Google Maps वरील चुकीच्या दिशानिर्देशांची तक्रार करणे

तुम्हाला Google Maps मध्ये चुकीचे दिशानिर्देश मिळाल्यास, कोणती पायरी चुकीची होती हे तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुम्ही परिवहन Transit याव्यतिरिक्त वाहतुकीच्या कोणत्याही मोडसाठी चुकीच्या दिशानिर्देशांची तक्रार नोंदवू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही चुकीच्या दिशानिर्देशांची तक्रार फक्त कॉंप्युटरवरून आणि काही देश/प्रदेशांमध्ये करू शकता.

चुकीच्या पायरीची तक्रार करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. दिशानिर्देश Directions वर क्लिक करा.
  3. चुकीच्या दिशानिर्देशांसाठीचे सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्यस्थान एंटर करा.
    1. डावीकडील पॅनलमध्ये, तुम्हाला ज्या मार्गासंबंधित समस्या नोंदवायची आहे, त्यावर क्लिक करा.
    2. तपशील वर क्लिक करा.
  4. नकाशाच्या तळाशी उजवीकडे साध्या मजकुरामधील, फीडबॅक पाठवा वर क्लिक करा.
  5.  चुकीच्या पायरीच्या बाजूला, फ्लॅग करा Report a problem वर क्लिक करा.
    टीप: काही मार्गांच्या बाबतीत, कोणते दिशानिर्देश चुकीचे आहेत हे तुम्ही निवडण्यापूर्वी, तुम्हाला डावीकडील दिशानिर्देशांचा विस्तार करावा लागू शकतो.
  6. समस्येचा प्रकार निवडा, त्यानंतर सबमिट करा वर क्लिक करा.

Maps मार्ग कसा निवडते

रहदारीचे इशारे आणि प्रवासाचे अंदाज

 

रहदारीची स्थिती दाखवण्यासाठी आणि मार्ग निवडण्यासाठी Maps दोन ठिकाणावरून मिळालेली माहिती वापरते:

  • तुमच्या फोनवरील अज्ञात डेटा: स्‍थान डेटा संग्रह सुरू केला आहे हे केले असल्यास, तुमचा फोन अज्ञात डेटाचा काही भाग Google ला पाठवेल. हे तुमचे स्थान दाखवते आणि ट्रॅफिक जॅमचे नेमके स्थान शोधण्यात आम्हाला मदत करते. Maps तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग आणि प्रवासाची अंदाजे वेळ देण्यासाठी ही माहिती वापरते. प्रवासाच्या वेळेचा अंदाज या भूतकाळातील आणि सध्याचा स्‍थान डेटा व इतर स्रोत यांच्या आधारावर बांधला जातो.
  • भागीदार: सरकार, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था, शाळा आणि व्यवसाय यांसारख्या भागीदारांनी रहदारी आणि घटनाशी संबंधित डेटाचा परवाना Google ला दिला आहे. Google चे भागीदार कोण आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचा डेटा अज्ञात कसा राहतो

आम्हाला तुमची गोपनीयता सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही तुमच्या फोन आणि इतर फोनवरील अज्ञात डेटा एकत्र करतो, जेणेकरून कोणीही तुमचे डिव्हाइस ओळखू शकणार नाही. यासोबत, तुमचे सुरुवातीचे ठिकाण व गंतव्यस्थान कायमचे हटवले जाते, जेणेकरून Google देखील ते पाहू शकणार नाही.

नकाशावरील ठिकाणे आणि रस्ते

Google Maps ला नकाशे अपडेट करण्यासाठी दोन स्रोतांकडून माहिती मिळते:

  • Maps वापरणारे लोक: Google Maps वापरणाऱ्या लोकांना समस्या आल्यास, ते आम्हाला कळवू शकतात. 
  • भागीदार: सरकार, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था, शाळा आणि व्यवसाय यांसारख्या भागीदारांनी नकाशाच्या डेटाचा परवाना Google ला दिला आहे. Google चे भागीदार कोण आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14729277337887562759
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false