तुमच्या Wear OS डिव्हाइसवर Google Maps वापरणे

तुम्ही Play Store मधून Google Maps अ‍ॅप डाउनलोड करता, तेव्हा तुम्ही तुमच्या वॉचवर नेव्हिगेशन वापरू शकता, स्थानिक गंतव्यस्थाने किंवा तुमचे स्थान शोधू शकता आणि इतर उपयुक्त माहिती मिळवू शकता.
हे फक्त Wear 3 ला लागू होते आणि तुमच्या स्‍मार्टवॉचच्या आवृत्तीनुसार काही वैशिष्ट्ये वेगळी असू शकतात. तुमच्या वॉचची आवृत्ती कशी तपासावी ते जाणून घ्या.
महत्त्वाचे:
  • नेव्हिगेशन वापरण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोन आणि स्‍मार्टवॉचवर स्थानाचा माग ठेवण्याला अनुमती देणे आवश्यक आहे.
  • पॉवर सेव्हिंग मोड हा Maps वापरताना व्यत्यय आणू शकतो.
  • काही व्हॉइस कृती सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाहीत.
  • तुमच्या Wear डिव्हाइसवरील Maps हे तुमच्या पेअर फोनवरील अंतराच्या युनिटपेक्षा वेगळे युनिट वापरते.

नकाशा एक्सप्लोर करा

तुम्ही जवळपासच्या भागांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठीदेखील Maps वापरू शकता.

तुमच्या वॉचवर दिशानिर्देश मिळवा

महत्त्वाचे: या पायऱ्या फक्त Wear 3 ला लागू होतात. Wear 2 असलेल्या वॉचसाठी, तुम्ही पेअर केलेल्या फोनवरील Google Maps अ‍ॅपमध्ये फक्त टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश वापरू शकता.
तुमच्या वॉचवर दिशानिर्देश मिळवण्यासाठी, तुम्ही तुमच्या वॉचवर किंवा तुमच्या पेअर केलेल्या फोनवर नेव्हिगेशन सुरू करू शकता. मार्ग तुमच्या फोनवर दिसतो आणि तुम्ही पुढे जाता तसे तुमच्या वॉचवर प्रत्येक वळणासाठी तुम्हाला दिशानिर्देश मिळतात. Maps हे सध्या सायकलस्वारी, गाडी चालवणे आणि पायी जाणे यांसाठीच्या नेव्हिगेशनला सपोर्ट करते. सार्वजनिक परिवहनाच्या दिशानिर्देशांना टर्न बाय टर्न व्हॉइस आणि हॅप्टिक यांशिवाय सपोर्ट असतो.
टीप: तुम्ही तुमच्या फोनवर स्थानाला अनुमती देता, तेव्हा तुमचा फोन लॉक केलेला असतानादेखील तुमच्या वॉचवर नेव्हिगेशन काम करते. तुमच्या फोनवर स्थानाला अनुमती कशी द्यावी हे जाणून घ्या.

स्‍थाने शोधा

  1. तुम्हाला तुमची वॉच स्क्रीन दिसत नसल्यास, वॉच सुरू करा.
  2. तुमची अ‍ॅप्स शोधण्यासाठी वरती स्‍वाइप करा आणि Maps अ‍ॅप उघडा.
  3. तुमचे घर, ऑफिस किंवा अलीकडील स्थाने यांमधून निवडण्यासाठी, Search वर टॅप करा.

तुमचा आवाज वापरून दिशानिर्देश मिळवा

  1. Google Assistant सुरू करण्यासाठी , "Ok Google" असे म्हणा किंवा पॉवर बटण प्रेस करून धरून ठेवा.
    • तुम्ही नवीन काहीतरी शोधण्यासाठी मायक्रोफोन Microphone किंवा कीबोर्डवरदेखील टॅप करू शकता.
  2. "जवळपासच्या कॉफी शॉपवर नेव्हिगेट करा" असे काहीतरी म्हणा. Google Maps कार्ड तुमच्या वॉचवर दिसते.
टीप: तुम्हाला हवे असलेले गंतव्यस्थान दिसत नसल्यास, तुम्हाला आणखी विशिष्ट गंतव्यस्थान निवडावे लागू शकते.

तुम्ही नेव्हिगेशन सुरू केल्यानंतर, पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या प्रवासाचा कालावधी आणि सध्याची वेळ शोधा.
  • पुढील तीन दिशानिर्देश शोधा.
  • तुमचा प्रवास रद्द करा: दिशानिर्देश थांबवण्यासाठी आणि होम स्क्रीनवर परत जाण्यासाठी, तुमच्या वॉचवर, डावीकडे किंवा तळाशी स्‍वाइप करा व थांबवा वर टॅप करा.

