रहदारी पाहणे किंवा रस्त्यावरील ठिकाणे मिळवणे

तुम्ही नकाशावर गंतव्यस्थान एंटर केले नाही तरीही, तुम्ही पुढील गोष्टी मिळवू शकता:

  • प्रवासादरम्यान रहदारीशी संबंधित माहिती मिळवणे
  • ठिकाणे सहजरीत्या शोधणे
  • उद्याने किंवा पेट्रोल पंप यांसारख्या सामान्य प्रकारच्या ठिकाणावर झटपट नेव्हिगेट करणे

प्रवासादरम्यान रहदारीशी संबंधित माहिती मिळवणे

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तळाशी जा Go वर टॅप करा. 
  3. तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीवरून दाखवलेल्या प्रवास पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. 

टीप: निवडलेला प्रवास न दिसल्यास, तुम्हाला हवा असलेला प्रवास शोधण्यासाठी स्क्रोल करा, त्यानंतर तो पिन करा.

जा या टॅबमध्ये, तुम्हाला पुढील माहिती मिळू शकते:

  • सुचवलेल्या गंतव्यस्थानावर ड्राइव्ह करण्यासाठी किती वेळ लागतो. Google खाते सेटिंग्ज यावर आधारित गंतव्यस्थाने दाखवली जातात.
  • शिफारस केलेले आणि पर्यायी मार्ग.
  • रस्त्यावरील क्रॅश किंवा बांधकामामुळे रहदारी रखडल्याने झालेला उशीर.

जा हा टॅब कसा वापरायचा हे जाणून घ्या.

ब्लूटूथ वापरून ड्रायव्हिंगशी संबंधित सूचना मिळवा

तुमच्या फोन किंवा मोबाइल डिव्हाइसचे ब्लूटूथ सुरू असल्यास आणि ते तुमच्या कारशी पेअर केलेले असल्यास, तुम्ही तुमची कार सुरू केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंगशी संबंधित सूचना मिळतील. सूचना सुरू करण्यासाठी:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरेखात्याचे वर्तुळाकार चिन्ह वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज आणि त्यानंतर ड्रायव्हिंगशी संबंधित सूचना निवडा.

तुमच्या मार्गावरील इव्‍हेंट शोधा

तुम्ही तुमच्या मार्गवरील रहदारी तपासता तेव्हा, तुम्हाला यांसारखे हायलाइट केलेले इव्हेंट दिसू शकतात:

  • कॉन्सर्ट
  • परेड
  • मॅरॉथॉन
  • स्पोर्टशी संबंधित इव्हेंट

इव्‍हेंटच्या दिवशी, तुम्हाला यांसारख्या गोष्टींचे अपडेट मिळतील:

  • उशीर
  • बंद करणे
  • रहदारी स्थिती
  • पर्यायी मार्ग

इव्‍हेंट संपल्यानंतर ही माहिती आपोआप निघून जाते. Maps मध्येतुम्हाला आढळणाऱ्या इतर अ‍ॅक्टिव्हिटी एक्सप्लोर करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15231811223447054997
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false