Google Maps सूचना सुरू किंवा बंद करणे

तुम्ही वारंवार प्रवास करता त्या मार्गावरील ट्रेनची शेड्युल किंवा रहदारी यासारख्या तुम्हाला स्वारस्य असलेल्या गोष्टी पाहण्यासाठी, Google Maps अ‍ॅपमध्ये सूचना सुरू करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर टॅप करा.
  3. वर्गवारीवर टॅप करा.
    • सूचना सुरू करा: सूचनेच्या बाजूला असलेले स्विच सुरू करा.
    • सूचना बंद करा: सूचनेच्या बाजूला असलेले स्विच बंद करा.

तुम्हाला मिळू शकतात अशा सूचना

तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांचे फोटो जोडण्यासाठी सूचना

तुम्ही रेस्टॉरंट आणि बार यांसारख्या ठिकाणी काढलेल्या फोटोमध्ये इतर लोकांना स्वारस्य असू शकते असे Google ला वाटत असल्यास, तुम्हाला फोटो जोडण्यासाठी सूचना मिळू शकतात.

त्या ठिकाणचा फोटो जोडणारी तुम्ही पहिली व्यक्ती असू शकता अशा ठिकाणी तुम्ही असता, तेव्हादेखील तुम्हाला सूचना मिळू शकते.

तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांशी संबंधित प्रश्न
तुम्ही भेट दिलेले ठिकाण किंवा व्यवसाय यांसंबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला सूचना मिळू शकतात.

टीप: या सूचना मिळवण्यासाठी, स्थान इतिहास सुरू करणे हे करा.

तुम्ही पोस्ट केलेल्या परीक्षणांची उत्तरे

एखाद्या ठिकाणाविषयी किंवा व्यवसायाविषयी तुम्ही पोस्ट केलेल्या परीक्षणाला एखाद्या व्यक्तीने उत्तर दिल्यास, तुम्हाला सूचना मिळू शकतात.

उत्तर वाचण्यासाठी, सूचनेवर टॅप करा. तुम्हाला त्या ठिकाणाच्या तपशील पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही लिहिलेले परीक्षण आणि त्याचे उत्तर सर्वात वरती दिसेल.

जवळपासच्या कार्यक्रमांमुळे होणारी रहदारी

जवळपासच्या कार्यक्रमांमुळे किंवा रस्ता बंद असल्यामुळे तुम्ही वारंवार प्रवास करता त्या मार्गावर परिणाम होऊ शकतो असे Google Maps ला वाटते, तेव्हा त्याबद्दल तुम्हाला सूचना मिळतात.

आम्हाला एखाद्या शेड्युल केलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती असल्यास, तुम्हाला कार्यक्रमापूर्वी सूचना मिळेल, जेणेकरून तुम्ही पर्यायी मार्गाची योजना आखू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या ऑफिसमधून घरी जाण्याच्या मार्गावर एखादा कॉन्सर्ट असल्यास, त्या कॉन्सर्टच्या एक दिवस आधी तुम्हाला सूचना मिळू शकते.

टीप: तुम्हाला कार्यक्रमांशी संबंधित योजना आखण्यात मदत व्हावी, यासाठी रिमाइंडर मिळवा वर टॅप करा, म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याची वेळ जवळ येईल, तेव्हा Google Maps तुम्हाला त्याबद्दल आठवण करून देईल.
आपत्तीशी संबंधित जवळपासच्या घटनांसाठी नेव्हिगेशनबाबत चेतावण्या
तुम्ही भूकंपासारख्या आपत्तीने प्रभावित झालेल्या क्षेत्रातून जात असल्यास, नेव्हिगेशन सुरू करण्याआधी आणि नंतर Google Maps तुम्हाला चेतावणी देईल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15509407978406686937
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false