps उघडा. 
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.

सूची संपादित करणे किंवा हटवणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला संपादित करायच्या किंवा हटवायच्या असलेल्या सूचीवर टॅप करा.
  4. सूची मिटवण्यासाठी, सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर यादी हटवा वर टॅप करा.
    टीप: तुम्ही Maps मध्ये असलेल्या आवडती, जायचे आहे आणि तारांकित ठिकाणे यांसारख्या डीफॉल्ट सूची मिटवू शकत नाही.
  5. सूची बदलण्यासाठी, सर्वात वरती, संपादित करा संपादित करा वर टॅप करा. तुम्ही येथून हे करू शकता:
    • सूची संपादित करा: सर्वात वरती, तुम्हाला जे नाव किंवा वर्णन बदलायचे आहे त्यावर टॅप करा.
    • टिपा जोडा: तुम्हाला ज्या ठिकाणाचे वर्णन करायचे आहे त्याखाली असलेल्या बॉक्सवर टॅप करा. तुम्ही कमाल ४,००० वर्ण जोडू शकता.
    • सेव्ह केलेले ठिकाण हटवा: काढून टाका काढून टाका वर टॅप करा.
  6. वरील पायऱ्या पूर्ण केल्यावर, सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.

सूची लपवणे किंवा शेअर करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या सूचीच्या बाजूला, आणखी आणखी वर टॅप करा आणि त्यानंतर पर्याय निवडा:
    • तुमच्या नकाशावर लपवा/दाखवा: नकाशा बघताना, तुम्ही सेव्ह केलेली ठिकाणे दाखवा किंवा लपवा.
    • सूची संपादित करा: सूचीमध्ये ठिकाणे जोडा किंवा त्यामधून काढून टाका.
    • सूची शेअर करा: इतरांना तुमची सेव्ह केलेली सूची पाहाण्याची किंवा त्यामध्ये सहयोग करण्याची अनुमती द्या.
    • शेअर करण्याचे पर्याय: तुम्ही तुमची सूची सार्वजनिक, खाजगी किंवा शेअर केलेली करू शकता. लिंक असलेल्या कोणालाही तुमची सूची पाहता यावी यासाठी, शेअर केलेली वर टॅप करा. कोणालाही तुमची सूची शोधता आणि फॉलो करता यावी यासाठी, सार्वजनिक वर टॅप करा. 

तुमच्या सूची पाहू शकणारे कोणीही सूचीमध्ये सामील झालेल्या लोकांची नावे आणि प्रोफाइल फोटोदेखील पाहू शकतात. ते सूचीमध्ये ठिकाणे आणि टिपा कोणी जोडली किंवा संपादित केली आहेत हेदेखील पाहू शकतात.

तुमच्या शेअर केलेल्या सूची कोण संपादित करू शकतो हे व्यवस्थापित करणे

तुमची सूची संपादित करण्यासाठी इतरांना आमंत्रित करणे

तुमच्या शेअर केलेल्या आणि सार्वजनिक सूची संपादित करण्यासाठी सामील होण्याकरिता तुम्ही इतरांना आमंत्रित करू शकता:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. सूचीच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर सूची शेअर करा वर टॅप करा.
  4. "लिंक संपादन करू देते" हे सुरू करा.
  5. संपादनाची लिंक कोणासोबत शेअर करायची आहे ते निवडा.

तुमची सूची कोण संपादित करू शकतो ते बदलणे

सूचीच्या संपादनाची लिंक पुन्हा शेअर कशी करावी किंवा आणखी संपादक कसे जोडावे याची माहिती खाली दिली आहे:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर शेअर करण्याचे पर्याय वर टॅप करा.
  4. "संपादक" अंतर्गत, इतरांना आमंत्रित करा वर टॅप करा.
  5. लिंक कोणासोबत शेअर करायची ते निवडा.

