रेल्वे आणि बसची प्रस्थाने मिळवणे

तुम्ही Google Maps अ‍ॅपमध्ये परिवहनाची प्रस्थाने मिळवू शकता. काही ट्रांझिट स्टेशन रीअल-टाइम प्रस्थाने दाखवतात, तर काही प्रस्थाने यांचे शेड्युल दाखवतात.

जवळपासची प्रस्थाने शोधा

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. गंतव्यस्थान एंटर करा आणि दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, परिवहन Transit वर टॅप करा.
    • परिवहनाचा प्राधान्य दिलेला मोड आणि मार्ग निवडण्यासाठी, पर्याय and then पूर्ण झाले वर टॅप करा.
  4. परिवहनाचे पर्याय आणि वेळा पाहण्यासाठी स्क्रोल करा. दिशानिर्देशांसाठी मार्गावर टॅप करा.
टीप: तुम्ही तुमचा प्रवास निवडल्यानंतर, तुमचे वारंवार होणारे प्रवास पिन करण्यासाठी, पिन करा वर टॅप करा. तुमचे प्रवास पिन करणे आणि जा टॅब यांबद्दल अधिक जाणून घ्या.

विशिष्ट स्टेशनवरील प्रस्थाने शोधा

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. स्टेशन शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.

तुमची प्रस्थानाची वेळ अ‍ॅडजस्ट करा

तुमची ट्रेन निघून गेल्यास किंवा परिवहन प्रवासासाठी तुम्ही लवकर पोहोचल्यास, प्रवास अ‍ॅडजस्ट करण्यासाठी तुम्ही प्रस्थानाचे पर्यायी मार्ग क्षणात निवडू शकता.
महत्त्वाचे: तुम्ही प्रस्थानाची नवीन वेळ निवडता, तेव्हा तुमची सध्याची वेळ आणि परिवहनासंबंधीच्या पुढील वेळा आपोआप अपडेट होतात.
  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान शोधा किंवा नकाशामध्ये त्यावर टॅप करा.
  3. गंतव्यस्थान एंटर करा आणि दिशानिर्देश Directions वर टॅप करा.
  4. सर्वात वरती, परिवहन Transit वर टॅप करा.
  5. सर्वात वरती, तुमचे सुरुवातीचे स्थान एंटर करा.
  6. तुमच्या प्रस्थानाची तारीख आणि वेळ कंफर्म केल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या मार्गावर टॅप करा. तुमच्या मार्गाचे तपशील उघडतील.
  7. तुमच्या प्रस्थानाच्या स्टेशनचे नाव या अंतर्गत, उपलब्ध असल्यास, तुम्हाला नंतरच्या कमाल दोन प्रस्थानाच्या वेळा दिसतील.
    • उदाहरणार्थ, तुम्हाला "दुपारी १.३० आणि २.१५ वाजतादेखील" असे दिसू शकते.
  8. तुमचे प्रस्थानाचे पर्याय विस्तारित करण्यासाठी, डाव्या बाजूला, अ‍ॅरो arrow वर टॅप करा. उपलब्ध असल्यास, Maps तुम्हाला प्रस्थानाच्या इतर वेळा दाखवते.
    • तुम्हाला हवी असलेली वेळ आढळत नसल्यास, आणखी प्रस्थाने वर टॅप करा आणि प्रस्थानाच्या सर्व उपलब्ध वेळा आणि प्रवासाच्या तपशिलांचे पुनरावलोकन करा. प्रस्थानाच्या वेळांवर परत जाण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेली वेळ निवडण्यासाठी मागे जा वर टॅप करा.
  9. तुम्हाला हवी असलेली प्रस्थानाची वेळ निवडा.

स्टेशनवरील गर्दीच्या पातळ्या शोधा

तुम्ही सार्वजनिक परिवहनाने प्रवास करत असल्यास, एखाद्या स्टेशनवर किती गर्दी आहे ते तुम्ही पाहू शकता. ते उपलब्ध असल्यास, तुम्हाला स्टेशनच्या नावाखाली कितपत गर्दी आहे याची माहिती मिळेल. माहिती सार्वजनिक परिवहन डेटावर आधारित आहे.

रंग आणि आयकनचा अर्थ काय आहे

हिरवा - शेड्युलनुसार आहे आणि रीअल टाइम अपडेट होत आहे

नारिंगी लवकर येत आहे, रीअल टाइम अपडेट होत आहे

लाल - उशीर झाला आहे, रीअल टाइम अपडेट होत आहे

काळा - रीअल टाइममध्ये अपडेट होत नाही

खबरदारी - बांधकाम किंवा इतर कारणांमुळे उशीर

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
126045591872498803
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false