Google Maps मध्ये नेव्हिगेशन वापरणे

ठिकाणांसाठी सोपे, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळवण्याकरिता, Google Maps अ‍ॅप वापरा. Maps तुम्हाला दिशानिर्देश दाखवते आणि तुमच्या गंतव्यस्थानासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग शोधण्याकरिता रीअल-टाइम रहदारी माहिती वापरते.

व्हॉइस नेव्हिगेशन वापरून, तुम्ही रहदारीशी संबंधित सूचना, कुठे वळावे, कोणती लेन वापरावी आणि आणखी चांगला मार्ग उपलब्ध आहे का या गोष्टी ऐकू शकता.

महत्त्वाचे: नेव्हिगेशन आणि कोणती लेन वापरावी याविषयीची माहिती सर्व देश, प्रदेश व भाषांमध्ये उपलब्ध नाही. नेव्हिगेशन हे मोठ्या आकाराच्या किंवा आणीबाणीमधील वाहनांसाठी उद्देशित नाही.

नेव्हिगेशन वापरण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे

तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर:

  • तुमची GPS सुरू करा.
  • Google Maps ला तुमचे सध्याचे स्थान आणि ऑडिओ स्पीकर वापरू द्या.

नेव्हिगेशन सुरू करणे किंवा थांबवणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी डावीकडे, दिशानिर्देश वर टॅप करा. त्याऐवजी बटणाला स्‍पर्श करून ते धरून ठेवल्यास, तुम्ही नेव्हिगेशन सुरू कराल आणि चार ते सहा पायऱ्या वगळू शकाल. आणखी गंतव्यस्थाने कशी जोडायची ते जाणून घ्या.
  4. तुमचा वाहतुकीचा मोड निवडा.
  5. इतर मार्ग उपलब्ध असल्यास, ते नकाशावर राखाडी रंगामध्ये दिसतील. पर्यायी मार्ग फॉलो करण्यासाठी, राखाडी रेषेवर टॅप करा.
  6. नेव्हिगेशन सुरू करण्यासाठी, सुरू करा Start वर टॅप करा. तुम्हाला “GPS शोधत आहे” असे दिसल्यास, तुमचा फोन GPS सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही बोगदा, पार्किंग गॅरेजमध्ये किंवा त्यापासून जवळ अथवा GPS सिग्नल नसलेल्या इतर स्थानावर असू शकता.
  7. नेव्हिगेशन थांबवण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी, तळाशी डावीकडे जा आणि बंद करा बंद करा वर टॅप करा.

टिपा:

तुमच्या मार्गावरील 3D इमारती दाखवणे

तुम्ही मार्गावरील 3D इमारती पाहण्याचे निवडू शकता. Maps ने 3D इमारती दाखवण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps Maps मध्ये साइन इन करा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. मार्गावरील 3D इमारती दाखवा हे सुरू किंवा बंद करा.

तुम्ही नेव्हिगेट करताना आणखी कृती शोधणे

तुम्ही एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करताना आणखी कृती शोधण्यासाठी:

  1. स्क्रीनच्या तळाशी, माहिती कार्डवर जा.
  2. वर स्वाइप करा.
  3. मेनू लपवण्यासाठी, माहिती कार्डवर खाली स्वाइप करा.
    • प्रवासाची प्रगती शेअर करा : तुम्ही येईपर्यंत तुमचे लाइव्ह स्थान शेअर करा. रीअल-टाइम स्थान शेअरिंगविषयी अधिक जाणून घ्या.
    • मार्गावरील ठिकाण शोधा : तुमच्या मार्गावरील रेस्टॉरंट किंवा पेट्रोल पंप यांसारखे ठिकाण शोधा. तुमच्या मार्गावरील ठिकाण कसे शोधावे याविषयी जाणून घ्या.
    • दिशानिर्देश : स्टेप-बाय-स्टेप दिशानिर्देशांची सूची मिळवा.
    • नकाशावर रहदारी दाखवा (फक्त ड्राइव्ह करताना): मार्गावरील रहदारी विलंब शोधा, जसे की क्रॅश किंवा बांधकाम.
    • उपग्रह नकाशा दाखवा : उपग्रह इमेज वापरून नकाशा आणखी तपशीलवार पहा.
    • 3D इमारती दाखवा : तुमच्या मार्गावरील 3D इमारती पहा.
    • सेटिंग्ज Settings: तुम्हाला मैल आणि किलोमीटर यांदरम्यान स्विच करायचे असल्यास किंवा टोल रस्ते टाळायचे असल्यास, तुमची सेटिंग्ज बदला.

तोंडी दिशानिर्देश ऐकणे

तुम्ही एखाद्या ठिकाणावर नेव्हिगेट करता तेव्हा, तोंडी दिशानिर्देश ऐकू शकता. व्हॉइस नेव्हिगेशनसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करावे ते जाणून घ्या.

व्हॉल्यूमची पातळी बदलणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज आणि त्यानंतर आवाजाची पातळी वर टॅप करा.
  3. मोठा, सामान्य किंवा कमी निवडा.

