Google Maps मधील अ‍ॅक्सेसिबिलिटी

तुमचा Google Maps अनुभव आणखी अ‍ॅक्सेसिबल करण्यासाठी तुम्ही स्क्रीन रीडर, कीबोर्ड शॉर्टकट आणि इतर वैशिष्ट्ये वापरू शकता.

स्क्रीन रीडर वापरणे

या ब्राउझर आणि स्क्रीन रीडरसोबत तुम्ही Google Maps वापरू शकता:

  • Chromebook वर Chrome सह ChromeVox
  • Windows वर NVDA किंवा JAWS सह Firefox
  • Mac वर VoiceOver सह Safari

तुमचा कीबोर्ड वापरणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. तुमच्या कीबोर्डवर, नकाशा फोकसमध्ये येईपर्यंत टॅब दाबा.
  3. नकाशाचा एक भाग चौरसाने हायलाइट केला जाईल. चौरसाखाली, त्या भागातील ठिकाणांची नंबर दिलेली सूची असेल. येथून, तुम्ही हे करू शकता:
    • नकाशाच्या आसपास फिरणे: अ‍ॅरो की वापरा. टीप: नकाशा एका चौरसाने हलवण्यासाठी, शिफ्ट धरून ठेवा आणि अ‍ॅरो की दाबा.
    • नकाशा झूम इन किंवा झूम आउट करणे: प्लस (+) किंवा मायनस (-) की दाबा.
    • एखाद्या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेणे: त्या ठिकाणाशी संबंधित नंबर दाबा.
    • टीप: हायलाइट केलेल्या भागामध्ये सातपेक्षा जास्त ठिकाणे असल्यास:
      • आणखी ठिकाणे पाहण्यासाठी 9 दाबा.
      • मागील ठिकाणांवर जाण्यासाठी 8 दाबा.

कीबोर्ड शॉर्टकट शोधणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. Ctrl + / दाबा. तुमच्या स्क्रीनवर शॉर्टकटची सूची दिसेल.

अ‍ॅक्सेस करता येणारे परिवहन शोधणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. शोध बारमध्ये, तुमचे गंतव्यस्थान एंटर करा.
  3. परिणामांच्या सूचीमध्ये, तुम्हाला हव्या असलेल्या स्थानावर क्लिक करा.
  4. दिशानिर्देश आणि त्यानंतर परिवहन Transit वर क्लिक करा.
  5. पर्याय वर क्लिक करा.
  6. "मार्ग" अंतर्गत, व्हीलचेअर अ‍ॅक्सेसिबल वर क्लिक करा.
  7. तुमचा मार्ग निवडा.

तुमचा नकाशा मोठा करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
    • तुमचा नकाशा फोकसमध्ये असल्याची खात्री करा.
  2. पेज झूम वापरून नकाशावरील माहिती मोठी करण्यासाठी, तुमचा कीबोर्ड वापरा.
    • झूम इन करण्यासाठी: Ctrl आणि + किंवा   आणि + प्रेस करा. 
    • झूम आउट करण्यासाठी: Ctrl + - किंवा  + - प्रेस करा. 
    • रीसेट करण्यासाठी: Ctrl + 0 किंवा + 0 प्रेस करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5502346281036598736
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false