राइडची विनंती करणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये आणि भाषांमध्ये उपलब्ध नाही.

Google Maps अ‍ॅपमध्ये, तुम्ही सार्वजनिक परिवहन किंवा चालत जाणे यांसारख्या तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचण्याच्या इतर मार्गांशी राइड सेवांची आणि त्यांच्या किमतींची तुलना करू शकता.

राइड शोधा

राइड सेवा पुरवठादार जी माहिती उपलब्ध करतात ती Maps वर दाखवली जाते. यांपैकी एखाद्या पुरवठादाराविषयी तुम्हाला प्रश्न किंवा तक्रार असल्यास, कृपया त्यांच्याशी थेट संपर्क साधा.

महत्त्वाचे: डॉकलेस वाहने आणि डॉक केलेली बाइकशेअर सर्व शहरांमध्ये उपलब्ध नाहीत.

  1. तुमच्या मोबाइल फोन किंवा डिव्हाइससाठी, Google Maps अ‍ॅपMaps उघडा. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे हे केले असल्याची खात्री करा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
    • राइडशेअरसाठी, तुम्ही तुमचे सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्यस्थान दोन्ही निवडल्याची खात्री करा.
  1. तळाशी डावीकडे, दिशानिर्देशDirections वर टॅप करा.
  2. सर्वात वरती, राइड राइड सेवा वर टॅप करा. सेवा, शुल्क आणि वेळा यांची सूची दिसेल.
    • राइडची किंमत पाहण्यासाठी: राइड सेवा पुरवठादार निवडा.
    • तुमच्या जवळपासची डॉकलेस वाहने शोधण्यासाठी: परिवहन Transit किंवा सायकल चालवणे Cycling वर टॅप करा.
    • तुमच्या जवळपासची डॉक केलेली बाइकशेअर शोधण्यासाठी: सायकल चालवणे Cycling वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायची असलेली सेवा निवडा.
    • तुमच्या डिव्हाइसवर सेवेचे अ‍ॅप असल्यास: अ‍ॅप उघडेल.
    • तुमच्याकडे सेवेचे अ‍ॅप नसल्यास: ते डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅप स्टोअर उघडेल.
  4. तुमची राइड विनंती संपवण्यासाठी, पुरवठादाराच्या अ‍ॅपमधील सूचना फॉलो करा.

राइडसंबंधी माहिती

सायकल किंवा स्कूटरची विनंती करा

तुमचे शहर हे डॉकलेस वाहने किंवा डॉक केलेली बाइकशेअर सपोर्ट करत असल्यास, तुम्ही ती तुमच्या Google Maps अ‍ॅपवर पाहू शकता.

  1. तुमचे Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमच्या परिवहन पर्यायांमध्ये तुमच्या जवळपासच्या उपलब्ध असलेल्या सायकल आणि स्कूटर दिसतील. Maps तुम्हाला या गोष्टी दाखवते:
    1. वाहनाचा प्रकार आणि किमतीसह, तुमच्या सर्वात जवळपासचे डॉकलेस वाहन किंवा उपलब्ध असलेल्या सायकल अथवा डॉकच्या संख्येसह, तुमच्या मार्गावरील तुमच्या सर्वात जवळपासचे सायकल स्टेशन.
    2. वाहन आणि तुमचे गंतव्यस्थान या दोन्हींपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा वेळ किंवा एका डॉकपासून दुसऱ्या डॉकपर्यंत टर्न-बाय-टर्न सायकलिंग नेव्हिगेशन.
  3. परिवहनाचा पर्याय निवडा:
    1. डॉकलेस वाहन निवडण्यासाठी, डॉकलेस अ‍ॅप उघडण्याकरिता डॉकलेस वाहन या पर्यायावर टॅप करा, त्यानंतर सूचना फॉलो करा. 
    2. डॉक केलेली सायकल निवडण्यासाठी, बाइकशेअर प्रोग्रामचे ॲप उघडण्याकरिता तुमच्या सायकल चालवण्याच्या पर्यायांमधील डॉक केलेले बाइकशेअर या पर्यायावर टॅप करा आणि त्यानंतर सूचना फॉलो करा. 
टीप: तुम्ही तुमचे गंतव्यस्थान शोधून आणि सायकलिंग टॅब तपासून, तुमच्या आजूबाजूला उपलब्ध असलेले डॉक केलेल्या बाइकशेअरचे पुरवठादारदेखील दाखवू शकता.
कोणती माहिती आणि कशी शेअर केली जाते

तुमच्या पिकअपच्या स्थानासाठी आणि गंतव्यस्थानासाठी, Google Maps ते शेअर करते. "घर" किंवा "ऑफिस" यांसारख्या सेव्ह केलेल्या ठिकाणांची तुम्ही दिलेली नावे शेअर केली जात नाहीत. तुमचे सध्याचे स्थान हे तुमचे पिकअप स्थान किंवा गंतव्यस्थान असेल तेव्हाच ते शेअर केले जाते.

तुम्ही तुमच्या भागातील परिणामवर टॅप करत नाही तोपर्यंत आम्ही राइड सेवा पुरवठादारांसोबत कोणतीही माहिती शेअर करत नाही. पुढील माहिती शेअर केली जाते:

  • तुमचे पिकअपचे स्थान आणि गंतव्यस्थान Maps वापरून शेअर केले जाते. तुमचे सध्याचे स्थान आणि त्या स्थानांना तुम्ही दिलेली "घर" किंवा "ऑफिस" यांसारखी नावे शेअर केली जात नाहीत.
  • राइड-सेवा पुरवठादार शुल्क आणि प्रतीक्षा कालावधीच्या अंदाजाविषयीची माहिती शेअर करतात.

तुमची माहिती कोण पाहू शकते

तुमची नेव्हिगेशन माहिती फक्त तुम्ही तुलना करत असलेल्या राइड सेवा कंपन्यांसोबत Google Maps वापरून शेअर करते. राइड सेवा पुरवठादारांची सूची तुमच्या देश किंवा प्रदेशावर अवलंबून असते. Google पुढील कंपन्यांना डेटा पाठवू शकते:

  • 99
  • Beat
  • Bitaksi
  • BlaBlaCar
  • Blablacar Daily
  • Bolt
  • Cabify
  • Careem
  • Chauffeur Prive
  • DiDi
  • Freenow
  • Gett
  • Go-jek
  • Grab
  • HK Taxi
  • JapanTaxi
  • Juno
  • Lyft
  • Meru Cabs
  • MyTaxi
  • Ola Cabs
  • Sixt
  • Texi.eu
  • Uber
  • Waymo
  • Waze Carpool

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14314961656737093801
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false