सूचना म्यूट, अनम्यूट करणे किंवा ऐकणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. नेव्हिगेशन सुरू करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आवाज Sound वर टॅप करा. त्यानंतर, खालीलपैकी एक निवडा:
    • म्यूट करा: म्यूट करा Mute वर टॅप करा.
    • सूचना ऐका: सूचना Alerts वर टॅप करा. तुम्हाला रहदारी, बांधकाम आणि क्रॅश यांसंबंधित सूचना ऐकू येतील. तुम्हाला टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश ऐकू येणार नाहीत.
    • अनम्यूट करा: आवाज Sound वर टॅप करा.

फोन कॉल सुरू असताना तोंडी दिशानिर्देश म्यूट करणे

कुठेतरी नेव्हिगेट करत असताना तुम्हाला फोन कॉल आल्यास, तुम्ही कॉलला उत्तर देऊ शकता पण तुम्ही तोंडी दिशानिर्देश म्यूट न केल्यास, तुम्हाला ते ऐकू येतील.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "फोन कॉल सुरू असताना व्हॉइस प्ले करा" हे सुरू किंवा बंद करा.

व्हॉइस बदलणे

तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच सेटिंग्ज वापरून दुसऱ्या व्हाॅइसवर स्विच करू शकता.

  1. तुमच्या फोन किंवा टॅबलेटच्या Settings अ‍ॅपमध्ये जा.
  2. भाषा आणि इनपुट वर टॅप करा.
  3. टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच आउटपुट वर टॅप करा.
  4. "प्राधान्यकृत इंजीन" अंतर्गत, दुसरा टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच पर्याय निवडा.
  5. व्हॉइस नेव्हिगेशन तुम्ही निवडलेला व्हॉइस वापरते. हे इतर अ‍ॅप्समधील व्हाॅइसदेखील बदलेल.

भाषा बदलणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्हआणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "आवाज आणि व्हॉइस" या अंतर्गत, व्हॉइस निवड वर टॅप करा.
  4. भाषा निवडा.

तुम्ही नेव्हिगेशन वापरून करू शकता अशा आणखी गोष्टी

रहदारीसंबंधित सूचनांची तक्रार करा

स्‍पीड कॅमेरा आणि रहदारीसंबंधित अपघातांची तक्रार करा

स्वतःसाठी आणि इतरांसाठी Maps मध्ये सुधारणा करण्यात मदत करण्याकरिता, तुम्ही तुमच्या मार्गावरील माहिती शेअर करू शकता. तुम्ही पुढील गोष्टींची तक्रार करू शकता:

  • वेग कमी करा Traffic jam
  • क्रॅश Crash
  • स्‍पीड ट्रॅप Speed traps

टीप: तक्रार करणे सुरक्षित असेल तरच करा.

तक्रार जोडणे

  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. नेव्हिगेशन सुरू करा.
  3. तक्रार करा Report आणि त्यानंतर पर्याय निवडा वर टॅप करा.
  4. तुम्ही तुमच्या मार्गावर ज्या ठिकाणी होता तेथे तक्रार दिसेल. तक्रार निनावी असेल.

इतरांनी दिलेल्या सूचना शोधा

एखाद्याने काही तक्रार केली असल्यास, तुम्ही जवळ जाल तशी ती तुम्हाला नकाशावर दिसेल. तुमच्या सूचना सेटिंग्जनुसार, तुम्हाला चेतावणीदेखील ऐकू येईल.

तुम्ही सूचना दिलेल्या जागेवर पोहोचाल तेव्हा, तुम्हाला “हे अजूनही येथे आहे का?” असे विचारणारी सूचना दिसेल. केलेली तक्रार खरी आहे का ते इतरांना कळवण्यासाठी, होय किंवा नाही वर टॅप करा.

नेव्हिगेशन वापरताना बॅटरी लाइफची बचत करण्यासाठी टिपा

Maps हे तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरून पुढील गोष्टी वापरत असल्यामुळे, नेव्हिगेशन सुरू असताना तुमच्या डिव्हाइसची बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते:

  • तुमचे सध्याचे स्थान
  • तुमची स्क्रीन
  • तुमचे स्पीकर

बॅटरी बचत करण्यासंबंधित टिपा

  • पॉवर अडॅप्टर वापरा: तुमचा फोन चार्ज होत असल्यास, त्याची बॅटरी ड्रेन होईल याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तुमचा प्रवास ३० मिनिटांपेक्षा जास्त लांबचा असल्यास, आम्ही पॉवर अडॅप्टर वापरण्याची शिफारस करतो.
  • तुमची स्क्रीन बंद करा: तुम्हाला नेव्हिगेशन वापरताना स्क्रीन पाहण्याची गरज नसल्यास, ती बंद करण्यासाठी तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील पॉवर बटण दाबा. तुम्हाला तरीही तोंडी दिशानिर्देश ऐकू येतील.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17807089663953069218
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false