पार्किंगची स्थाने शोधणे आणि सेव्ह करणे

तुम्ही ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी, तुम्ही तुमची कार पार्क करण्यासाठी ठिकाणे शोधू शकता. तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर, तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करू शकता जेणेकरून, तुम्हाला ते नंतर शोधता येईल.

टिपा:

  • तुम्ही फक्त यू.एस. मधील काही शहरांमध्ये तुमच्या गंतव्यस्थानाजवळ पार्किंग शोधू शकता.
  • तुम्ही पार्क करण्यासाठी iPhone किंवा iPad वर ठिकाणे शोधू शकत नाही.

तुम्ही जेथे पार्क केले आहे ते स्थान सेव्ह करणे

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करू शकता जेणेकरून, तुम्ही कार कुठे पार्क केली आहे ते तुमच्या लक्षात राहील.

पहिली पायरी: स्थान सेवा "नेहमी" वर सेट करा

तुम्ही स्थान सेवा "नेहमी" वर सेट केली असेल फक्त तेव्हा Maps तुमची पार्किंग माहिती सेव्ह करेल. तुमची स्थान सेटिंग्ज कशी सेट करायची ते जाणून घ्या.

दुसरी पायरी: तुमच्या शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटीची नोंद करा

तुम्ही Google Maps ला तुमच्या ॲक्टिव्हिटीची नोंद करू देता तेव्हा, (तुम्ही तुमची कार गंतव्यस्थानापेक्षा लांब पार्क केली असली तरीही) तुम्ही तुमची कार पार्क करता तेव्हा Maps ते आपोआप लक्षात ठेवेल.

  1. तुम्ही कुठेतरी नेव्हिगेट करणे पूर्ण केल्यानंतर, तळाशी, तुम्ही कुठे पार्क केले ते जाणून घ्या सुरू करा.
  2. Google Maps ला तुमचे मोशन आणि फिटनेस ॲक्टिव्हिटी ॲक्सेस करू द्या.
  3. तुम्ही प्रवास करणे थांबल्यानंतर, तुम्हाला तुमचे पार्किंगचे स्थान तुम्ही येथे पार्क केले आहे म्हणून लेबल केलेले दिसेल.

(पर्यायी) तिसरी पायरी: तुमचे डिव्हाइस तुमच्या कारशी कनेक्ट करा

सर्वात अचूक परिणामांसाठी, तुमचे डिव्हाइस तुमच्या कारशी कनेक्ट करा.

ब्लूटूथ वापरणे

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर ब्लूटूथ सुरू करा.
  2. तुमचा फोन किंवा टॅबलेट तुमच्या कारशी पेअर करा.
  3. तुमच्या कारच्या ऑडिओ सिस्टिमचा स्रोत ब्लूटूथवर सेट करा.

USB वापरणे

तुमचे डिव्हाइस तुमच्या कारमध्ये प्लग करा.

चौथी पायरी: तुमचे पार्किंगचे स्थान सेट करा

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करू शकता जेणेकरून, तुम्ही कार कुठे पार्क केली आहे ते तुमच्या लक्षात राहील.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचे स्थान दाखवणाऱ्या निळ्या बिंदूवर टॅप करा.
  3. पार्किंगचे स्थान म्हणून सेट करा वर टॅप करा.

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान काढून टाकेपर्यंत ते Google Maps मध्ये सेव्ह केले जाईल.

तुमचे पार्किंगचे स्थान हलवणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमच्या पार्किंगच्या स्थानावर टॅप करा .
  3. तळाशी, सेव्ह केलेले पार्किंग आणि त्यानंतर स्थान बदला वर टॅप करा.
  4. Maps वरून तुमचे पार्किंगचे स्थान काढून टाकण्यासाठी, तळाशी, सेव्ह केलेले पार्किंग आणि त्यानंतर आणखी 더보기 आणि त्यानंतर पार्किंग ऑटोसेव्ह करू नका वर टॅप करा.
तुमचे पार्किंगचे स्थान शेअर करणे

तुमचे पार्किंगचे स्थान मित्रमैत्रिणींना शोधता यावे यासाठी त्यांच्याशी शेअर करण्याकरिता, तळाशी, सेव्ह केलेले पार्किंग आणि त्यानंतर शेअर करा Share वर टॅप करा.

तुम्ही कुठे पार्क केले आहे ते शोधणे

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह केल्यानंतर, स्क्रीनच्या तळाशी, सेव्ह केलेले पार्किंग आणि त्यानंतर नकाशावर दाखवा वर टॅप करा.

टीप: तुम्ही Maps मध्ये दुसरे ठिकाण पाहिल्यानंतर तुमचे पार्किंगचे स्थान दाखवण्यासाठी, आधी तुमचे शोध परिणाम साफ करा. सर्वात वरती शोध बारमध्ये, साफ करा Clear वर टॅप करा. त्यानंतर, तळाशी, सेव्ह केलेले पार्किंग वर टॅप करा.

सूचना सुरू किंवा बंद करणे

तुम्ही कुठे आणि किती वेळासाठी पार्क केले यांसारख्या पार्किंगसंबंधित माहितीच्या सूचना तुम्ही मिळवू शकता.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सूचना वर टॅप करा.
  4. सेव्ह केलेली स्थाने सुरू किंवा बंद करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8122332132335143138
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false