सध्याचे सर्व संपादक काढून टाकण्यासाठी, संपादन बंद करा:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेलीठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. सूचीच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर शेअर करण्याचे पर्याय वर टॅप करा.
  4. "संपादनाचे पर्याय" अंतर्गत, इतरांना ही सूची संपादित करू द्या बंद करा.
    1. इतरांसोबत शेअर करण्याकरिता नवीन लिंक मिळवण्यासाठी इतरांना ही सूची संपादित करू द्या सुरू करा.

तुमची सूची पूर्ण करणे

खालील विशेषता असलेल्या सूची वैशिष्ट्यीकृत होण्यासाठी पात्र आहेत (वैशिष्ट्यीकृत केलेल्या सूची Google Maps मधील एक्सप्लोर करा हा टॅब आणि संपूर्ण Maps आणि Search मधील इतर ठिकाणी दिसू शकतात). तुमची सूची पूर्ण करण्यासाठी:

  1. तुमच्या स्वतःच्या शीर्षकासह नवीन सूची तयार करा.
  2. सूचीविषयी वर्णन जोडा.
  3. किमान चार ठिकाणे जोडा.
  4. सूचीमधील प्रत्येक ठिकाणाविषयी वर्णने जोडा.
  5. सूचीमधील प्रत्येक ठिकाणासाठी फोटो निवडा .
  6. प्रकाशित करा वर टॅप करा.

"खाजगी" वर टॉगल करूनदेखील सूची खाजगी राहू शकते जेणेकरून, तुमची सूची फक्त तुम्ही पाहू शकता. तुमची सूची खाजगीवर टॉगल करण्यासाठी, सूचीच्या बाजूला आणखी आणखी आणि त्यानंतर शेअर करण्याचे पर्याय आणि त्यानंतर खाजगी करा वर टॅप करा.

तुमचा सूचीचा क्रम कस्टमाइझ करा

तुम्ही तुमच्या Google Maps सूचीमध्ये सेव्ह केलेल्या ठिकाणांचा क्रम कस्टमाइझ करू शकता.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा.
  3. "तुमच्या सूची" अंतर्गत तुम्हाला पुनर्रचना करायच्या असलेल्या सूचीवर टॅप करा.
  4. संपादित करा संपादित करावर टॅप करा.
  5. सूची क्रम कस्टमाइझ करा सुरू करा.
  6. क्रम बदलण्यासाठी ठिकाण शीर्षकाच्या डावीकडच्या चार निळ्या रेषांवर स्पर्श करा आणि धरून ठेवा. 
  7. हे करून झाल्यावर, सेव्ह करा वर टॅप करा.

सूची फॉलो करणे

तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने तयार केलेली सूची फॉलो करत असल्यास, त्यांची सेव्ह केलेली ठिकाणे तुमची ठिकाणे मध्ये दिसतील. Google Maps मध्ये ठिकाणेसुद्धा सुचवलेल्या स्थानांप्रमाणे दिसतील.

लिंक वापरून सूची फॉलो करणे

  1. सूची उघडण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या लिंक वर टॅप करा.
  2. फॉलो करा वर टॅप करा. ही सूची आता तुम्ही फॉलो करत असलेल्या सूचींच्या गटामध्ये जोडली जाईल.
  3. पर्यायी: तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तीने शेअर केलेली सूची अनफॉलो करण्यासाठी, सूची आणि त्यानंतर फॉलो करत आहे वर टॅप करा.

इतरांनी तयार केलेल्या सूची पाहाणे

वापरकर्त्याकडे सार्वजनिक केलेल्या कोणत्याही Google Maps सूची असल्यास, तुम्ही त्या फॉलो करू शकता. 

  1. तुम्हाला ज्या वापरकर्त्याची सूची फॉलो करायची आहे, त्याच्या नावावर टॅप करा.
  2. सूची वर टॅप करा.
  3. तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या सूचीवर आणि त्यानंतर आणखी आणखी आणि त्यानंतर फॉलो करा वर टॅप करा. 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7894414904995048594
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false