तुमचा फोन जवळपास नसताना तुमचे वॉच वापरणे

तुम्ही तुमचा फोन जवळपास नसताना वॉचवर नेव्हिगेशन सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या फोनवर मिररिंग आणि नेव्हिगेशनदेखील सुरू करू शकता व नंतर तुमचा फोन सोडून जाऊ शकता. तुम्ही मिररिंग सुरू करता, तेव्हा तुमचे वॉच तुमच्या फोनवरील नेव्हिगेशनचे नियंत्रण मिळवेल. हे फक्त Android डिव्हाइससह पेअर केलेल्या वॉचच्या बाबतीत काम करते.

तुमच्या वॉचवरून नेव्हिगेशन सुरू करण्यासाठी:

  1. तुमच्या वॉचवरून Maps उघडा.
  2. तुमचे गंतव्यस्थान इनपुट करण्यासाठी आवाज किंवा कीबोर्ड टूल वापरा. तुम्ही तुमचे स्थान पाहण्यासाठी नकाशावर टॅपदेखील करू शकता.
  3. तुमचा परिवहनाचा प्रकार निवडा. इथून, तुम्ही तुमची पोहोचण्याची वेळ पाहू शकता.
  4. तुमचे चालणे, सायकल, कार किंवा सार्वजनिक परिवहन प्रवास सुरू करा.

तुमच्या फोन आणि वॉचवर मिररिंग सेट करणे

  1. फोन आणि वॉच या दोन्हीवर तुमचे नेव्हिगेशन सेशन मिरर करण्यासाठी, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर मिररिंग वर जा.
  2. फोनवर मिरर करा सुरू करा.

टीप: फक्त वॉचवर आधारित नेव्हिगेशनसाठी, फोनवर मिरर करा बंद करा.

तुमच्या वॉचवर Maps साठी सेटिंग्ज व्यवस्थापित करा

तुम्ही स्क्रीनच्या तळाशी स्क्रोल करण्यासाठी Search Search वर टॅप करू शकता आणि तुमच्या वॉचवर Maps कसे काम करते हे बदलू शकता.

व्हायब्रेशन थांबवा

व्हायब्रेशन थांबवण्यासाठी, तुमच्या वॉचवर, तळाशी स्क्रोल करा आणि व्हायब्रेशन बंद करा. हे सेटिंग तुमच्या सर्व प्रवासांसाठी लक्षात ठेवले जाते.

तुमच्या वॉचवर दिशानिर्देश ऑटोलॉंच करणे थांबवा

तुम्ही तुमच्या फोनवरील Google Maps वर नेव्हिगेशन सुरू करता, तेव्हा तुमच्या वॉचवर दिशानिर्देश आपोआप सुरू होतात. तुम्ही तुमच्या वॉचवर दिशानिर्देश ऑटोलॉंच करणे थांबवू शकता.
  1. तुमच्या वॉचवर Maps अ‍ॅप उघडा.
  2. शोधा वर टॅप करा.
  3. तुम्ही स्क्रीनच्या तळाशी पोहोचेपर्यंत वरती स्‍वाइप करा.
  4. सेटिंग्ज आणि त्यानंतर मिररिंग वर टॅप करा.
  5. तुम्ही गाडी, सायकल चालवताना आणि पायी जाताना, गाडी चालवणे, सायकल चालवणेपायी जाणे बंद करा.

तुमचे स्थान शोधा

तुम्ही तुमच्या वॉचवर Maps उघडता, तेव्हा तुम्ही तुमचे स्थान निळा बिंदू म्हणून आणि उत्तरेकडे पॉइंट करणारी होकायंत्राची सुई पाहू शकता. होकायंत्र सुरू किंवा बंद करण्यासाठी, होकायंत्राच्या लाल इंडिकेटरवर टॅप करा.

ठिकाणे शोधण्यासाठी Search वापरा

शोध मेनू उघडण्यासाठी आणि व्यवसाय शोधण्यासाठी, Search Search वर टॅप करा. शोध सुरू करण्यासाठी किंवा जवळपासच्या व्यवसायाचा फोन नंबर अथवा पत्ता शोधण्यासाठी, तुम्ही कीबोर्ड आणि मायक्रोफोन वापरू शकता. Google Maps वापरून ठिकाणे कधी शोधावी ते जाणून घ्या.

नकाशावर पॅन आणि झूम करा

  • नकाशा पॅन करण्यासाठी, नकाशा आजूबाजूला हलवण्यासाठी तुमचे बोट वापरा. तुमच्या सध्याच्या स्थानाच्या नकाशावर परत जाण्यासाठी, स्थान वर टॅप करा.
  • नकाशा झूम करण्यासाठी, तुमच्या वॉचच्या सर्वात वरती असलेले बटण फिरवा:
    • झूम आउट करण्यासाठी, एका बोटाने दोनदा टॅप करा आणि वरती ड्रॅग करा.
    • झूम इन करण्यासाठी, एका बोटाने दोनदा टॅप करा आणि खाली ड्रॅग करा..

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4340191327384247708
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false